नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

सकाळचे ७ वाजले तरी रवींद्र अजून उठला नाही हे पाहून ताईने खोलीत जाऊन हाक मारली, तशी “उठतो ग” असे उत्तर तिला ऐकायला आले. आई ला जाऊन ३ दिवस झाले होते. ताई आणि तिचे मिस्टर दिवस कार्य होई पर्यंत तिथेच राहणार होते. दोन्ही काका परत मुंबई ला गेले होते ते दहाव्याला येतो असे सांगूनच. मावसभाऊ बाजूच्या गावातच असल्याने त्याने २ दिवस चक्कर मारली होती. पूर्वी गावात दिवस कार्य असले की तेराव्या दिवशी गाव जेवायचे, पण आता तसे राहिले नव्हते, परिस्थिती बदलली होती. वरची पाखाडी, खालची पाखाडी आता विभागली गेली होती आणि त्यात सुद्धा गावात शिल्लक अशी किती लोकं होती. अर्ध्याहून जास्त शहरात शिकायला, नोकरीला स्थायिक, काही म्हातारी माणसं आणि जी काही तरुण शिल्लक होती त्यातली अर्धी पर्यटनाच्या नादाला लागून दारूच्या नशेत गाडली गेली होती. त्यामुळे आईच्या दिवस कार्याला काही गाव जेवणार नाही हे रवींद्र ला ठाऊक होते.

“हो तर ! येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता दीनानाथ नाट्यगृहा समोरून आपली बस निघेल. प्रवास साडेतीन तासांचा आहे. रात्री साडेआठला बस डहाणू समुद्र किनाऱ्यावर पोचेल. वाटेत सुका नाष्टा मिळेल. ही सहल अविस्मरणीय करायला आपल्या सोबत आहेत आपले लाडके वपु.”

आपल्या दु:खी जीवनाकडे संगीता तटस्थ वृत्तीने पाहू लागली होती. आपल्या कामात तिने झोकून दिले होते, आपल्या एकाकी जीवनात कोणताही बदल होणार नाही हे तिच्या मनानी पचविले होते, आपल्या नशीबाचे भोग आपण एकट्यानेच भोगले पाहिजेत हा वैचारिक बदल घडत चालला होता.

शाळा सोडून दोन वर्ष पूर्ण झाली होती मी आई समवेत दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जात होतो. त्यावेळी एक दिवसाला पगार मला 75 पैसे व आईला सव्वा रुपया मिळत असे. वडील दुखण्यामध्ये गेलेले त्यांच्या वजना बरोबर दवाखान्यात पैसा घातला. देव देव उतारे खेतारे केले पण शेवटपर्यंत वडील दुखण्यातून उठले नाहीत.

विजय त्याच्या कार्यालयात बसलेला होता त्याच्या कार्यालयाच्या बाहेर दोन म्हाताऱ्या गप्पा मारत बसलेल्या होत्या. लोकांच्यात चाललेला संवाद हे विजयच्या साहित्यिक भुकेसाठी नेहमीच खाद्य ठरत असते त्यामुळे तो त्या म्हाताऱ्या स्त्रियांमध्ये चाललेला संवाद कान लावून ऐकत होता. त्यातील एक म्हातारी फक्त दुसरी म्हातारी जे काही बोलत होती ते कान देऊन ऐकण्याचे काम करीत होती. ती बडबडी म्हातारी त्या दुसऱ्या म्हातारीला सांगत होती…” मला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे मोट्या मुलाला दोन मुलगे आहेत आणि मुलीला एक मुलगा एक मुलगी आहे लहान मुलाला अजून काही नाही… त्याचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे..

फोल्डिंगच्या खुर्च्या बघितल्या होत्या. पण भिंतीत घडी होणाऱ्या खुर्च्या सरळ भिंतीत उभ्या राहतात आणि छोटेखानी दिवाणाची जागा मोकळी होते. भिंतील खेटून उभ असलेल पुस्तकाच कपाट रात्र झाली की आडव होत

मी आणि ती खूप जुने मित्र आहोत. खूप काही बोलतो, मी भडकतो कधी कधी पण ते तितकेच असते. आज कधी नव्हे तो वर्षा दीड वर्षाने बीअर पीत हॉटेलमध्ये बसलो होतो..
आरू, लता आणि राज, त्यांच्या गावी ट्रीपला आले. 14 फेब्रुवारीला राज आणि लता गढीवर फिरायला गेले. लता एकटीच परत आली. तिनं सांगितलं, राज तिच्याशी भांडण करून निघून गेलाय. त्यानंतर राज परत कधीच, कुणालाच दिसला नाही. त्याला शेवटचं भेटलेली व्यक्ती लता आहे. पण राजच्या शोधला उपयोगी पडेल असे कोणतेच उत्तर ती देत नाहीये….

अनघा दिवाळी अंक २०२१ मध्ये प्रकाशित झालेली सुप्रसिद्ध लेखिका भारती मेहता यांची कथा.

स्मिता कॉम्प्युटर इंजिनीअर. चार वर्षे झाली विक्रोळीला एका छोट्याशा कंपनीत नोकरीला होती. तिला प्रोग्रॅमिंग व काही क्लाएंटचे प्रोजेक्ट्स बघावे लागत. ती घरातून बारा-साडेबाराला निघे व रात्री बारा साडेबारापर्यंत परत येई. अर्थात तिला कारने घरापर्यंत ड्रॉप असे. पण काल रात्री तिला अजिबात झोप आली नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti