ॲव्हलेबिलीटी कार्ड
Category:
लेखसंग्रहजहाजावरून घरी जायचं कन्फर्म झाले की साईन ऑफ पेपर वर्क सुरू होते. रीलिवर नसेल तर खूपच कमी वेळा विदाऊट रिलिवर साईन ऑफ केले जाते. साईन ऑफ म्हणजे प्रत्येक खलाशासाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सर्वात आनंदाचा योग असतो. जहाजावर प्रत्येक वेळी प्रत्येक जण पहिलं पाऊल टाकता क्षणी आपला साईन ऑफ होऊन घरी कधी जाऊ याचा विचार करायला सुरुवात करतो. मग एक एक दिवस आणि एक एक क्षण मोजायला सुरुवात होते.