Month: January 2021
हार्ट अटॅक रिस्क डिटेक्टर
Category:
आरोग्य लेखसंग्रहआपल्याला डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा आपण स्थूल असाल, सतत तणावाखाली असाल तर फक्त ५ मिनिटात कोणतीही नळी आपल्या रक्तवाहिनीत न घालता किंवा स्ट्रेस टेस्ट न करता फक्त झोपून आपणाला हार्टअटॅक येण्याची काय रिस्क आहे हे सांगणे फक्त ५००-६०० रुपयांत शक्य झाले आहे. या मशिनला कोलिन व्हि.पी. (प्रोफायलर) म्हणतात. यामध्ये आपली कॉम्प्युटराइज्ड नाडी परिक्षा होते ।
प्रेमात? वाट्टेल ते! (लघुकथा)
Category:
साहित्य - ललितवाट पहाणं किती त्रासदायक असत, हे समीरला आज पुन्हा जाणवलं. ‘साल, या पोरींना वेळच महत्वच नसत!’ त्याने सातव्या वेळेला आपल्या मनगटावरील घड्याळातवर नजर टाकली. आख्खे वीस मिनिट, तो या प्रेमदान हॉटेलच्या लॉन वर अंजलीची वाट पाहत होता! धिस इज टू मच! वेटर दोनदा ऑर्डरसाठी घुटमळून गेला होता.
बाबू !
Category:
साहित्य - ललितमाझ्या आयुष्यातून ‘बाबू’ या नावाच्या व्यक्तींना वजा केलेतर, हाती बावांच्याच राहील! इतके ‘बाबू’ माझ्या भूतकाळात ठासून भरलेत. बहुदा गेल्या जन्मी एक जुलमी राजा असेन, आणि माझ्या अत्याचाराला बळी पडलेली जनता, या जन्मी ‘बाबू’ होऊन, बदला घेत असावेत अशी शंका मला येऊ लागली आहे.
नाना !
Category:
साहित्य - ललितखरं तर, या ‘सकाळच्या अलार्म’ला मीच जवाबदार आहे! एकदा सकाळी, नानाला माझ्या घरासमोरच्या जास्वंदीचे फुल तोडताना पाहिलं. घर भाड्याचं आहे तरी, घरासमोर मी, चारसहा फुलांचे झाड जोपासली आहेत. त्या दिवशी काय मला काय अवदसा सुचली कोणास ठाऊक? त्यांच्यावर उखडलो.
आभाळाएवढा !
Category:
साहित्य - ललितत्यानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि तो एकदम मोठा होऊन गेला . मोठा म्हणजे अगदी खूपच मोठा . आभाळा एवढ्या उंचीचा आणि समुद्रएवढ्या खोलीचा . अर्थात उंची होतीच पहिल्यापासून पण कुणाला दिसली नव्हती . अर्थात चिरपरिचित असल्यानं ती कुणाला जाणवली नव्हती .
शंकर मुडके!
Category:
साहित्य - ललितसकाळचे ते ‘गोल्डन अवर्स’ होते. पहिला चहा झाला होता. लोखंडी गेटच्या बेचक्यात, पेपरवाल्या पोराने खुसून ठेवलेला पेपर, मी काढून घेतला. चारदोन ठिकाणी हुडकल्यावर चष्मा सापडला आणि तो नाकावर चढवून, पेपर पालथा घातला आणि वाचायच्या विचारात होतो. हो, मी पेपर मागच्या पानापासूनच वाचायला सुरुवात करत असतो! “काय? सुरेशअण्णा हैती का घरात?” मी एकदम दचकलोच.
ऑटो भास्कर!
Category:
साहित्य - ललितहा माझ्या म्हातारपणाचा आधार आहे! तुम्ही म्हणाल मी मुलाबद्दल बोलतोय. पण तसे नाही. मी ऑटो भास्कर बद्दल बोलतोय. हो, याच नावाने तो ओळखला जातो. आणि याच नावाने,तो आपली ओळखपण सांगतो.
सांगतो वडिलांची कीर्ती
Category:
साहित्य - ललितसखाराम कृष्ण जोशी हे नाव व्यवहारापुरतं , प्रत्यक्षात बापुकाका जोशी हीच सर्वत्र ओळख . भिक्षुकी करताना आजच्या हिशोबात सांगायचं तर दहा पंधरा मैल चालायचं , घाटया, डोंगर चढायचे आणि मिळेल त्या रुपया दोन रुपये दक्षिणेवर समाधान मानून घरी परतायचं . यात आयुष्य सरलं. पण चेहऱ्यावरचा आनंद , स्वभावातला सरळपणा आणि वृत्तीतला प्रामाणिकपणा हरवला नाही शेवटपर्यंत .
किचन गुरु!
Category:
साहित्य - ललितमाझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो.