टक्कल पुराण
Category:
साहित्य - ललितमला ‘बाल’वयात जेंव्हा टक्कलाविषयी फारशी माहीती नव्हती तेंव्हा वाटायच की काही लोक जसे केस वाढवतात तसेच काही प्रतिस्पर्धी लोक टक्कल वाढवत असावेत. वाढत्या वयानुसार टक्कलांचे विविध आकार तसेच तुरळक केसांचा त्याच्या अवती भवतीचा वावर हा माझ्या टक्कलाविषयीच्या उत्कंठेचा केंद्रबिंदु होत गेला. टक्कल या विषयाचा खोलवर विचार करत करत आता तर माझेही केस झडत जाउन मीही स्वयंप्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे परंतु तरीही माझा त्याविषयीचा अभ्यास तितक्याच चिकाटीने चालू आहे.