(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • कॅफे डेस्टिनी

    एका मॅट्रिमोनिअल साईटवर दोन दिवस चॅटिंग केल्यानंतर निकिता आणि निखिल दोघे रविवारी संध्याकाळी हॉटेल कॅफे डेस्टिनीला भेटायचे ठरवतात. ठरल्याप्रमाणे निखिल निकिताला भेटण्यासाठी त्याचा मित्र निहारला सोबत घेऊन आणि निकिता तिची मैत्रीण नेहाला सोबत घेऊन येते. चौघांचे हाय – हॅलो झाल्यावर निखिल आणि निकिता हॉटेलच्या वरच्या फ्लोअरवर एकमेकांशी बोलण्यासाठी जातात आणि निहार आणि निकिता तिथेच एका टेबलवर बसून कॉफी ऑर्डर करतात.

  • आवडीचे गैरसमज

    बाहेर पाऊस पडून आभाळ मोकळे झाले तसेच घरातही नंणद भावजयीच्या बोलण्याने. तोपर्यंत आज्जी नातवंड रानमेवा संपवून आले. आणि आलं घालून केलेला गरम गरम वाफाळता चहा.

  • जगण्याचं बळ..

    “ऐका हो ऐका उद्या शाळंतल्या लेकराव्हायचे आधार कार्ड वाले येणार हायेत तरी उद्या ज्यैच्या लेकरायचे आधार काल्ड काढायचेत तैनं धा वाजता शाळंत हाजर रवावं हो”

  • गरिबी! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १

    मित्रानो, इंटरनेटवर काही कथाबीजे सापडलीत. मी त्याना, माझ्या कुवती प्रमाणे, मायबोलीचा पेहराव चढवून स्वैर अनुवाद, मराठी वाचकांसाठी केलाय. मला आवडलेल्या काही कथा – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’तुन – आपल्या भेटीस येतील. स्वागत कराल हि आशा. अजून एकवार सांगतो या कल्पना माझ्या नाहीत.

  • अजब न्याय नियतीचा – भाग १७

    माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींना राज माझा होणारा जिजू आहे असंच माहिती होतं. तो कधीकधी कॉलेजवरून जाताना मला भेटायला येत असे. मग आम्ही कॉफीशॉपमध्ये जाऊन गप्पा मारत असू. कधी लेक्चर्स ऑफ असतील तर मुव्ही बघायला पण जात असू.

  • अनोळखी

    काम करायच असेल तर या आठवड्यात सुरु कर, नाही तर दुसरा माणूस बघतो! ‘नक्की करतो म्हणाला’ आणि आगाऊ रक्कम घेऊन पसार झाला. दहा दिवस पत्ता नाही. त्यानंतर आला. कुठे गळत होतं तिथे बाहेरच्या बाजूने प्लॅस्टर काढून गेला. जखमेवरची पट्टी काढून डॉक्टरने जेवायला निघून जावं तसा.

  • “क्रॉस कीज” चा भाडे-करार (संक्षिप्त रूपांतरीत कथा १५)

    द लिज ऑफ द क्रॉस कीज’ मधे केवळ गैरसमजावर आधारीत विनोद आहे. अप्रत्यक्षपणे चर्चच्या अधिकाऱ्यांवर विनोद आहे. चर्चचे अधिकारी वाईट नसूनही केवळ गैरसमजांतून दुय्यम अधिका-याला बिशपबद्दल खात्री वाटत नाही. चर्चच्या प्रमुखाचे नांव खराब होऊ नये म्हणून चर्चचा दुय्यम अधिकारी टपरीच्या मालकाला टपरीचा भाडेपट्टा चौदाऐवजी एकवीस वर्षांसाठी वाढवून द्यायला सहज तयार होतो. मात्र ज्याच्यामुळे हे घडतं त्या वार्ताहराचं पुढे काय झालं, हे कथेत सांगितलेलं नाही. वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडलं आहे कारण तें फार महत्त्वाचं नाही.

  • शोधा म्हणजे सापडेल!

    “आई आता बास झालं हं तुमचं, चांगुलपणा शोधणं! प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा पाहावा, चांगुलपणा शोधावा हे ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आयुष्यभर चांगुलपणा शोधून तुम्हाला मिळालं काय, ते तरी कळू दे.” वृंदा चिडून चिडून बोलत होती आणि तितक्याच थंडगारपणाने त्यांनी उत्तर दिलं, “तुझ्यासारखी सून मिळाली.”

  • संधिप्रकाशातील सावल्या – २ : येऱ्हवी जग हे कर्माधिन…

    अश्वत्थानं गोष्ट संपवली आणि सावलीत बसलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं . त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होतं . नेहमीप्रमाणं संधिप्रकाशातील सावल्या घनदाट होऊ लागल्या होत्या . सगळी झाडं , क्षितिजाकडे नजर रोखून सूर्य अस्ताला जाण्याची वाट पहात होती .

  • पुलाखालची माणसं (कथा)

    ही पुलाखालची माणसं मुंबईच भयावह चित्रण आहेत. कुठेतरी वाळवी लागली आहे. बाकी सर्व प्रश्न सुटू शकतात पण एकदा लागलेली ही वाळवी शहर आतून-बाहेरून पोखरून काढणार. वर्षा-दोन वर्षापूर्वी पुलाखाली माणसं नव्हती. आता कुठल्याही पुलाखाली जाऊन पाहा. नशेत बुडालेल्या केविलवाण्या चेहऱ्यांची ही कळकट-मळकट मंडळी जनावराच्या नजरेन तुमच्याकडे पाहतील.