Month: July 2022
कावळे (कथा) – भाग 4
Category:
साहित्य - ललितवासंतीला जाऊन आता पंधरा वर्ष होऊन गेलीत. बरेच वर्षांनी परवा एक बिल्डर आला होता. चांगला गल्लेलठ्ठ होता! उंचापुरा, दोन्ही हाताच्या बोटात हिऱ्याच्या अंगठ्या, पांढरा शुभ्र सफारी सूट, गळ्यात जाड सोनसाखळी, हातात हिऱ्यांच्या पट्ट्याचे घड्याळ, चकचकीत बूट, खिशाला हिऱ्याच्या क्लिपचे पेन…. श्रीमंतीचा दिमाख अगदी उबग आणण्याजोगा! आपली आलिशान गाडी सफाईने पायऱ्यापर्यंत आणून तो खाली उतरला आणि जणू आपल्याच घरात शिरतोय अशा रूबाबात सोळा पायऱ्या चढून वर आला! पायऱ्या चढून त्याला धाप लागली होती!
वेगळा (कथा) भाग ७
Category:
कथा साहित्य - ललितबस ५० ते ६० किलोमीटर वेगाने पळत जरी असली तरी, बाबू च हृदय मात्र १०० च्या पुढे पळत होत, पाऊस रिप रिप करू लागला होता , घाई गडबडीत छत्री , रेनकोट काहीच सोबत घेतलं न्हवत ,आपण काय करायला जातोय, त्याचा काय परिणाम होईल, ह्याची जाणीव आणि त्यातून उत्पन्न होणारी भीती त्याच्या मनाला त्रास देत होती , पण तरीही तो मागे हाटत न्हवता , का ?ह्याचं त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होत , एकदाच वाकड आल, पावसाने आता भलताच जोर धरला होता , वाकड तर खूप मोठ होत आता पुढे काय करायचं नेमक तीच घर आपल्याला कस सापडणार , निघताना तर आपण मोठ्या उत्साहात निघालो आणि मुर्खा सारखा तिचा पत्ताही माहित नसताना तिच्या गावात आलोय , ह्या पावसाला पण आताच वेळ मिळाली होती कोसळायला , शी …हे दप्त्तर आपण का सोबत आणलंय, अशोक कडे द्याव अस का नाही सुचल आपल्याला , मुळात आपण असे कोणत्या ठाम विचारावर आलोय हे समजत नाहीये काय कराव काहीही कळत न्हवत. तो हताशपणे एसटी थांब्याच्या नजीक चहाच्या टपरीवर च्या आडोश्याला उभा होता , इथे तिथे शोधक नजरेने आसपास चा परिसर न्हाहळू लागला . कदाचित त्याला बायडा दिसेल अश्या खोट्या आशेवर तो चलबिचल होत होता .
यलोस्टोनची गुपितं
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकअमेरिकेतल्या रॉकी माउंटन्स या डोंगराळ परिसरात यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान वसलं आहे. नैसर्गिक वैविध्यानं नटलेल्या या राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग, त्यातील गरम पाण्याचे कारंजे, झरे, तलाव, तसंच वाफेचे स्रोत यांसाठी जगप्रसिद्ध आहे. गरम पाण्याचे आणि वाफेचे सुमारे दहा हजार स्रोत इथे सापडले आहेत. यांतला दर तास-दोन तासांनी उसळणारा ‘ओल्ड फेथफूल’ हा गरम पाण्याचा कारंजा, तसंच ‘ग्रँड प्रिझ्मॅटिक स्प्रिंग’ हा गरम पाण्याच्या झऱ्यामुळे निर्माण झालेला रंगीबेरंगी तलाव, या जागा तर वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी (आठवणींची मिसळ ३)
Category:
साहित्य - ललितज्योतिष, पत्रिका, ग्रह ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत असं तर्काधारे कितीही समजवून दिलं तरी माणसाच्या मनांत भविष्यात काय घडणार याचं कुतूहल असतचं. त्याचा गैरफायदा घेतला जातो.पण कांही कांहीच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर वाटतं की खरंच असं कांही नसेल?
वेगळा (कथा) भाग ६
Category:
कथा साहित्य - ललितअनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो.
वेगळा भाग – ५
Category:
कथा साहित्य - ललितअशोक सोबत झालेल्या त्या बोलण्यामुळे बाबू पुढचे काही दिवस अशोकला भेटलाच नाही ,
शाळेत जरी तो त्याला दिसला तरी तो त्याला टाळू लागला, एकटा शाळेत येऊ जाऊ लागला.
संध्याकाळ चा बराच वेळ दत्त मंदिरात घालवू लागला .त्या दिवसानंतर मात्र अशोक आणि आपल्यात खूप फरक आहे ,
त्याचे आणि आपले विचार हे खूप वेगळे आहेत, अशोक आपला मित्र कधीच होऊ शकत नाही ह्याची
जणू खात्रीच बाबुला वाटू लागली होतीं,
चिकमावगा (ॲम्ब्रोज बिअर्स याची एक कथा)
Category:
कथा साहित्य - ललिततरूण असतांना त्याचा बाप सैनिक म्हणून पाशवी जमातींशी लढला होता व त्याने देशाचा झेंडा दूरवर फडकवला होता. मळ्यावरच्या शांत जीवनांतही त्याच्यातल्या सैनिकाची धग जिवंत होती कारण एकदा पेटलेला तो अंगार कधीच विझत नाही. त्याला युध्दाची चित्रे असलेली पुस्तक आवडत आणि ती पाहून मुलालाही इतकी समज आली होती की त्याने लाकडी फळीची तलवार केली होती; अर्थात वडिलांना कदाचित ती तलवार वाटली नसती. आता तो मुलगा त्याच्या शूर जमातीला शोभेशा धीटाईने ती तलवार हातात धरून थांबत, हवेत फिरवत, पवित्रे घेत चालला होता. त्याला सहजतेने ह्या अदृश्य शत्रुंवर विजय मिळत होता. त्यामुळे त्याने शत्रुचा पाठलाग करत पुढे पुढेच जात रहाण्याची, सर्व सेनांनीकडून नेहमीच घडणारी, चूक केली आणि तो एका उथळ ओढ्याच्या कांठावर येऊन पोहोचला; त्याच्या कल्पित शत्रुने तो ओढा सहज वाऱ्याच्या गतीने पार केला होता. समुद्र पार करणाऱ्या त्याच्या जमातीची विजिगीषु वृती त्याच्याही लहानशा हृदयात धडधडत होती. त्याने त्यात मोठे दगड वगैरे शोधून काढून त्यांच्या आधाराने धडपडत तो ओढा ओलांडला व परत शत्रुचा पाठलाग सुरू केला.
लोखंडी ग्रह!
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकक्रिस्टिन लॅम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला हा शोध नासाच्या ‘टेस’ या कृत्रिम उपग्रहावरील, ताऱ्यांची तेजस्वीता मोजणाऱ्या प्रकाशमापकाच्या मदतीनं लावला. टेस हा उपग्रह विविध ताऱ्यांच्या बिंबांवरील, त्यांच्या ग्रहांनी केलेल्या अधिक्रमणांचा शोध घेतो. किमान एक लाख किलोमीटर, तर कमाल पावणेचार लाख किलोमीटर अंतरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा टेस हा उपग्रह पृथ्वीभोवतालची आपली प्रदक्षिणा सुमारे पावणेचौदा दिवसांत पूर्ण करतो. या उपग्रहाद्वारे केल्या गेलेल्या निरीक्षणांत जीजे ३६७ या ताऱ्याची तेजस्वीता किंचितशी बदलत असल्याचं आढळून आलं.
बाबल्याची गोष्ट – भाग २ (आठवणींची मिसळ २)
Category:
साहित्य - ललितएव्हाना मी कथा लिहायला लागलो होतो.अनेकांनी मला बाबल्यावर कथा लिही म्हणून सांगितलं.मीही त्या घटनांचा अनेक अंगानी विचार केला.पण वरील दोन प्रश्न समाधानकारक रित्या सुटल्याशिवाय बाबल्याची गोष्ट पुरी होऊ शकत नाही हे माझ्या लक्षांत आलं.मी लहानपणी ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टींचे दुवे वेगवेगळ्या प्रकारे जुळवून पाहिले.बाबल्या आणि त्याच्या वयाच्या, म्हणजे पंधरा ते सतराच्या, मुलांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं.पौगंडावस्थेतील मुलांची लैंगिक सुखासाठी चाललेली धडपड (विकृत, कुणास ठाऊक ?) माझ्या दोन तीनदा दृष्टीस पडली होती.मी तेव्हां लहान होतो.पण त्याचा अर्थ नंतर चांगला कळून आला होता.मग बाबल्याच्या आईच्या जीव देण्याचा संबंध त्या मानसिकतेशी होता काय ?बाबल्या आणि त्याची आई यांच्या संबंधात बाबल्याच्या हातून अशी कांही लाजीरवाणी गोष्ट घडली होती काय ?थोड्या रासवट, थोराड, भोळसर बाबल्याने अनावर लैंगिक वासनेपायी एकाच खोलीत झोपणाऱ्या आईला लाजीरवाणं वाटाव असा अतिप्रसंग तर केला नसेल ना ?