डोंबिवली – भौगोलिक आणि दळणवळण
Category:
शहरे आणि गावे - tempडोंबिवली शहर अक्षवृत्त – १९. २१८४३३ ° N आणि रेखावृत्त – ७३. ०८६७१८ ° E वर वसलेले आहे.
डोंबिवली शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची १३. ५३४ मीटर्स (४४. ४०३ फूट) आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ४८ किमी आहे. कल्याण रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ४ किमी असून ठाणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर १४ किमी आहे.