(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • खरा भक्त आणि भोंदूबाबा

    अंधश्रध्देवर प्रहार करून जळजळीत सत्य उलगडणारी लघुकथा

  • कुंपण

    हे सगळं घडलं ते त्या भलत्या विचारांच्या “कुंपणानीच शेत खाण्याआधी” मनाच्या मळ्यातून वेळीच ते “कुंपण“ काढून टाकलं sss म्हणून ….

  • अजब न्याय नियतीचा – भाग १

    आरुंधती परांजपे….. एक २५ वर्षे वयाची, दिसायला खूप सुरेख, हसऱ्या चेहेऱ्याची, आनंदी स्वभावाची, फॅशनची आवड असणारी मुलगी. शाळेत असल्यापासून तिला नाच, गाणं, नाटक याची आवड होती. तिचा आवाजही खूप गोड होता. शाळेत असताना प्रार्थना, समूहगीते, गायन स्पर्धा यामध्ये ती हिरिरीने भाग घेत असे. शिवाय ती अभ्यासातही हुशार होती, त्यामुळे ‘आरुंधती’ ऊर्फ ‘आरू’ सगळ्यांची लाडकी होती.

  • माझी आर्थिक कारकीर्द (संक्षिप्त रूपांतरीत कथा १६)

    कथेतील बँक कर्मचारी त्या डीपॉझीटरला हंसतात, म्हणजेच तुच्छ मानतात. आजही खूप मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांना कर्ज घ्यायला येणाऱ्या (नंतर कदाचित बुडवणाऱ्या) उद्योगपतीचं जेवढं महत्त्व वाटतं तितकं सामान्य खातेदाराचं वाटत नाही. ह्या कथेत तो सगळी रक्कम परत काढतो आणि त्याला त्याचे सर्वच्या सर्व म्हणजे छप्पन्न डॉलर्स परत मिळतात. आज जर एखाद्याने ‘छप्पन्न’ डॉलरचे खाते बँकेत उघडून त्याच दिवशी बंद केले तर बहुदा क्लोजरनंतर त्याच्या हातांत सहाच डॉलर परत येतील आणि पन्नास डॉलर्स तीन महिने सरासरी बॅलन्स कमी पडल्याचा चार्ज, कॅश ट्रॅन्झक्शनचा चार्ज, कंपल्सरी डेबिट कार्डाचा चार्ज, अकाऊंट क्लोजर चार्जेस, जीएसटी, वगैरेसाठी कापून घेतले जातील. एकंदरीत बँक ग्राहक लेखकाने दाखवल्याप्रमाणे आजही बँकेचा मिंधाच रहाणार आहे.

  • भूमिका (कथा)

    आपण खूप मोठी शाब्दिक कोटी केल्याचा आनंद सिंगच्या डोळ्यातून वहात होता. अंजुला सगळं सगळं आठवलं. घर सोडल्यापासून इथं पर्यंत केलेला प्रवास, त्यात ते रुतलेले काटे, त्या वेदना, त्या खोट्या अपेक्षा आणि मग अपेक्षाभंग. एकावर एक पचवलेले दुःखाचे कढ…… आणि या सर्वात निस्सीम प्रेम करणारा संजू!

  • डोक्याचे संरक्षण कवच

    बाहेर पाऊस वाढला होता हस्त नक्षत्राला सुरुवात झाली होती शिवाय दोन दिवसा मध्ये नवरात्राला सुरुवात होणार होती. या पावसाचे नक्षत्र मुळे शेतामध्ये भयंकर दलदल झाली होती. सफरातून बाहेर पडायची शिष्ट नव्हती इतका पाऊस वाढला होता त्यावेळी आम्ही सर्वजण आमच्या शेतामध्ये राहायला होतो. या पावसा मध्ये अधूनमधून वाऱ्याची झुळूक आली म्हणजे आंब्याच्या झाडाच्या डाळ्या एकमेकावर आदळत होत्या. सुनबाई च्या ओढ्याला भरपूर पाणी आले होते पूर्वेकडून वाहणारा सुनबाईचा ओढा पाण्याने भरभरून वहातहोता.

  • उणा आनंद…….

    टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात रंगमंचावरून मानसच्या नावाची घोषणा झाली,
    “आणि आपल्या राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे, पहिल्या क्रमांकाचे मानकरी आहेत……….”
    संपूर्ण सभागृह त्याच्या रंगमंचाकडे येण्याची प्रतीक्षा करत होतं. उत्तेजनार्थ क्रमांकापासून तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या घोषणेपर्यंत तो ही टाळ्यांनी विजेत्या स्पर्धकांचं कौतुक करत होता, आणि मनातून निराशही होत होता. प्रचंड रहदारीमधून बसचा दीड पावणेदोन तासाचा प्रवास करून आला होता तो बक्षीस समारंभाला. ही स्पर्धा त्याच्यासाठी फार महत्त्वाची होती. गेली तीन वर्ष , पहिल्या तीन क्रमांकात येण्यापासून या स्पर्धेने मानसला हुलकावणी दिली होती. आजवर अनेक काव्यस्पर्धांवर त्याने आपल्या काव्यरचनेची मोहोर उमटवून यश प्राप्त केलं होतं. आजही घरून निघताना, मानसने प्रत्येकाची चाचपणी करून पाहिली, आपल्यासोबत येण्यासाठी. काही ना काही कारण सांगून, प्रत्येकानेच नकार दिला होता. आणि तसंही आजवर त्याला मिळालेल्या प्रत्येक पारितोषकासोबत तो एकटाच घरी आला होता. सवय झाली होती, तरीही प्रत्येक वेळी घरच्या कुणी सोबत यावं, असं मनोमन वाटायचं त्याला. उत्तर माहीत असूनही तो प्रत्येकाला विचारायचा, आणि अखेर एकटा चालता पडायचा. आजही तो एकटाच उपस्थित होता त्या भरलेल्या सभागृहात.
  • त्याच्या पत्नीची मृत बहिण (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३०)

    असे अनेक कलाकार, साहित्यिक, सिने दिग्दर्शक, चित्रकार होऊन गेले की ज्यांची एखादी निर्मिती लोकांनी डोक्यावर घेतली व पुढे तो तशीच उत्तम निर्मिती न केल्यामुळे नामशेष झाला. कांही “वन फील्म वंडर” नट, दिग्दर्शक होऊन गेले. लेखकाने ही गोष्ट ह्याचा उपहास करण्यासाठी लिहिली आहे. सारखीच उच्च दर्जाच्या निर्मितीची अपेक्षा चुकीची आहे, हे त्याला सांगायचं आहे. “लेडी आॕर टायगर” (वाघ की सुंदरी) ही पूर्वी आलेली कथा फ्रँक स्टॉकटनचीच आहे.
  • नागपंचमीची धमाल

    आजही लहानपणचा तो किस्सा आठवला की मलं खूप खुप हसू येतं.ते झाड,ते सणाचे वातावरण,त्या परंपरांना मी खुप मिस करतो. त्या सगळ्या गमती जमती आता इतिहास झाल्यातं असं वाटाया लागतं..आताशा गावंही बदललीतं,हिरवाई कमी होऊन तिथबी सिमेंटचे जंगलं वाढलीतं.काळासंगटच परंपराबी बदलल्यातं…आठवणी मात्र तशाच आहेत….!!!

  • तुमसे अच्छा कौन है? – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ९

    देव सुद्धा, कधी कधी कोणत्या धुनकीत लग्नाच्या गाठी मारतो कोणास ठाऊक? आता माझं लग्न लव्ह मॅरेजच आहे म्हणा. दोन चार महिने आम्ही भेटत होतो. साधारण तो थोडासा रिझर्व्ह वाटला, पण चालता है. असतात काही माणसं अंतर्मुख. अन अशी माणसं कमालीची शांत आणि ‘कुल’ असतात.