p-65-surlichya-vadya-300
खाद्ययात्रा

सुरळीच्या पाटवड्या

Category:

 

जाड बुडाच्या पातेल्यात डाळीचे पीठ, ताक, पाणी, तिखट, मीठ, हिंग, हळद घालुन मिश्रण सारखे करावे. गुठळी राहु देऊ नये. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून मिश्रण डावेने ढवळत रहावे. खाली लागू देऊ नये. मिश्रण दाटसर होत आले की झाकण ठेवून वाफ आणावी. वरील पातेल्यातील १/४ चमचा मिश्रण एका स्टीलच्या थाळीला पसरुन लावून पहावे.

गार झाल्यावर जर ते उचलले तर चटकन निघाले पाहिजे. ही मिश्रण शिजल्याची खूण आहे. जर असे चटकन निघाले नाही तर पुन्हा एक वाफ आणावी. नंतर मंद गॅसवर मिश्रण ठेवून द्यावे.

p-40-Tandul-kheer-300
खाद्ययात्रा

तांदुळाची खीर

Category:

 

तांदूळ धुवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावेत. दूध तापवून त्याला उकळी आली की त्यात तांदूळ घालावे व सतत ढवळत राहावे.
सुमारे तीस मिनिटे मंद गॅसवर शिजवावे. तांदळाचा दाणा हाताने दाबून पाहावा. मऊ झालेला असला व चटकन दाबला गेला की साखर घालावी व पाच मिनिटे आणखी चुलीवर ठेवून ढवळत राहावे. फार दाट वाटल्यास कपभर दूध घालावे. खाली उतरवून खीर गार झाली की त्यात वेलचीपूड व काजू, बेदाणे घालावे. ही खीर जेवणानंतर पुडिंगसारखी बाऊलमध्ये घालून खायला द्यावी.

p-24 - Aloo-Paratha
खाद्ययात्रा

आलू पराठा

Category:

 

बटाटे चांगले उकडून थंड झाल्यावर सोलावेत. मिरची,आते यांची पेस्ट करावी. बटाटे थंड झाल्यावर किसून घ्यावेत किंवा कुस्करावेत. यात मिरची, आल्याची पेस्ट, जिरे पावडर, चवीपुरते मीठ व बारीक कोथिंबीर घासून चांगले मळावे. हे झाले सारण. कणीक चाळून कणीक व मैदा साधारण घट्ट भिजवून तयार केलेल्या सारणाचे लहान-लहान गोळे करावेत. गोळ्याच्या दीडपट आकाराचे पिठाचे गोळे करून त्यात पुरणाच्या पोळीप्रमाणे सारण भरावे व हलक्या हाताने पराठे लाटावेततव्यावर थोडे-थोडे तेल घालून दोन्ही बाजूंनी पराठे गुलाबी रंगावर भाजावेत.

p-55-besan-ladu
खाद्ययात्रा

बेसन लाडू

Category:

 

तुपावर डाळीचे पीठ खमंग भाजून घ्या. छान वास आला की त्यावर दूध शिंपडून बाजूला ठेवा. मिश्रण कोमट झाले की त्यात पिठीसाखर, वेलदोडे, जायफळ, बेदाणा, काजू घालून मिश्रण कालवा. नंतर त्याचे बेताच्या आकाराचे लाडू वळा. मोदकाच्या साच्याला पातळ तुपाचा हात फिरवावा व प्रत्येक लाडू साच्यातून काढावा. आकाराच्या नाविन्यामुळे छान दिसतात.

Paneer-butter-masala
खाद्ययात्रा

पनीर बटर मसाला

Category:

 

कांदा आणि पनीर तळून घ्यावे. दूध वापरुन काजू थोडे वाटून घ्यावे. टोमॅटो व तळलेला कांदा बरोबर वाटावा. एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात जीरे व खडा मसाला टाकावा. त्यानंतर त्यात आले व लसणाची पेस्ट टाकवी. नंतर वाटलेला कांदा व टोमॅटो टाकावे. या सर्वांना मिक्स करून मीठ, मिरची व गरम मसाला टाकावा. कसुरी मेथीही टाकावी. शिजल्यानंतर वरून पनीर, दही, कोथिंबीर व क्रीम टाकुनघालून सजवावे.

p-87 - tikhat-mithacha-sanja-300
खाद्ययात्रा

तिखट मीठाचा सांजा

Category:

 

प्रथम रवा चांगला भाजून घ्यावा. एका कढईत तेल तापवत ठेवावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, कडीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. १ लहान चमचा मीठ घालावे व कांदा चांगला शिजू द्यावा. कांदा नीट शिजला की त्यात रवा घालावा.

दुसर्‍या भांड्यात पाणी तापवत ठेवावे. रवा थोडावेळ कांद्याबरोबर परतावा. पाणी उकळले की भाजलेल्या रव्यात ओतावे. नीट मिक्स करावे. त्यात साखर व आवश्यकतेनुसार मीठ घालावे. एक वाफ काढावी. अशाप्रकारे तिखट मीठाचा सांजा तयार. यावर सजावटीसाठी आपण कोथिंबीर व खोवलेला नारळ घालू शकतो.

p-75 - Bhajyanchi-Khichdi
खाद्ययात्रा

भाज्यांची खिचडी

Category:

 

सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरुन ठेवाव्यात. एका पातेल्यात तूप घालून जिरे, हिंग, मोहरी घालून फोडणी करा. त्यात मिरी दाणे, हळद, दालचिनी लवंगा, हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य व आलं-लसणाचे वाटण टाकून परता. मग कांदा परता. तो लालसर होत आला की त्यात टोमॅटो घाला. त्याला वर तेल सुटायला लागलं की मग सर्व चिरलेल्या भाज्या घाला. परता. भाज्या लालसर झाल्यावर त्यात डाळ व तांदूळ घाला. परता. व पाणी आणि मीठ घालून शिजवा. अशाप्रकारे गरमागरम भाज्यांची खिचडी तयार.

chakali
खाद्ययात्रा

चकली

Category:

 

सर्व सामग्री मिसळा. पाणी कालवून गरम कणके सारखे मळा. चकलीच्या साच्यात मिश्रण भरून गोल आकारात पिळून गरम तेलात तळा. हवा बंद डब्यात बरेच दिवस साठवून ठेवता येते.