No Picture
साहित्य - ललित

माझे डॉक्टर – ३ – दंतकथा

Category:

 

दात दुखी अन कानदुखी या दोन दुखण्याचं सूर्यनारायणाशी काय वैर्य आहे माहित नाही. हि दोन दुखणी सुर्यास्थानांतर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर, जेवण खाण करून अंथरुणाला पाठ टेकवली कि डोकं वर काढतात! कानातला ठणका आणि दाढेची कळ साधारण रात्री अकरा नंतर जोर धरते! का माहित नाही. आमच्या लहानपणच्या सगळ्या गोष्टी बदलून गेल्यात. पण या दोन दुखण्याच्या वेळात काडीचाही फरक पडलेला नाही!

No Picture
साहित्य - ललित

माझे डॉक्टर – २

Category:

 

डॉक्टर आणि शिक्षकी पेशा हे दोन थोर व्यायसाय आहेत. याना नोबल व्यवसाय म्हटलं जात. माझा एक मोठा भाऊ इंजिनियरला होता. त्याकाळच्या अपेक्षेप्रमाणे एक पोरगा इंजिनियर आणि एक डॉक्टर असावा हि आमच्या घरच्यांची पण इच्छा होती. पण ‘आशा हे दुःखाचे मूळ कारण आहे!’ हे तत्व, ते जरी विसरले असले तरी, नियती विसरली नव्हती! आणि मलाच मुळात ‘शिक्षक’ व्हायचे होते!

No Picture
साहित्य - ललित

माझे डॉक्टर – १

Category:

 

डॉक्टर म्हणजे डॉक्टर असतो, तुमचा आमचा सेम असतो!’ असं कोण म्हणत? तर असं मीच म्हणतो. मंगेश पाडगावकरांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत.’ या त्यांच्या कवितेला रट्टाऊन टाळ्या दिल्या तशी दाद माझ्या वाक्याला देणार नाही हे मी जाणून आहे. कारण तुम्ही म्हणाल, ‘याला काय माहित आमचे डॉक्टर?’ हे अगदी खरं आहे. पण मला माझे काही डॉक्टर चांगलेच माहित आहेत. ते मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही तुमचे डॉक्टर त्यांच्याशी ताडून पहा. काही साम्य सापडले तर मात्र, टाळी द्यायला विसरू नका. 

No Picture
साहित्य - ललित

मोरूचा बाप, मोरुला म्हणाला

Category:

 

मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’

No Picture
साहित्य - ललित

शेतकऱ्याची मूर्ती (अलक)

Category:

 

प्रदर्शनाला अलोट गर्दी झाली होती. तशी ती रोज होत होती .लोंढेच्या लोंढे येत होते आणि , वॉव , क्युट , एक्सलंट असे चित्कारत बाहेर पडत होते. बाहेर पडण्यापूर्वी मात्र सगळी गर्दी अचंब्यानं थांबत होती . कारण तिथे प्रदर्शनार्थ ठेवलेली वस्तू सूक्ष्मदर्शकानं पहावी लागत होती .

No Picture
साहित्य - ललित

आजची संध्याकाळ माझ्यासाठी खास होती

Category:

 

मी नमस्कार करून गाडीकडे वळलो. गाडी सुरू करताना सहज म्हणून पाठी पाहिलं. दोघेही हसत होते आणि हात हलवून निरोप देत होते.

No Picture
साहित्य - ललित

छोटीला काय उत्तर द्यायचं (अलक)

Category:

 

नवरात्राच्या दहा दिवसांत दरवर्षी होणारी कमाई लक्षात घेऊन तिनं रस्त्याच्या कडेला दुकान थाटलं होतं.

No Picture
साहित्य - ललित

आभाळाचे खांब : २

Category:

 

दादासाहेब सर्वांच्या आदराचं स्थान होते. रंगभूमीवरील अनभिषिक्त राजे होते. गेली पन्नास वर्षे अथकपणे त्यांनी रंगभूमीची सेवा केली होती. असंख्य कलाकारांना घडविण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. संपूर्ण कारकीर्द यशस्वी, हाऊसफुल गर्दीनं भरलेली आणि निष्कलंक अशी होती. त्यामुळं त्यांना जीवनगौरव जाहीर झाला आणि समाजाच्या सर्वच क्षेत्रातून आदरयुक्त कौतुकाचा वर्षांव झाला होता. त्याचं प्रतिबिंब आजच्या समारंभात उमटलं होतं.