(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज

इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.

Sort By:

  • या दैवी संकेताला काय म्ह्णणायचे?

    गीतरामायणाच्या दैवी निर्मितीआधी गदिमांना अनेक साक्षात्कार घडले त्यातला हा महत्वाचा !

  • गुरुजींचा हात,देवाचा हात

    ‘आत्मचित्र’ हे कवयित्री, लेखिका संजीवनी बोकील यांचे सध्या गाजत असलेले नवे पुस्तक! हे पुस्तक म्हणजे अलवारशा ललितलेखांचा एक रंगीत गुच्छच आहे. लेखिकेच्या मनातले सकाराचे सूर्योदय या पुस्तकाच्या पानापानावर तिने मांडून ठेवले आहेत.

  • जेव्हा मनाला मनाची ओळख पटत

    जेव्हा मनाची तार जुळते तेव्हा बाकी गोष्टी गौण ठरतात. ज्याचा आपण राग राग केला, मनातून तिरस्कार केला, अकल्पितपणे एक दिवस त्याची खरी ओळख पटली… आणि मग सगळे जगच पालटून गेलं. पती-पत्नी मधल्या तरल भावनांची रागान रागाची रागा अनुरागा ची ओळख करून देणारे हे हळुवार गीत.

  • वाळूचे घर बाळूचे

    गदिमांच्या बहुप्रसवा लेखणीतून उतरलेलं हे एक नितांत सुंदर बालगीत, ‘इवल्या इवल्या वाळूचं हे तर घरकुल बाळुच’. कित्येकदा, चित्रपटाच्या गंभीर आशयामुळे आणि विषयामुळे चित्रपटातलं सुंदर गीत सुद्धा उगीच दुर्लक्षिला जात त्यातलंच हे एक गीत हे. गीत सुधीर फडक्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गायलं होतं. आणि विशेष म्हणजे, प्रपंच या चित्रपटाची कथा सूत्ररुपाने या बालगीतआता आली आहे.

  • मोरया मोरया !

    https://www.youtube.com/watch?v=KCvcsblHncI

    संगीतकार आणि गायक अजय अतुल यांनी गायलेले हे गणेश गीत तुफान लोकप्रिय आहे.

  • भज मन वासुदेवानंद

    प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांच्यावर सुंदर अशी झालेली काव्य रचना

  • नाना शंकरशेट – मुंबईत सामाजिक जीवनाचा पाया घालणारा माणूस

    मुंबईचे भाग्यविधाता श्री. नाना शंकरशेठ यांच्या बद्दल थोडक्यात माहिती.

  • आणि चोळामोळा केलेला त्या बोळ्यानं एका संगीतकाराचं नशिब ऊघडलं!

    गाण्याचं सिटिंग संपलं होतं. वाद्यांची आवराआवर करणार्‍या प्रभाकर जोगांना एक फेकून दिलेला कागदी बोळा सापडला. त्यानी तो सहज ऊघडला आणि त्यांचं भाग्यही त्या बरोबर ऊघडलं.

  • वासूची सासू

    https://youtu.be/-m3iruEQoJE

  • किशोरीताई सांगीतिक संवाद – भाग ४

    शास्त्रीय संगीत हे भावसंगीतच आहे’, असं आग्रही प्रतिपादन किशोरीताई नेहमी करीत आणि त्यांच्या मैफिलीतून रसिकांना त्याची प्रचितीही येत असे. स्वरभाषा, राग, रागाचं वातावरण, रागभाव या संकल्पना स्पष्ट करत किशोरीताईंनी, त्यांचे ‘तेच’ राग दरवेळी वेगवेगळा अनुभव का देत असतील, याची मीमांसा केली. सोबतच आजच्या भागात, नाना पाटेकर ताईंच्या गाण्याकडे कसं बघतात तेही पाहू.