माझा वाढदिवस
Category:
साहित्य - ललितआज मी ७८ वर्षांचा झालो. म्हणजे ७९वे वर्ष सुरू झालं. ज्येष्ठ की वृध्द की जरठ म्हणायचं स्वतःला? पूर्वी म्हातारा पाहिला की शारदा नाटकांतल पद आठवायचं! ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान.’ त्यांत दिलेला सर्व विनोदी तपशील नाही तरी कांही वर्णन तर आता या वयात लागू पडतंच.