No Picture
साहित्य - ललित

कैलास दर्शन – भाग 1

Category:

 

गोष्ट फार जुनी आहे. चाळीस वर्षे झाली त्या गोष्टीला. मी सरकारी नोकरीत होतो. उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ औरंगाबाद विभाग प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली होती तेव्हाची.

No Picture
साहित्य - ललित

अकल्पित (भाग – 3)

Category:

 

“सकाळी मला जाग आली ती दारावर कुणीतरी जोरजोरात धक्के मारत होते त्या आवाजाने. मी जागी झाले आणि मनात पहिला विचार आला तो ह्यांचा. आम्हा दोघांना एकत्र पाहिले तर आमची धडगत नाही या विचाराने माझा थरकाप झाला. मी चटकन शेजारी सूर्यकांत राजेंना उठवावे म्हणून पाहते तर तिथे कुणीच नाही! या सगळ्या विचारात एखादा क्षण गेला असेल नसेल तो पर्यंत दरवाजा आता मोडतोय की काय असे प्रचंड धक्के बसू लागले. मी घाईघाईने उठून दरवाजा उघडला तो समोर राणीसाहेब, म्हणजे माझ्या सासूबाई! त्यांनी एकदम हंबरडा फोडला आणि माझ्या अंगावर खेकसून ओरडल्या, “ही! ही! चांडाळीण, पांढऱ्या पायाची अवदसा! हिने खाल्ले माझ्या पोराला. चल चालती हो माझ्या घरातून!” असे म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि मला ओढू लागल्या. लोकांनी त्यांना आवरले. खाली दिवाणखान्यातून प्रचंड रडारडीचा आवाज येत होता. मी अगदी भांबावून गेले. मला कळेना हा काय प्रकार आहे? जिन्यावरून धावत धावत खाली आले तर हॉलमध्ये पांढऱ्या चादरीत सूर्यकांत राजेंना झाकून ठेवलेले! आसपास शिकारीला गेलेली सगळी मंडळी माना खाली घालून उभी!

No Picture
साहित्य - ललित

अकल्पित (भाग 2)

Category:

 

घरी गेल्यावर मी पाचगणीला आईला मोबाईलवरून झालेली घटना सांगितली. ती म्हणाली, “अजितराजे, राजासमोर कुणी कसे बोलावे हे लोकांना कळत नाही. पण हे नेहमीचे उत्तर मला काही पटले नाही. एखाद्याच्या केवळ नजरेने एखाद्याची हृदयक्रिया बंद पडावी आणि त्यात त्याचा जीव जावा हे मला फारच विचित्र वाटले. आजपर्यंत माझ्या नजरेत अनोखी जरब आहे हे मला दिसत होते आणि त्याचा मी फार गांभीर्याने विचार करत नव्हतो.

No Picture
साहित्य - ललित

अकल्पित (भाग – 1)

Category:

 

मलबार हिलच्या नारायण दाभोळकर रोडवरच्या श्रीमंत वस्तीत ही वीस मजली इमारत. या इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील पाचहजार चौरस फुटाचा हा अलिशान टेरेस फ्लॅट माझ्या मालकीचा आहे. मी आज एक तीस वर्षांचा तरुण उद्योजक आहे. संपूर्ण देशभर माझ्या उद्योगाचे जाळे पसरले आहे. हे सर्व वैभव मी माझ्या हुशारीने कमावले आहे. अर्थात माझ्या आईचा फार मोठा सहभाग आहे. नव्हे, आज मी जो काही आहे तो तिच्यामुळेच.

No Picture
साहित्य - ललित

क्रोधः पापस्य कारणम् (कथा)

Category:

 

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू आहेत. त्यांच्या पासून सावध असावे असे नीती तत्त्व सांगते. पण प्रत्येक गुन्ह्यामागे ते दडलेले असतात. चांगल्या भल्या माणसांनाही ते कधी आणि कसे गाठतील सांगता येत नाही. म्हणूनच म्हटले आहे, ‘क्रोधः पापस्य कारणम्।’

No Picture
साहित्य - ललित

दौलतजादा (रहस्यकथा)

Category:

 

प्रवीण देसाई. इंपोर्ट – एक्सपोर्ट व्यापारी. नुसताच व्यापारी नव्हे तर त्या व्यवसायातला बादशहा. आता बादशहा म्हटला म्हणजे धनदौलत मजबूतच असणार हो. तसा पैसा बक्कळ होता. अगदी ऐषआरामात लोळतच होता तो! तर अशी दौलतजादा झाली म्हणजे काही लोकांना ती सत्कार्याला लावावी, गोरगरिबांना दानधर्म करावा, शैक्षणिक संस्थांना मदत करावी, विधायक कामाला लावावी असे वाटते. पण असं वाटणारे फार थोडे असतात. बहुतेक वेळा लक्ष्मी आली की सद् विचार आणि सरस्वती पळ काढतात. सरस्वती आणि लक्ष्मीचे पटत नाही म्हणतात. फार पुण्याई लागते तेव्हाच त्यांचे पटते.

No Picture
साहित्य - ललित

जरा विचार करा

Category:

 

पण ही खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे का? इतक्या लहान मुलाने हा अविचार का केला असावा याचा विचार करण्याची आवश्यकता आहे असे नाही वाटत? कोणत्या परिस्थितीमुळे हा मुलगा गुन्हेगारी विचाराकडे वळला?

No Picture
साहित्य - ललित

इन्स्पेक्टर सावंत…. क्राईम ब्रॅंच बोलतोय !!!!

Category:

 

डोंबिवलीत घडलेल्या एका खंडणीप्रकरणाची चौकशी आणि तपासकथा….. एका सत्य घटनेवर आधारित….

No Picture
साहित्य - ललित

मुंबईची का. क योजना

Category:

 

रोजची पहाट या प्रसिद्ध दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट, श्री सूर्याजीराव रवीसांडे आपल्या दाढीचे खुंट खाजवत अत्यंत खिन्न मुद्रेने बसले होते. दर आठवड्याला एक विशेषांक ही रोजची पहाट ची खासियत आणि त्यातूनही गुढीपाडव्याचा विशेषांक हा तर खूप मानाचा.