गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर
कथा

गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर

Category:

 

एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण? हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश? भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही?