(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • शास्त्रीबुवा

    एका गृहस्थांना त्यांनी नोकरी करू नकोस, कांही धंदा कर त्यात तुला नक्की यश मिळेल असं सांगितलं होतं व त्याने त्याप्रमाणे आलेल्या चांगल्या नोकऱ्या लाथाडून धंदा केला होता व कांही वर्षांतच तो लखपती झाला होता. तेव्हां श्रीमंताला लखपती म्हणत, आतांसारखं करोडपती नाही. त्यांनी पत्रिका जुळवल्यामुळे कोणा कोणाचे विवाह यशस्वी झाले होते. कुणाला त्यांनी भविष्य वर्तवल्याप्रमाणे कन्या झाली होती तर कोणी परदेशीही गेले होते. त्यामुळे शास्त्रीबुवांकडची गर्दी हटत नव्हती. एखाद दुसऱ्याचं भविष्य बरोबर नव्हतं आलं पण अशी माणसे स्वत:ला दोष देत गप्प बसत असत.

  • डोंगरातला झरा

    “…मला बोलता येतं नाही , पण झरा मात्र माझा आदर्श आहे इतकंच सांगतो . शक्य असेल तर डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा . आपण कृतीतून झरा होऊ या .

  • अजब न्याय नियतीचा – भाग ११

    १० तारखेला दिवसभराच्या गडबडीत आरू तिचा वाढदिवस आहे हे विसरूनच गेली होती. गम्मत म्हणजे दीने, नीलने किंवा तिच्या मित्र-मैत्रिणींपैकी कुणीही तिला दिवसभरात वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष किंवा मेसेज करून दिल्या नव्हत्या. संध्याकाळी नील एका Surprise Party साठी दोघींना घेऊन बाहेर पडला.

  • कोडं

    काळ झपाट्याने बदललाय आणि सतत बदलतोय …. आजूबाजूचं वातावरण, बदललेल्या संगोपनाच्या पद्धती , पालक आणि मुलांमधल्या नात्यात आलेला मोकळेपणा , मिळणारं स्वातंत्र्य , या सगळ्याच्या जोडीला हाताशी असलेलं तंत्रज्ञान आणि चुटकीसरशी उपलब्ध होणारी माहिती … या सगळ्यामुळे मुलांची विचार करण्याची पद्धत बदललीय…

  • मी आणि ती’ – ४

    अनेक वेळा एम.एफ. हुसेनला भेटलो होतो, त्याची बहुतेक पैंटिंग्ज प्रत्यक्ष पाहिली आहेत, त्याला पैंटीग्स करताना सुद्धा, त्याने मला एकदा जहांगीरच्या सॅमओव्हर मध्ये कॉफी पिताना एक स्केचही काढून दिले होते… त्याची मा-अधुरी … माधुरी संकल्पना सॉलिड आवडली होती, ३० वर्षाची आई आणि ८० वर्षाचा मुलगा….

  • एक आठवण… शाळेतली

    एका सकाळी … नक्की या गप्पांच्या ओघात …की शिकवताना पुस्तकातल्या कुठल्याश्या संदर्भावरून …ते नीटसं आठवत नाही पण “ तुम्हाला मोठेपणी कोण व्हायला आवडेल किंवा तुम्ही कोणाला तुमचा आदर्श मानाल?” अशा अर्थाचा काहीतरी विषय निघाला .. आणि माझ्या पुढे बसलेला एक मुलगा हळूच म्हणाला “ हर्षद मेहता.”

  • मी आणि ती’ – ५

    किसी नजर को तेरा… इंतजार आज भी है….’ जगजीतची ही गजल मला नेहमीच व्याकुळ करत असते , का कुणास ठाऊक. खरे तर आयुष्य सुरळीत चाललेले असतानासुद्धा ही गजल अस्वस्थ करतेच करते.

  • गावांची ओढ (कथा)

    माणूस भाऊच्या धक्क्यावर उतरो, व्हीटी स्टेशनला उतरो, बॉम्बे सेंट्रलला उतरो, नाही तर सांताक्रुझ विमानतळावर उतरो. त्याच्या पाठीवर त्याच बि-हाड असतं, डोळयात स्वप्नं असतात आणि मनात एक खूणगाठ बांधलेली असते. नाव आणि पैसा मिळवून गावी परत जायचं.

  • मी व माझा मामा (कथा)

    आयुष्य हे कधीच न संपणारे कोडे आहे आणि मला तर ते कधीच सोडवता येणार नाही म्हणून हताश होऊन बाकावर बसलो होतो, तर अचानक दिलीप दिसला, ताईचा मुलगा,माझा भाचा. खूप हुशार मुलगा, गेल्यावर्षी सातवीच्या परीक्षेत पहिला आला तेंव्हा त्याला प्लेटो चं पेन बक्षीस देणार होतो, पण कसचं काय, प्लेटोच्या पेन पेक्षा पोटाची खळगी आणि ती भरण्याची पेन प्रचंड मोठी होती.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ५३)

    विजयने जितका पैसा कमावला तो सुरुवातीला भावंडांच्या शिक्षणात, वडिलांचे कर्ज फेडण्यात आणि त्या नंतर घरखर्चात त्याच्या आणि कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणात आणि त्यांच्या आनंदात खर्च केला. तो खर्च करताना त्याला अपेक्षित होते कि त्याचे कुटूंब त्याच्यासाठी उभे राहील पण प्रत्यक्षता मात्र तसे झाले नाही. तोपर्यत वेळ निघून गेलेली होती. विजय आर्थिक दृष्ट्या अपंग झालेला होता. म्हणजे त्याला करावेसे तर खूप काही वाटत होते पण आर्थिक समस्येमुळे तो काहीच करू शकत नव्हता.