दलाल पर्व’
Category:
साहित्य - ललितगोव्यामधील मडगाव हे छोटंसं निसर्गसुंदर गाव. गावातील एकमेव शाळेतील पाचवीचा वर्ग. वर्गावरचे मास्तर रजेवर असल्याने मुख्याध्यापक वर्गात आले. त्यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. पहिल्या बाकावरील एक मुलगा गोष्ट ऐकता ऐकता मुख्याध्यापकांचे पेन्सिलीने वहीमध्ये चित्र रेखाटत होता.