No Picture
साहित्य - ललित

बहुत खोया, कुछ न पाया

Category:

 

आज, साठी ओलांडलेल्या पिढीने खूप काही गमावलंय.. आणि जे मिळालंय.. ते तडजोड करुन स्वीकारलंय… काळ बदलला, मात्र मन पुन्हा पुन्हा त्या रम्य भूतकाळातच जातं.

No Picture
कथा

आयुष्य

Category:

 

स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही.

No Picture
साहित्य - ललित

एऽ जिंदगीऽ, गले लगाले

Category:

 

बालु महेंद्र यांनी १९७१ साली ‘नेल्लु’ या मल्याळम चित्रपटापासून कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटाला त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! त्यानंतर त्यांनी कन्नड, तेलुगू, मल्याळम, हिंदी अशा विविध भाषांतील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण व दिग्दर्शन केले. पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, नंदी पुरस्कार व भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार मिळविणारे बालु महेंद्र, हे नामवंत व्यक्ती होते..

No Picture
साहित्य - ललित

वारली’चा वाली

Category:

 

भास्कर कुलकर्णी यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या दिडशेहून अधिक रोजनिशी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व विषयांवर सविस्तर लिहिलेले आहे. ते असामान्य व्यक्तिमत्त्वाचे चित्रकार व संवेदनशील लेखक होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी दरभंग्यात त्यांचे मंदिर उभारले.. आणि एका कलासक्त जीवनाची, आख्यायिका होऊन राहिली…

No Picture
लेखसंग्रह

शिलारसाचा अग्निरोध!

Category:

 

ज्वालामुखीच्या उद्रेकात बाहेर पडणारा शिलारस अत्यंत तप्त असतो. वितळलेल्या खडकांपासून तयार झालेल्या या शिलारसाचं तापमान बाराशे अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. हा अतितप्त शिलारस जळाऊ पदार्थांना सहजपणे आगी लावू शकतो. पण आश्चर्य म्हणजे, आता याच शिलारसाचा अग्निरोधक लेप म्हणून उपयोग करता येणं शक्य असल्याचं दिसून आलं आहे. कारण इतर पदार्थांना आगी लावणारा शिलारस स्वतः मात्र जळत नाही. ऑस्ट्रेलिआतील ‘सेंटर फॉर फ्युचर मटेरिअल्स’ या संस्थेतील पिंगान साँग आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं, या अभिनव अग्निरोधकावरचं हे संशोधन ‘मॅटर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.

No Picture
कथा

भटकंतीतील भुतनी

Category:

 

अखेर मायावतीच्या कड्यावर मला एकट्यालाच जावं लागणार हे निश्चित आहे. नेहमीप्रमाणे सहा महिने आधी सांगूनही इतरांनी काही ना काही सबबी सांगून माघार घेतली. हीच मंडळी नेहमी मी कुठे जाऊन आलो की, ‘अरे, आधी बोलला असतास आम्ही बरोबर आलो असतो,’ असे म्हणणार आणि तिकीटे बुक करायची वेळ आली की सबबी पुढे करणार हे ठरलेले. खरं तर इतक्या वर्षांचा अनुभव लक्षात घेता मला या गोष्टीची सवय व्हायला हवी होती तरीही प्रत्येक वेळी मनाचा चडफडाट व्हायचा तो झालाच!

No Picture
साहित्य - ललित

सागरमाथा

Category:

 

एका सामान्य ओझी वहाणाऱ्या हमालाच्या नशिबात, एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं भाग्य लिहिणाऱ्या चित्रगुप्ताचं, खरंच कौतुक वाटतं.. आज या गोष्टीला एकोणसत्तर वर्षे झालेली असली तरी शेर्पा तेनझिंगला विसरणं कदापि शक्य नाही… त्यांचा तो हसरा चेहरा प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरलेला आहे.. तो पाचवीत पाहिलेला रंगीत फोटो अजूनही स्मरणात आहे… आजपर्यंत शेकडो गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केलेला असला तरी, तेनझिंगची सर त्यांना नाही…

No Picture
साहित्य - ललित

विंडो सीट

Category:

 

आता प्रवासाचे दिवस संपलेले आहेत.. कधी प्रवास केला तर तो खाजगी गाडीने होतो.. तेव्हाही खिडकीतून बाहेर पहाताना पळणारी झाडं, विजेच्या खांबावरील वरखाली होणाऱ्या तारा, एखाद्या पुलावरुन जाताना दिसणारे नदीचे विशाल पात्र, घाटातून गाडी वळताना आपले शरीर शेजारच्या व्यक्तीवर रेलणे हे अनुभवून जुन्या आठवणींना नकळत उजाळा मिळतो व मी गालातल्या गालात हसतो.