कार्यकाळ ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६
जन्म: २ ऑक्टोबर १९०४
मृत्यू: ११ जानेवारी १९६६
लालबहादूर शास्त्री यांचा संस्कृत भाषेवरही मोठ्या प्रमाणावर पगडा होता. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ते भारत सेवक संघासोबत जोडले गेले. येथेच त्यांनी देशसेवेचे व्रत घेतले. या सोबतच त्यांच्या राजकीय कार्याला येथूनच सुरुवात झाली.
भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री यांची ओळख आहे. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म १९०४ साली उत्तर प्रदेश राज्यातील मुगलसराय येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव असे होते. ते प्राथमिक विद्यालयात शिक्षक असल्याने त्यांना सर्वच जण आदराने ‘मुंशीजी’ असे म्हणत असत. काही काळानंतर त्यांनी शिक्षकी पेशा सोडत राजस्व विभागात लिपिक पदाची नोकरी केली. लालबहादूर यांच्या आईचे नाव रामदुलारी असे होते. परिवारात सर्वांत छोटे सदस्य असल्या कारणाने लालबहादूर यांना परिवारातून प्रेमाने ‘नन्हें’ या नावानेच पुकारण्यात येत असे. जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाल्यानंतर आपल्या स्वच्छ प्रतिमेच्या कारणास्तव लालबहादूर शास्त्री यांची भारताच्या पंतप्रधानपदावर निवड करण्यात आली. ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ असा त्यांचा पंतप्रधानाचा कार्यकाळ होता. त्यांचा हा सुमारे १८ महिन्यांचा कार्यकाळ अद्वितीय असाच राहिला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश राज्याचे संसदीय सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. गोविंद बल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. या कार्यकाळात त्यांनी प्रथमच महिला वाहकांची नियुक्ती करण्याचा प्रयोग त्याकाळी केला होता. कायदेमंत्री असताना जमावाला काबूत आणण्यासाठी लाठीमाराएवजी पाण्याचा मारा करण्यावर जोर दिला. लालबहादूर शास्त्री यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.