तो रविवार (कथा)
Category:
कथा साहित्य - ललिततो रविवार मला अजूनही आठवतो आणि डोळ्यातून अलगद पाणी येते. कारण तो काळ आमच्यावरही आला होता पण त्यास प्रेमाने हरविले. आज आमच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली. अशा संकटास दोघेही चोख प्रत्युत्तर देत आहोत,.
Category:
कथा साहित्य - ललिततो रविवार मला अजूनही आठवतो आणि डोळ्यातून अलगद पाणी येते. कारण तो काळ आमच्यावरही आला होता पण त्यास प्रेमाने हरविले. आज आमच्या लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली. अशा संकटास दोघेही चोख प्रत्युत्तर देत आहोत,.
Category:
कथा साहित्य - ललितखिडकीतून नजरेस पडणारी सूर्याची लालबुंद चकती एव्हाना क्षितिजाआड लुप्त झाली होती. आकाशात चंद्राची चंद्रकोर डोकं वर काढीत होती. ताऱ्यांचा अंधूक प्रकाश धुक्यातून वाट काढीत आल्यासारखा वाटत होता. कातरवेळेने परिसराचा कब्जा घेतला होता. तोच दरवाजाची बेल वाजली. मम्मीने दार उघडलं. महेश कामावरून परतला होता. येतायेताच त्याने विचारलं, “रुबी कुठाय?”
Category:
कथा साहित्य - ललितअनघा प्रकाशन आयोजित कथास्पर्धेत सौ प्राची गडकरी यांनी लिहिलेली प्रथम क्रमांक प्राप्त कथा
Category:
कथा साहित्य - ललितमुंबईच्या दौऱ्यात एक दिवस रिकामा होता. खूप दिवस झालेत, दिवस काय वर्षं झालीत विठूला भेटलो नव्हतो. ठरवलं, जमलं तर भेटायचं. खूप ऐकलं होतं त्याच्या गरुड भरारीबद्दल. त्यामुळे खूप बोलायचं होतं. बरंच काही जाणून घ्यायचं होतं.
Category:
कथा साहित्य - ललितसौरभ शाळेतून घरी आला तोचमुळी आनंदात आणि का येऊ नये? गायन स्पर्धेत पहिला आला होता तो. सौरभ गिरकी घेत घरात शिरला. शाळेचे दप्तर कोचावर धाडकन फेकले. अंगातला युनिफॉर्म तसाच भिरकावला आणि तो मोठ्याने गाणे बडबडू लागला. “सौरभ, अरे काय चालले आहे?” आईने विचारले. “तू काय आता लहान आहेस? काय हा पसारा मांडून ठेवला आहेस. अरे, नववीत आहेस. जरा नीट वाग.” सौरभ म्हणाला, “अगं आई, मी आज शाळेत गायन परीक्षेत पहिला आलो.” ‘अरे वा! उत्तम! अभिनंदन! म्हणून तुला कसंही वागायला परवानगी नाही मिळाली.” आई म्हणाली. ‘आधी बूट जाग्यावर ठेव, दप्तर कपाटात जाऊ दे आणि युनिफॉर्म धुवायला जाऊ देत. आधी हातपाय धुवून घे. आधी खाऊन घे आणि खाऊन झाल्यावर खेळायला जा.’ “हो. तु टीचरसारखी छडी घेऊन मागे लाग माझ्या. नाहीतरी तु टीचर आहेसच.” “हो. आहेच मी शिक्षिका.” आई म्हणाली. “आणि मी जे काही सांगते आहे ते तुझ्या भल्यासाठीच सांगते आहे.” “हो कळलं.’ सौरभ म्हणाला, “सारखे लेक्चर नकोय मला. मी गायनाच्या परीक्षेत पहिला आलो त्याचे कौतुक राहिले दूर.” “तसं नाही रे राजा,” आई म्हणाली, “कौतुक तर आहेच पण तू चांगलं वागावंस हीच माझी इच्छा आहे रे. मी कोणी तुझी शत्रू का आहे?” हे चालू असताना सौरभची आजी बेडरूममधून बाहेर आली. ती सगळे “आत ऐकत होती. ती म्हणाली, “अगं, राहू देत. आज तो इतक्या खुशीत आहे तर त्याच्या आनंदात विरजण घालू नकोस.’ अलका म्हणाली, “अहो आई, पण म्हणून त्याने बेशिस्तीने वागावे असे नव्हे ना. मी काय त्याची वैरीण आहे का? त्याने स्वत:चे स्वत: आवरावे, खाऊन घ्यावे आणि खेळायला जावे यात कसले आले विरजण! अहो, आजकालची मुले मैदानी खेळ खेळत नाहीत त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास होत नाही. शारीरिक हालचालींमुळे त्यांचे शरीर सुदृढ राहते मानसिक विकास होतो आणि मुख्य म्हणजे सांघिक खेळामुळे हार पचविण्याची मानसिक ताकद मिळते. मी सुद्धा शाळेत खेळाची शिक्षिका असल्यामुळे मला हे जास्त ठाऊक आहे.” आजी म्हणाली, “असू दे. आजचा दिवस त्याला जास्त काही बोलू नकोस. एवढा आनंदात आहे तर आजच्या दिवस नाही खेळायला गेला तर काही बिघडत नाही.’
Category:
कथा साहित्य - ललितआत्तापर्यंतच्या एकंदरीत संवादानंतर नार्वेकरसर यांच्याही लक्षात आले की मुक्ताच्या कलेबद्दल घरात कोणालाच काही माहित नाही, यामागे काहीतरी ठोस कारण असेल. श्रीधरपंत खूप कडक स्वभावाचे आहेत… याची थोडीफार कल्पना त्यांना होतीच. इतक्या मोठ्या कलाकारावर स्वतच्या घरातच किती अन्याय झाला आहे, हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
Category:
कथा साहित्य - ललितहे सगळे लिहावे की नाही, तुझ्यापर्यंत माझ्या भावना पोचवाव्यात की नाही, यावर खुप विचार केला. मी अनेकदा लिहिलं. फाडून फेकून दिलं. पुन्हा लिहिलं.माझं मलाच ठरविता येते नव्हतं, तुला हे सगळं सांगावं की नाही.पण मग मी निश्चय केला.माझा मलाच धीर दिला ठरवलं एकदाचं, आतलं सगळं ओकून टाकायचं. आतली मळमळ काढून टाकायची.तरच मन स्थिरावेल. डोकं शांत होईल. ह्या तणावातून मुक्ती मिळेल. तसं हे सगळं स्पष्ट सांगणं सोपं नाहीय. एका मुलीसाठी, तेही चौदा वर्षाच्या कळीसाठी, तुम्हा सर्वांच्या। तुलनेत काहीच अनुभव नसलेल्या लेकीसाठी तर खरंच सोपं नाहीय.
Category:
कथा साहित्य - ललितलोचनाबाय स्वभावानं भोळी भाबडी. साधा व्यवहार तिला जमत नव्हता. दहा वीस रुपयाची मोड तिला मोजता येत नव्हती. इतकी साधी भोळी ती. सेम इसरभोळ्या गोकुळासारखी. लोचनाबाय भोळी होती पण मनानं उदार होती. ती अनेकांच्या कामाला आलेली मी बघितलं होतं.
Category:
कथा साहित्य - ललितअनघा दिवाळी 2021 मध्ये आर. के. सावे यांची प्रकाशित झालेली दिर्घ कथा.
Category:
कथा साहित्य - ललितअनघा दिवाळी अंक २०२१ मधील सुभाष सुंठणकर यांची कथा.
Copyright © 2025 | Marathisrushti