सोलापूर – दळणवळण
Category:
शहरे आणि गावेसोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई -चेन्नई, सोलापूर – विजापूर व मिरज – लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, भुवनेश्र्वर, बेंगलोर, हैदराबाद ही अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत. हे रेल्वेदृष्ट्या दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे.