No Picture
साहित्य - ललित

या वर्षीच्या दिवाळीत…

Category:

 

“कैक चॅनलवाले रोज इथं येत आहेत. आमच्यातल्या कुणाला तरी धरून, रडायला भाग पाडून शूटिंग करताहेत. बाईट घेताहेत आणि न्यूज चॅनलवर दाखवून टीआरपी वाढवत आहेत. आमचा बाजार मांडलाय तुम्ही.”
गावकरी संतापले. तो बावरला.

No Picture
साहित्य - ललित

पानगळीचे दिवस (कथा – सांगोपांग : ४)

Category:

 

तसं पाहायला गेलं तर ही कथा एका चौकोनी कुटुंबाची , उपनगरातील एखाद्या ब्लॉकमध्ये घडणारी आहे. पण मांडणी करताना त्या फ्रेममध्ये दरवेळी बाह्य जगातील संदर्भ येत जातात आणि मग ती कथा एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता अनेकांची होऊन जाते. निष्पर्ण वृक्षाबद्दलचं प्रेम , आपुलकी मनात उगवत जाते आणि पानगळीचे दिवस सुसह्य होऊन जातात.

No Picture
साहित्य - ललित

प्रश्नोपनिषद (कथा – सांगोपांग : ३)

Category:

 

आजूबाजूला बळी पडणारी नवीन पिढी दिसत होती. मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था नोकरीच्या आशेनं कर्जबाजारी होताना आणि नंतर उद्ध्वस्त होताना दिसत होती. सगळं वास्तव त्या प्रश्नोपनिषदातून मनाला हलवून टाकत होतं. त्यामुळं कथेला शीर्षक सुचलं होतं . प्रश्नोपनिषद

No Picture
साहित्य - ललित

ड्रॉवर (कथा – सांगोपांग : १)

Category:

 

कथा लिहिताना फ्लॅशबॅक तंत्राचा , वर्तमानातल्या भानाचा , छोट्या छोट्या प्रसंगांचा , आशयघन संवादाचा उपयोग केल्याने कथेला वेगळी गती प्राप्त झाली . कथेतील किचन , आरसा , बस ही सगळी पात्रं म्हणून अवतरली . १९९९ मधली कथा असली तरी आत्ताच्या गतिमान युगातील जोडप्यांची व्यथा मांडणारी कथा म्हणून आजही ती तितकीच वाचनीय वाटते . आजही ड्रॉवर उघडला की ड्रॉवर ची निर्मिती प्रक्रिया आठवते.

No Picture
साहित्य - ललित

कथा – सांगोपांग

Category:

 

वाटलं , आपण आपल्याच काही निवडक कथांकडे अलिप्तपणे पाहिलं तर … त्या कथांचा सांगोपांग विचार केला तर… लेखन करताना , कथा प्रसिद्ध झाल्यावर , त्यावर वाचकांचा प्रतिसाद लाभल्यावर जसा आनंद मिळत होता , तसा आता इतक्या वर्षांनी , जरा वेगळ्या पद्धतीने कथांकडे पाहिल्यावर आनंद मिळू शकतो. तोच हा प्रयत्न आहे. कथा सांगोपांग !

No Picture
साहित्य - ललित

मोरूचा बाप, मोरुला म्हणाला

Category:

 

मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’

No Picture
साहित्य - ललित

शेतकऱ्याची मूर्ती (अलक)

Category:

 

प्रदर्शनाला अलोट गर्दी झाली होती. तशी ती रोज होत होती .लोंढेच्या लोंढे येत होते आणि , वॉव , क्युट , एक्सलंट असे चित्कारत बाहेर पडत होते. बाहेर पडण्यापूर्वी मात्र सगळी गर्दी अचंब्यानं थांबत होती . कारण तिथे प्रदर्शनार्थ ठेवलेली वस्तू सूक्ष्मदर्शकानं पहावी लागत होती .

No Picture
साहित्य - ललित

आजची संध्याकाळ माझ्यासाठी खास होती

Category:

 

मी नमस्कार करून गाडीकडे वळलो. गाडी सुरू करताना सहज म्हणून पाठी पाहिलं. दोघेही हसत होते आणि हात हलवून निरोप देत होते.

No Picture
साहित्य - ललित

छोटीला काय उत्तर द्यायचं (अलक)

Category:

 

नवरात्राच्या दहा दिवसांत दरवर्षी होणारी कमाई लक्षात घेऊन तिनं रस्त्याच्या कडेला दुकान थाटलं होतं.