No Picture
साहित्य - ललित

वारसा…

Category:

 

आरतीचं ताम्हन धरायला जड जाईल असा विचार करणाऱ्या बाबांना आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं देखील जड जाऊ लागलंय. त्यांचा तो जोर वाढत्या वयामुळे कधी ओसरला ते कळलंच नाही.

No Picture
लेखसंग्रह

प्राण्यांचा जैवभार

Category:

 

मानवाच्या ‘अधिपत्या’खालील भूप्रदेश वाढत आहेत, जंगलं नष्ट होत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्यासुद्धा घटत आहे. विविध वन्यप्राण्यांची संख्या ही पृथ्वीवरच्या वन्यजीवनाच्या ‘प्रकृती’ची निर्देशक असते. वन्यप्राण्यांच्या संख्येवर होणारा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणून घ्यायचा असला तर, कोणत्या जातीचे किती प्राणी अस्तित्वात आहेत, हे माहीत असायला हवं.

No Picture
लेखसंग्रह

बिथोवेनचा मृत्यू

Category:

 

लुडविग वॅन बिथोवेन हा अभिजात पाश्चात्य संगीताच्या क्षेत्रातला एक महान संगीतकार. इ.स. १७७०मध्ये जन्मलेल्या या जर्मन संगीतकारानं आपल्या सांगीतिक कारकिर्दीत उत्तमोत्तम अशा सुमारे सातशे सांगीतिक रचना निर्माण केल्या. त्याची ही सांगीतिक कारकिर्द सुमारे पंचेचाळीस वर्षांची होती. आश्चर्य म्हणजे अशी दीर्घ काळ निर्मितीक्षमता लाभलेल्या या संगीतकाराची श्रवणशक्ती मात्र त्याच्या तरूण वयातच क्षीण होऊ लागली होती.

जादू
लेखसंग्रह

जादू

Category:

 

आपल्या एकुलत्या एक लेकीचा पाचवा वाढदिवस त्याला अगदी जंगी साजरा करायचा होता. एका हॉल मध्ये सगळ्याचं कंत्राटच दिलं होतं. रंगीबेरंगी फुगे, कार्टूनची सजावट, एका कोपऱ्यात टॅटू काढणारा, एक जण वेगवेगळे मास्क वाटणारा वगैरे वगैरे जय्यत तयारी केली होती. हळूहळू पाहुणे येऊ लागले. भेटीगाठी-गप्पा सुरू झाल्या. थोड्यावेळाने बहुतांश निमंत्रित आले आणि त्याने तिथल्या व्यवस्थापन करणाऱ्याला कार्यक्रम सुरू करायला सांगितलं.

ममींची कार्यशाळा
लेखसंग्रह

ममींची कार्यशाळा

Category:

 

ममी हा इजिप्तच्या पुरातन इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. ममी म्हणजे इजिप्तच्या राजघराण्यातील, तसंच तिथल्या सधन लोकांची, प्रक्रियेद्वारे जतन करून ठेवलेली शवं. ममीद्वारे मृताचा अनंताकडचा प्रवास सुरू होत असल्याचं मानलं जायचं. त्यामुळे ममी ही अगदी रूढीपूर्वक तयार केली जायची.

No Picture
कथा

शोधा म्हणजे सापडेल!

Category:

 

“आई आता बास झालं हं तुमचं, चांगुलपणा शोधणं! प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा पाहावा, चांगुलपणा शोधावा हे ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आयुष्यभर चांगुलपणा शोधून तुम्हाला मिळालं काय, ते तरी कळू दे.” वृंदा चिडून चिडून बोलत होती आणि तितक्याच थंडगारपणाने त्यांनी उत्तर दिलं, “तुझ्यासारखी सून मिळाली.”

No Picture
कथा

कथातरंग – अनुपच्या शब्दात सल्ला

Category:

 

साधारण पांच एक वर्षांपूर्वी धोंडीबा कडे सहा एकर बागायती शेती होती, आणि शेताच्या एका कोपर्‍यात तीन खोल्यांचे छोटेसे पण देखणे असे कौलारू घर होते. त्यात धोंडीबा, राधा आणि त्यांची एक मुलगी राहत असे. दिवसभर कष्ट करून त्याने हे माळरान नंदानवनात फुलवले होते. कोणाकडे काही मागायची गरज पडणार नाही अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालला होता.

No Picture
लेखसंग्रह

अजस्र पेंग्विन

Category:

 

पेंग्विन हे अंटार्क्टिकावरील जीवसृष्टीतलं एक वैशिष्ट्य आहे. मात्र या न उडणाऱ्या पक्ष्यांचं वास्तव्य फक्त अंटार्क्टिकापुरतं मर्यादित नाही. पेंग्विनच्या काही जाती अगदी विषुववृत्ताजवळच्या प्रदेशांतही आढळतात. पेंग्विनच्या आज अठरा जाती अस्तित्वात असून, त्यांतील अंटार्क्टिकावर आढळणारी एम्परर पेंग्विन ही जाती आकारानं सर्वांत मोठी आहे.