No Picture
साहित्य - ललित

बोनस

Category:

 

मधल्या सुटीची घंटा वाजली तसं चौघे म्हणजे रोहन, मनोज, अजित आणि दीपक म्हणजेच दिपू… वर्गातून पळत सुटले ते सायकल स्टँड कडे …. त्या पैकी रोहन ला दोन दिवसा पूर्वीच त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून नवीन सायकल मिळाली होती…आणि ती सायकल पाहण्यासाठी हे बाकीचे तिघे उत्सुक होते… आणि खरोखरच भानामती झाल्या प्रमाणे हे तिघे रोहनची नवीन सायकल पहात होते.. एटलास कंपनीची ….लाल चुटुक रंगाची सायकल, ” च्यायला काय भारी आहे रे सायकल? ” …. ” कितीला पडली? ” …आणि ” हे वायरचे ब्रेक आहेत का? ? ” अश्या उद्गारांसहित तिघे सायकल न्याहाळू लागले. ..सायकल ही फक्त काळया रंगाचीच असते … लोखंडी …अवजड !! अशी समजूत असल्याने .. ही नवीन सायकल म्हणजे या तीघां च्या दृष्टीने ” अद्भुत ” होती ..आणि सायकलचं कौतुक ऐकुन रोहन च्या अंगावर मात्र मुठभर मास चढत होतं… ” साडे सातशे ची आहे सायकल, नवीनच मॉडेल आलंय हे …” रोहन ने छाती बाहेर काढत उत्तर दिलं..

No Picture
कथा

अगतिक (भयकथा)

Category:

 

यंदाच्या वर्षी पाऊस पाणी दरसालापेक्षा चांगलं आलेलं. सावित्री आणि तिचा नवरा सुखदेव दोघे आनंदाच्या भरात नेहमीपेक्षा जास्त जोमाने शेतात राबत होते. एक वेगळाच उत्साह तिच्या हालचालीत जाणवत होता कारण सावित्रीच्या घरी यंदा बाळकृष्णाचं आगमन झालेलं. तिच्या दीड च वर्षाच्या कान्होबाला घेऊन ती शेतात जायची. दिवसभर शेतात झाडाला झुला बांधून त्यात त्याला झोपवायची. त्याचवेळी घरची उरलेली कामं देखील तिच्या डोक्यात पिंगा घालत असायची. सुखदेव तर बिचारा भरून पावला होता.

No Picture
कथा

आत्महत्त्या…

Category:

 

विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते तो पेपर समोरच्या टेबलावर ठेऊन पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाजात रमेश उभा असतो त्याला आत घेताच…

No Picture
कथा

हॉटेलातल्या सूक्ष्म कथा

Category:

 

एक
प्रवासाने थकलेल्या आईला सांगितले. आई मी बाहेरुन Do not disturb चा बोर्ड लावतो तू रूममध्ये निवांत विश्रांती घे.
आईला क्षणभर वाटले घरच्या बेडरुमला असा बोर्ड लावता आला तर किती बरे झाले असते.

दोन
हॉटेलात रुम सर्व्हिसला चहा ऑर्डर केला. 15 मिनिटे वाट पाहिल्यावर. एका किटलीत दिमाखात चहा आला. किटली छान होती पण चहा मेला गार गुट्ट. बाईंच्या मनात विचार आला 15 मिनिटात 25 माणसांना गरमगरम चहा पाजून कपबश्या विसळून जाग्यावर ठेवल्या असत्या.

No Picture
कथा

बहुरूपी

Category:

 

“ अरे ,पोलिस आला रे पोलीस, पळा पळा पळा” दामूआण्णानं गल्लीत गोट्या खेळत असलेल्या पोरांना जेच आरोळी दिली तशी पोरं चिंगाट ज्याच्या त्याच्या घरी पळू लागली. खाक्या कपडेवाला सायकलला काठी अडकवून आलेला पोलीस पोरं भिंतीच्या आडून पाहू लागली. रामला या गोष्टीचा खूप नवल लागलं. तो त्याच्या मित्रांबरोबर तिथेच दबा धरून आडोशाला उभा होता. दामू अण्णानं दिलेली आरोळी खूपच घाबरून सोडणारी होती म्हणून पोरं हातातली दप्तरं तशीच पारावर सोडून पळाली!

No Picture
कथा

इच्छाशक्ती

Category:

 

शुभा आणि शाम बड़ोदा सोडून मुंबईत स्थाईक झाले. दोघांचा राजा राणीचा संसार सुरु झाला. दोघही आपल्या आई वडिलांची एकुलत एक अपत्य होती. दोघांची घर बडोद्याच्या दोन टोकाला होती.

No Picture
साहित्य - ललित

संस्कृत साहित्यातील कथा – क़मांक १ – अभिज्ञानशाकुंतलम्

Category:

 

नवीन मालिकेत संस्कृत साहित्यातील काही नाटकांच्या, काव्यातील किंवा गद्यातील कथा सांगणार आहे. ह्यापूर्वी मी मृच्छकटिक नाटकाची कथा आपल्याला सादर केली होती. संस्कृत साहित्य म्हटल्यावर नेहमीच पहिले नांव कालिदासाचे येते. “पुरा कविनां गणनाप्रसंगे कनिष्ठीकाधिष्टीत कालिदास:। ततस्तत्तुल्यकवेर्भावात् अनामिका सार्थवती बभूव॥ पूर्वी श्रेष्ठ कवींची गणना करतांना करंगळीवर प्रथम कालिदासाचे नांव घेतले.

No Picture
कथा

पुडिंग (अलक)

Category:

 

विद्या सकाळी उठली. श्वेताला उठवलं.श्वेता ९ वर्षांची तिची गोड मुलगी.श्वेता ब्रश करुन आंघोळीला गेली आणी विद्या किचनमधे आली तिचा डबा करायला.ओट्यावर पोळ्यांचा डबा दिसला आणी तिला आठवलं ,काल रात्री पोळ्या उरल्या आहेत.

No Picture
कथा

ठकास महाठक

Category:

 

देसाईआजोबांनी जोऱ्यात फोन आपटला . रागानी ते अगदी हिरवे पिवळे पडले होते , टकलाला घाम आला होता , त्यांनी हाताशीच असलेल्या टॉवेलनी टकालाचा घाम पुसल्यावर टकलाला आधीच्या पेक्षा जास्त केस चिकटलेले वाटले तेंव्हा लक्षात आले कि तो त्यांच्या मनीचा बसायचा टॉवेल होता .