(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • शेजार’ ….. (कथा)

    आयताकृती फडके वाडा … आयताच्या एका बाजूला झाकलेली विहीर , पंप रूम आणि चाफ्याचं मोठं झाड .. उरलेल्या तीनही बाजूंना एक मजली चाळीसदृश घरं … अगदी बाजूबाजूला लागून … दोन्ही कोपऱ्यात लाकडी जीना …. मध्यभागी सगळं अंगण … अंगणात काही उगाच वाढलेली तर काही मुद्दाम लावलेली झाडं ….

  • शंभरी काश्या

    इतिहासाने ज्यांना दीर्घकाळ उपेक्षीत ठेवलं ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छावा संभाजी महाराजांना ‘तह’ कधीच मान्य नव्हता. ७०च्या दशकात त्या संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत सुंदररित्या वठवून त्या अनभिषिक्त राजाला न्याय देण्याचा काम ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्यातून केले ते म्हणजे मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर. घाणेकरांना सुद्धा तडजोड, लाचारी मान्य नव्हतीच. म्हणून ज्या नाटकाने त्यांना मराठी व्यावसायिक रंगभूमीवर एक वेगळी प्रतिष्ठा आणि ओळख निर्माण करून दिली ते प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या अवघ्या १०० प्रयोगांच्या ‘घोडदौडी’नंतर घाणेकरांनी ते नाटक सोडून दिले. कारण त्यांना खाजगी सुपाऱ्या पटत नसे आणि त्यामुळे दि गोवा हिंदू असोसिएशन्सशी मतभेद झाल्यामुले डॉक्टरांनी ‘रायगड’ला राम राम ठोकले.असे कलंदर व्यक्तिमत्व आणि बेधडक स्वभाव असलेले नट क्वचितच पाहायला मिळतात.

  • वेगळा भाग ११

    प्रेम हि एक अशी गोष्ट आहे ती कधी कुणालाहि कुणाबद्दलहि वाटू शकते , प्रेमाला रंग -रूप कळत नाही कि जात-पात कळत नाही कि गरीब- श्रीमंत हि कळत नाही , त्या  दोघांमध्ये  नेहमी एक अखंड प्रेम करत असतो आणि दुसरा त्याला  प्रतिसाद देत असतो.

  • संस्कृत साहित्यातील कथा – क़मांक १ – अभिज्ञानशाकुंतलम्

    नवीन मालिकेत संस्कृत साहित्यातील काही नाटकांच्या, काव्यातील किंवा गद्यातील कथा सांगणार आहे.
    ह्यापूर्वी मी मृच्छकटिक नाटकाची कथा आपल्याला सादर केली होती.
    संस्कृत साहित्य म्हटल्यावर नेहमीच पहिले नांव कालिदासाचे येते.
    “पुरा कविनां गणनाप्रसंगे कनिष्ठीकाधिष्टीत कालिदास:। ततस्तत्तुल्यकवेर्भावात् अनामिका सार्थवती बभूव॥
    पूर्वी श्रेष्ठ कवींची गणना करतांना करंगळीवर प्रथम कालिदासाचे नांव घेतले.
    मग त्या तोडीचा कवी न मिळाल्याने अनामिका हे नाव (डावीकडून दुसऱ्या बोटाचं) सार्थ झालं.

  • गावाकडची गोष्ट – हिरा मावशी

    मी शाळेत शिकायला असताना अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. खरंतर मराठी शाळेमध्ये शिकायला मला फार आनंद वाटत असे. वर्गामध्ये भिताडवर रंगीबिरंगी लावलेले सुरेख अक्षरातील तकते वेगवेगळी काढलेली सुरेख चित्रे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सुरेख देखावा पुन्हा पुन्हा पहावा व या चित्रावर ती काहीतरी लिहावे असे माझ्या मनाला नेहमी वाटत होते. त्यातील काही म्हणी अजून आठवतात खत देऊन जाते,गोत देऊन जाते, हातच्या काकणाला आरसा कशाला, अशा अनेक म्हणी प्रत्येक वर्गाच्या भिताडावर सुरेख अक्षरांमध्ये लिहिलेल्या दिसत होत्या. वर्गातील शिक्षक मुले व मुली शिस्तीचे पालन करीत होते खाकी हाफ शर्ट पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट व डोकीला पांढरीशुभ्र टोपी. काखेत अडकवलेलं शाळेचे दप्तर घेऊन मी शेतातून चिखल तुडवित शाळेला रोज जात असे. मराठी शाळा म्हणजे एक ज्ञान मंदिर याच ज्ञान मंदिरात ज्ञानाची पूजा केली जात होती. पूर्वीचे मास्तर विद्यार्थ्याला कळेपर्यंत शिकवत होते एखाद्यावेळी प्रश्नाचे उत्तर नाही आले तर छडीने मारत होते.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ५२)

    भविष्य कोणालाही बदलता येत नाही. त्याने ते बदलण्यासाठी लाख भर रुपये खर्च केले तांत्रिक आणि मांत्रिकाकडे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्या राहत्या जागेत दोष होता. त्यांनी ती जागा वेळीच सोडायला हवी होती. पण माणसाचा मोह त्याच्या भावभावना आडव्या येतात. त्यात त्याच्या कुटूंबात कोणीही देवाधर्माचे काहीही करत नव्हते. फक्त संकट आले म्हणून त्यांना देवाची आठवण येत होती. त्याच्याकडून कधीही कोणताही दानधर्म घडलेला नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबात आलेल्या सुना त्याही नास्तिक होत्या.

  • एक परीस स्पर्श – भाग २

    त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता !

  • बिरबलाची माकडीण

    तसं पाहता शोभाच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे म्हणता येण्यासारखे प्रसंग मोजकेच होते… वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं… त्यानंतर -ती आणि तिची आई- एवढंच तिचं विश्व ! घरची परिस्थिती बेताचीच. शोभाचे वडील एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात पेन्शन वगैरेचा प्रश्नच नव्हता. त्यांच्या मृत्युनंतर कंपनीतर्फे मिळालेली खोलीदेखील सोडावी लागली होती. त्यामुळे दोघी मायलेकी अक्षरशः रस्त्यावर आल्या होत्या. पण शोभाच्या मामाला त्यांच्यावर दया आली आणि त्याने त्याच्या घरालगत असलेल्या एका छोट्या खोलीत दोघींची राहायची सोय करून दिली. ‘मी यापेक्षा जास्त काहीही करू शकणार नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत त्याने दोघींची बोळवण केली होती.

  • आरसा (कथा)

    सलून मधला प्रसंग आहे …..मी सलून मध्ये बसलो असताना बहुधा तिथेच आजूबाजूला राहणारा एक ५-७ वर्षांचा लहान मुलगा आत शिरला … मागोमाग त्याची आई आली आणि सलून मध्ये काम करणाऱ्या माणसाला आणि आपल्या मुलाला आळीपाळीने सूचना देऊ लागली .. .. “अहो , याचे केस कापून झाले न की त्याला फक्त बाजूच्या बिल्डींग च्या गेट पर्यंत सोडा …

  • एक परीस स्पर्श ( भाग – ४४ )

    मे महिना संपला की सर्वाना वेद लागतात ते पावसाचे ! पाऊस हा कवींसाठी थोडा विशेषच असतो कारण प्रत्येक कवीने पावसावर एकतरी कविता लिहिलेली असतेच ! विजयने पावसावर आतापर्यत दहा- बारा कविता तरी लिहिल्या होत्या. त्यात त्याची सर्वात आवडती कविता होती तर पावसात भिजताना ! ज्या कवितेत प्रियकर आपल्या प्रेयसीसोबत पावसात भिजण्याची कल्पना करत असतो. विजयासाठी ही खरोखरच कल्पना एक होती कारण प्रत्यक्षात विजय असा कधी कोणासोबत एका छत्रीत भर पावसात शिरल्याचे सध्यातरी त्याला आठवत नव्हते. पण भरपावसात विजय भिजलाय मात्र बऱ्याच जणींसोबत ! छत्री जवळ असतानाही ! विजय लहान असताना त्याला पावसात भिजण्याची प्रचंड आवड होती. पावसाचे पाणी तळहातावर झेलत राहायला तर त्याला आजही आवडते.