रुद्रा – कादंबरी – भाग १२
Category:
साहित्य - ललितकालच्या ‘राजयोग’ डिनरच्या वेळची राधाने दिलेली माहिती राघव पुन्हा पुन्हा आठवत होता.आणि त्या बरोबर खळखळून हसणारी सुंदर राधा पण नजरे समोरून हालत नव्हती! तरी त्याने आपले मन केस वर फोकस केले. तो मनोहर नेमका कोण होता? तो संतुकरावांना कशासाठी भेटायला गेला होता? त्या दोघात कसलेही साम्य नव्हते.