(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • मायाबाजार

    कुणी विकतं, कुणी खरेदी करतं, पण काही खरेदी करण्यापूर्वी कमवावं लागतं. मग ज्याच्याकडे जे असेल ते जास्तीत जास्त भावात विकलं जातं. कुणी बुद्धिमत्ता विकतं, कुणी सत्ता विकतं, कुणी जरब विकतं, कुणी देवाने दिलेले सौंदर्य विकतं, तर कुणी त्याच्याच शेजारी आपले वैगुण्य घेऊन विकायला बसतं. मायाबाजार चालू राहतो.

  • संस्कारांची टोपी…

    समाज नेहमीच संस्कारांची टोपी फक्त स्रीयांच्याच डोक्यावर ठेवत आला आणि पुरुषांना मोकाट सोडत आला आता ती टोपी पुरुषांच्याही डोक्यावर ठेवायला हवी ! तरच समाजातील बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी होतील आपणही संस्काराची टोपी आपल्या डोक्यावर स्वत: ठेवून घेऊया !

  • एक परीस स्पर्श ( भाग – १० )

    विजयने या सगळ्याची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. कारण विजय स्वतः खात्री केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही.

  • एक परीस स्पर्श – भाग १

    आपल्या या कथेतील नायक विजय ! तो ही त्या परिसासारखाच आहे. त्याच्याही वाट्याला आले आहे परिसाचे जगणे ! कसे ? ते या कथेतून आपल्याला हळू हळू उलगडत जाईलच…तसं पाहिलं तर परीस हा एक दिसायला सामान्य दगडच असतो असं म्हणतात. तसाच आपला नायकही दिसायला एक सामान्य नव्हे अतिसामान्य माणूसच आहे…

  • एटीएमची चोरी – (कथाकुंज क्रमांक ८)

    बाळू शिंदे, हुसेन आणि मटकर हे त्रिकूट पोलिसांच्या दफ्तरात नोंदलेलं होतं.
    तिघेही लहान सहान गुन्ह्यांसाठी तुरुंगवास भोगून आले होते.
    तिथेच त्यांची दोस्ती झाली होती.
    त्रिकूट आता मोठे दरवडे घालायला मागेपुढे पहात नसे.
    मटकर हा खरं तर इलेक्ट्राॅनिक्स इंजिनीअर.
    तो आपल्या ज्ञानाचा उपयोग ह्या चोऱ्यांची आंखणी आणि अंमलबजावणी दोन्हीसाठी करत असे.
    तिघे बाईकवरून फिरत असत.

  • नाईट ड्रेस

    काही वेळानी गाडी चालवता चालवता बाबांनी आरशातून मागे बघितलं … तर दोन्ही मुलं कंटाळून झोपलेली … आईस्क्रीममुळे चिकट झालेली दोघांची तोंडं , खेळून मळलेले कपडे , हातात धरून ठेवलेली नाईट ड्रेसची पिशवी आणि चेहऱ्यावर निरागस भाव … ते बघून कसल्याश्या विचारानी तो गालातल्या गालात हसला.

  • मी आणि ती’ – ५

    किसी नजर को तेरा… इंतजार आज भी है….’ जगजीतची ही गजल मला नेहमीच व्याकुळ करत असते , का कुणास ठाऊक. खरे तर आयुष्य सुरळीत चाललेले असतानासुद्धा ही गजल अस्वस्थ करतेच करते.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ६

    त्या तिघांच्या जीवनातील रोजची सकाळ आजही नेहमी प्रमाणे उजाडली होती. मौशु नेहमी प्रमाणे शाळेत जाण्याची तयारी करत होती. बाबा बरोबर मजेत शाळेत गेली. संगीताने नेहमी प्रमाणे १० वाजता घर सोडले.

  • तिमिरातूनी तेजाकडे

    सिद्धांत आणि मानव खूप जवळचे मित्र. त्यातला मानव अर्धे शिक्षण गावात पूर्ण करून आलेला आणि सिद्धांत अस्सल शहरी मुलगा. दोघेही विज्ञान शाखेचे पदवीधर. खूप दिवसांनी मानव आणि सिद्धांत ऐकमेकांना भेटतात. ते एका हॉटेल मध्ये भेटतात. त्यावेळी त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होतात.

  • बेटा-बेटांचं मुंबई बेट (कथा)

    पूर्वी कधीतरी मुंबई सात बेटांची असेल. आज ती बेटं एकमेकांना सांधण्यात आली आहेत. मात्र आज मुंबई नावाच्या शहरात अनेक छोटी-मोठी बेटं तयार झाली आहेत. इथं राहणारा प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेटच आहे.