No Picture
साहित्य - ललित

दिवाळी अंक आणि मराठी माणूस

Category:

 

मराठी भाषेचा, मराठी माणसांचा किंवा महाराष्ट्राचा सर्वात मोठा साहित्योत्सव कोणता? यात मतभेद होण्याची शक्यताच नाही. सर्वांचं एका आवाजात उत्तर येईल – ‘दिवाळी अंक’. या उत्सवाचा ‘दिवाळी मुहूर्त’ कायम आहे हे त्याचं आणखी एक वेगळेपण. मराठीत ‘मनोरंजन’ मासिकाचा पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रकाशित झाला. दिवाळी अंक म्हणजे मराठी भाषे अक्षर वैभव ! १०६ वर्षे मराठी भाषेचा हा साहित्यजागर होत आहे आणि यापुढेही होत राहील.

No Picture
लेखसंग्रह

प्राचीन भारतांतील विमाने

Category:

 

कोणत्याही ज्ञानशाखेचा विषय निघाला की, ही शाखा आमच्या पूर्वजांना पूर्णपणें माहिती होती असें सांगणारे कांही लोक भेटतात. तर काहींचें म्हणणे असें असतें की, भारतांत असणारें ज्ञान है परभृत आहे. भारतीयांनी त्यांत स्वतःची अशी कोणतीहि भर घातली नाही. त्यांनी स्वतः काहीहि नवीन निर्माण केलें नाही. विचारांच्या या दोन्ही टोकांपैकी एकांत भारताच्या अभिनिवेशी अतिगौरवाचा भाग असतो, तर दुसऱ्यांतून न्यूनगंडाने पछाडलेल्या दुबळ्या मनोवृत्तीचें दिग्दर्शन असतें. परंतु कोणत्याहि परिस्थितीचें वास्तव ज्ञान हें प्रगतीला पोषक असतें. या वास्तवज्ञानाचा एक भाग म्हणून आज प्राचीन भारतांत असलेल्या काही विमानांचा परिचय घडविण्याचें ठरविलें आहे.

No Picture
लेखसंग्रह

‘ऑगस्ट’चे अधिपती’ (ऑगस्ट महिन्यात जन्मलेले प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू )

Category:

 

‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या नेतृत्वगुण असलेल्या, विचारी, प्रभावी संवादकौशल्य जपणाऱ्या असल्याचे मानले जाते. ‘ऑगस्ट’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.

No Picture
लेखसंग्रह

अंशुमन गायकवाड – क्रिकेटमधला लढवय्या सरदार

Category:

 

उंच आणि चष्मिस अंशुमनचा कॉलेजमध्ये असतानाच १७ व्या वर्षी बडोद्याच्या रणजी संघात समावेश झाला. बडोदा आणि पश्चिम विभागासाठी ६ वर्षे धावांच्या राशी ओतल्यावर अखेर डिसेंबर १९७४ मध्ये अंशुमनचा वेस्ट इंडिजविरुद्ध कलकत्ता कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला.

No Picture
साहित्य - ललित

कल्हईवाला – जुनी आठवण

Category:

 

स्टीलच्या, हिंडालियमच्या भांड्यांची चलती असली तरी या जमान्यात पितळी भांडीसुद्धा वापरली जातात. साहजिकच कल्हई करणे आले. दारी येणारा कल्हईवाला तात्काळ सेवा देणारा असतो.

No Picture
लेखसंग्रह

कुतुब मिनार – भारताच्या इतिहासावरील दरोड्याचा साक्षीदार

Category:

 

तथाकथित मशीद म्हणून दाखवल्या जाणाऱ्या या इमारतीच्या बाजूला एक बांधकाम उभे आहे त्याला ‘सराई’ म्हटले जाते. ‘सराई’ हा हिंदी-उर्दू शब्द सोडला तर त्या इमारतीत ‘मुस्लीम’ म्हणण्यासारखे काहीच नाही. ‘सराई’ म्हणजे यात्रेकरू किंवा प्रवाशांसाठी बांधलेला निवारा – धर्मशाळा. आपण महाराष्ट्रात त्यांना ‘ओवऱ्या’ म्हणतो.

No Picture
लेखसंग्रह

नावात काय नाही?

Category:

 

भारतात गाजणारा एक विषय आहे तो म्हणजे नामांतराचा, जे नाव सध्या आहे ते बदलण्याच्या मागणीचा. हे नाव कशाचेही असू शकते. रस्ता, चौक, बाग, शहर, जिल्हा, राज्य यांचे वा बस स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळ यांचे वा विद्यापीठ, आस्थापना यांचे. स्वतःचे नाव बदलणारांची दखल बाकीच्यांनी घ्यायची गरज नसते. पण या सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यासाठी जनमताचा कौल घ्यावा लागतो. नाव बदलण्याचा आग्रह धरणारे ‘नावात काय नाही’ ची वाट धरणारे असतात.

No Picture
लेखसंग्रह

दत्ताजीराव गायकवाड – भारतीय क्रिकेटचे पितामह

Category:

 

दूर असले तरी मार्गदर्शक वाटणारे अनेक जुने तारे कालौघात निखळून पडत असतात. भारतीय क्रिकेटच्या प्रांगणातून यावर्षी आपल्यापासून दूर गेलेला, स्वातंत्र्यपूर्व काळाशी नाळ जुळलेला असाच एक तारा म्हणजे ‘दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड’. बडोदा (आत्ताचे–वडोदरा) येथे २७ ऑक्टोबर १९२८ रोजी जन्मलेले ‘डीके’ या टोपणनावाने प्रसिद्ध दत्ताजी बडोद्याच्या प्रतिष्ठित ‘गायकवाड’ राजघराण्याशी संबंधित होते.

No Picture
लेखसंग्रह

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बँकिंग

Category:

 

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) अर्थात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही गोष्ट अलीकडच्या वर्षांत आपल्या तंत्रज्ञानाधिष्ठित जगण्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान मानले जाते आणि बँकांनी सर्वात आधी हे तंत्रज्ञान त्यांच्या सेवांमध्ये समाविष्ट करण्यास सुरवात केली आहे. अलिकडची आकडेवारी दर्शविते की बँकिंग क्षेत्र सेवा, कार्यक्षमता आणि उत्पादकता सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी ‘AI’ चा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे.

No Picture
लेखसंग्रह

कथा क्रेडिट कार्डच्या उत्क्रांतीची

Category:

 

व्यवहारात चलन व नाण्यांचा शोध लागण्यापूर्वी आपल्या देशात व जगातही अनेक ठिकाणी ‘बार्टर सिस्टिम’ किंवा ‘वस्तु-विनिमय प्रणाली’ वापरली जात असे. नंतर दगड तसेच लोखंड, जस्त, कथिल, सोने, चांदी, तांबा, पितळ इत्यादि धातूंची नाणी वापरली जाऊ लागली. पण जसा कागदाचा शोध लागला तश्या कागदाच्या चलनी नोटा व्यवहारात अधिक वापरल्या जाऊ लागल्या.