(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • ससा

    प्रातिभा आाणि विजयचा नुकताच  विवाह झाला होता. विजयला विवाह करण्यात तसा फारसा रस नव्हता पण  घरच्यांच्या आग्रहाखातर  नाईलाजानं  त्याला तस करावं लागलं  होत. प्रातिभाचीही विवाहाबाबत फारशी काही स्वप्ने  बहुदा नसावित.

  • चालणारा पोपट

    चालणारा पोपट पहिल्यांदाच बघत होतो. त्यााला कधीच उडता येणार नव्हतं. कारण पंखांची टोकं कलात्मक पद्धतीनं कापून टाकलेली होती. उडणारे पोपट बघितले, पिंजऱ्यातले पोपट बघितले. पण चालणारा पोपट पहिल्यांदाच बघितला.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – २०

    तोंगशे एकटेच ऑफीस मध्ये मौशूच्या जीवनात घडलेल्या प्रचंड उलथा पालथीच्या घटनांचा मेळ लावण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या आयुष्याची झालेली राखरांगोळी पाहून त्यांचे मन हेलावून गेले होते.

  • रत्नहार (संक्षिप्त रूपांतरीत कथा ७)

    स्त्री कोणत्या घरांत जन्मली आहे ह्यापेक्षा तिचं सौंदर्य, तिची कोमलता, तिचा कमनीय बांधा, तिची मोहकता, तिचा स्वाभाविक डौलदारपणा, तिचे उत्स्फूर्त विलोभनीय वागणे आणि तिचं चातुर्य ह्या गोष्टी स्त्रीचं योग्यता ठरवतात आणि एखाद्या झोपडीतील मुलीलाही एखाद्या राजकुमारीच्याच पातळीवर आणून ठेवतात.

  • अशाच एका रात्री…

    इतक्यात घड्याळाचा टोल वाजतो आणि त्यामुळे आदित्य दचकतो. काही क्षणातच पुन्हा त्याला, त्याच्या आरामखुर्ची हलण्याचा आवाज येतो. इतक्यात थंडीतही आदित्यच्या कानामागून घाम ओघळू लागतो. आदित्य हळूहळू आरामखुर्चीच्या दिशेने निघतो आणि समोर जे काही बघतो, ते बघून त्याची पाचावर धारण बसते.

  • अनामिक

    सराईत गुन्हेगारानाही टेलिफोन ही एक पर्वणीच आहे. प्रत्यक्ष न भेटता गुन्हेगारी करता येते. लोकाना धमकावता येते. खंडणी वसूल करता येते. पोलिसांकडे नसेल इतकी अत्याधुनिक टेलिफोन यंत्रणा या गुन्हेगारांकडे आहे. त्यावर कॉन्फरन्स सेवेपासून रिमोट कंट्रोलपर्यंत सर्वच सोय आहे.

  • पुरून उरिन! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ५

    खंडूआण्णा म्हणजे बारा बोड्याचा माणूस. खप्पड गाल, चेहऱ्यावरचं मास झडून गेलेलं, त्यामुळे कोरड्या कवटीला जून कातडं घट्ट चिटकवल्या सारखा तो दिसायचा. अंधारात काय, उजेडात सुद्धा, नवखा माणूस घाबरून जायचा. वय जनरीतीला धरून, वर्षात मोजल तर पासष्ठीला एक वर्ष कमी, आणि त्याला विचारलं तर—!

  • शंभर मैलांवरची माती (कथा)

    फुलांचा पंचवीस हजारांचा ताटवा काळ्या लाकडी पेटीवजा कुंडीत ठेवलेला होता. खऱ्या फुलांची ही दफनपेटीच म्हणायला हवी. वर्ष वर्ष डांबराच्या गोळ्यांसारखी उग्र वास देणारी तैवानी फुलं हवीत की, क्षणभर फुलून दिवसांचा गजरा सकाळी मावळणारी फुल हवीत, हे प्रत्येकान आपल्याशी ठरवायला हवं.

  • एक परीस स्पर्श (भाग – २३)

    आज विजयचा पाय प्रचंड दुखत होता. त्यात मरणाच्या थंडीमुळे अधिकच त्रास होत होता. पायात थोडी सुजही होती. शरीरातील सर्व सांध्यात थोड्या थोड्या वेदना जाणवत होत्या. कशामुळे काय दुखतंय तेच कळत नव्हतं. त्यामुळे विजय लांब पाय करून खुर्चीत बसला होता.

  • उल्लू टिल्लू बेडूक (संक्षिप्त रूपांतरीत कथा २२)

    ह्या राजा जेवढा विनोदप्रिय होता, तेवढी विनोदप्रियता असलेल्या दुस-या कुणा व्यक्तीबद्दल मी कधी ऐकलं नव्हतं. त्याचे जगणंच विनोदासाठी होतं असावं. त्याची मर्जी कमवायची असेल तर विनोदी गोष्ट त्याला ऐकवायची. त्यामुळे त्याचे जे सात मंत्री होते ते सगळे उत्तम विदूषक होते.