(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • काकड आरती

    रामदास काकांनं लाऊड स्पीकरात हळी देली आण मंग मलं लय आनंद झाला. तसं पाह्यलं तं काकड आरतीचा काकडा आण परसाद याच्यासाठी गावातल्या बऱ्याच जणायची चढावढं लागायची, म्या बी मांघल्ल्या पाच-सात दिसापसनं परयत्नात व्हतो. आखरच्यान आज कुठं मव्हा नंबर लागला व्हता. मव्ह नाव पहाटं पहाटं लावूड स्पीकरात वाजलं व्हत त्यामुळ मल लय भरून आलतं.

  • फुलपुडी

    “बाबाss मस्त मस्त !! तुम्हाला सेकंड इनिंग साठी शुभेच्छा मग ! हाहाहा ..!!”
    बापलेकीच्या मनसोक्त गप्पा झाल्या आणि आई-बाबा ठरल्याप्रमाणे निवृत्तीनंतरचं निवांत आयुष्य जगू लागले. फिरणं, नाटक-सिनेमा, वाचन, मनात आलं की बाहेर जेवण, देवदर्शन, सण, नातेवाईक, समारंभ आणि बरंच काही .. या ना त्या निमित्ताने बाबा कायम आई सोबत असायचे. पण हा मनमुराद जगण्याचा आनंद फार काळ काही त्यांना घेता आला नाही. तीन-चार वर्षातच आईला काहीशा ‘अकाली वार्धक्याने’ ग्रासलं. हातपाय दुखायचे. अशक्तपणा आला होता. बाहेर पडणं तर पूर्णच बंद. जेमतेम घरच्याघरी कशीबशी फिरायची. भरीला बारीकसारीक इतर त्रास होतेच. पुढे रोजचं घरकाम करणं सुद्धा कठीण झालं. लेकीने येऊन घरकाम आणि स्वयंपाकासाठी एका मावशींची व्यवस्था केली. शिवाय ती स्वतः दोनेक महिन्यातून एकदा तरी येऊन जायची. हळूहळू आईची दृष्टी कमी झाली. सहाजिकच लिखाण, वाचन, टीव्ही बघणं यावर बंधनं आली. देवादिकांचं करणं, जपमाळ, देवपूजा यात आता जास्त वेळ घालवायला लागली. या सगळ्यामुळे आधीच मितभाषी असलेल्या आईचं बोलणं सुद्धा आधीपेक्षा कमी झालं. उतारवयातल्या या बऱ्यावाईट दिवसांत बाबांची मात्र आपल्या अर्धांगिनीला पूर्ण साथ होती.
  • प्रश्नोपनिषद : एक चिरंतन वेदना !

    एका घरट्यात दोन पिलं कासावीस झाली आहेत . त्यांचं निःशब्द आक्रंदन आपल्याला तर जाणवेलच पण पाषाण हृदयी माणसाच्या मनाला सुद्धा जाणवेल . आणि पिलांकडे न पाहता पिलांचे आईबाप ठरवून पाहिल्यासारखे दुसरीकडे नजर फिरवून फांदीवर अगदी अलिप्तपणाने बसले आहेत , हे सुद्धा जाणवेल .

  • अजब न्याय नियतीचा – भाग २५

    पण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि…….. आणि मी रागाच्या भारात त्याला मागे ढकलून दिलं…..”

  • समोरच्या खिडकीतला तो..

    सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो.

  • डांगरवाडी

    बुढा दिवस रात्र वाडीची राखण करे. बुढी गडचिरोलीच्या हाटात ( बाजारात ) भाजीपाला नि डांगरं विकून आणे. बुढ्याचं गाव नदीपासून थोड्याच अंतरावर होतं. बुढी बुढ्यासाठी रोजच सकाळ संध्याकाळ शिदोरी घेऊन यायची.

  • वेगळा (कथा) भाग १

    आय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे.

  • मी आणि ती’ – २

    घरी….आज काय आहे… माहीत आहे ना… काय आहे? गटारी… अरे विसरलेच.. आज तर भेटू. तू घरी आहे…आपल्याकडे स्टॉक आहे. मी म्हणालो…

  • आदर्श

    थोरामोठ्यांचे आदर्श तर आपल्यासमोर असतातच पण या चिमुकलीनेसुद्धा जाता जाता नकळतपणे नक्कीच एक आदर्श घालून दिला होता.(स्वानुभवावरून प्रेरित कथा)

  • अप्रूप

    परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो… फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं…… वर लिहिलं होतं.. “हरवले सापडले विभाग”