नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

दिव्या आणि विजयची भेट एका पतपेढीत झाली होती. आणि ती विजयच्या बाबांच्या ओळखीची होती. विजयच्या आयुष्यात आलेली ती सर्वात बिनधास्त मुलगी होती. म्हणजे कोणा मुलासोबत बोलताना आपल्याला कोणी पाहिलं तर वगैरेची तिला अजिबात चिंता नव्हती.
महाराष्ट्रातील बेंदूर सण. या दिवशी शेतकरी आपल्या रानधन्याला सजवतो. शेतीसाठी वर्षभर तो राबल्याबद्दल, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो… या सणावरुन मला माझ्या एका मित्राची आठवण होते.. त्याचं नाव मोहन!

“आई आता बास झालं हं तुमचं, चांगुलपणा शोधणं! प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा पाहावा, चांगुलपणा शोधावा हे ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आयुष्यभर चांगुलपणा शोधून तुम्हाला मिळालं काय, ते तरी कळू दे.” वृंदा चिडून चिडून बोलत होती आणि तितक्याच थंडगारपणाने त्यांनी उत्तर दिलं, “तुझ्यासारखी सून मिळाली.”
जून महिन्यातील साधारणपणे दुसरा आठवडयाचा सोमवार म्हणजे शाळा सुरु होण्याचा दिवस.. म्हणजेच आजचा दिवस!! दोन वर्षांपूर्वी या दिवशी छोटी मुलं नवीन कपडे घालून शाळेचा श्रीगणेशा करायला जात होती.
मला खूप लहानपणा पासून चष्मा लागलाय ,म्हणजे लावायला लागला . याला माझे क्रिकेटचे वेड कारणीभूत होते . असेन दहा बारावर्षाचा ,फॉरवर्ड शॉर्ट लेग माझी फिल्डिंग पोझिशन , नेहमीचीच . तेव्हा आजच्या सारखी हेल्मेट्स नव्हती .

तिघेही गाडीतून नदीच्या जवळ आली. गाडी बाजूला लावून घाटाच्या पायऱ्यांवरून ते गप्पा मारत फिरत होते. आरुला तर गांवी यायला आणि असे नदीवर फिरायला खूपच आवडत असे, पण हल्ली गांवी जास्त येणं होत नव्हतं. नील आणि दीच्या गप्पा चालल्या होत्या. बोलत बोलत ते दोघे थोडे अंतर पुढे निघून गेले.

चकोर पक्षी हा कोवळ्या चंद्रकिरणातील अमृत पिऊन जगतो अशी एक कल्पना आहे. चंद्रकिरणामधे शीतलता, मृदुता आणि संजीवकता असते. तिचा लाभ चकोराला होतो. असे हळुवार चंद्रकिरणांसारखे मृदुत्व योग्याच्या ठिकाणी असते. हे मृदुत्व आणखी कोणासारखे? तर पक्षिणीच्या पंखासारखे असते. आईच्या पंखांचा आश्रय हे पिलांचे सर्वस्व असते. कारण पंखांमुळे त्यांना उबारा मिळतो. पिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. योगी पुरुषांचेही असेच असते. त्यांच्यामुळे सर्वसामान्य माणसाला मानसिक आधार लाभतो..
प्राणी असो वा पक्षी, त्यांना आंघोळ ही फार प्रिय असते. चिमण्यां थोड्याशा पाण्यात सुद्धा डुबक्या मारुन पंख फडफडवीत आंघोळ करतात. कावळ्याला चार थेंब मिळाले तरी त्याची आंघोळ पूर्ण होते. हत्तीला डुंबायला भरपूर पाणी लागते. म्हशींना एखाद्या डबक्यात गळ्यापर्यंत डुबवून घेतले की, बाहेर यायची इच्छा नसते. मांजर ही आंघोळीच्या ऐवजी स्वतःला चाटून पुसून स्वच्छ करुन पाण्याची बचत करते.
बैजु बावरा’ चित्रपटाचा कधी उल्लेख झाला की, त्यातील शांत व निर्विकार चेहऱ्याचा नायक, भारत भूषण सर्वांना आठवतोच… या नशीबवान भारत भूषणला, मधुबाला व मीना कुमारी सारख्या सुंदर नायिका मिळाल्या.. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी वांद्रे येथील कार्टर रोडवरील समुद्रकिनारी एक बंगला खरेदी केला. पुढे हाच बंगला राजेंद्र कुमार यांनी भारत भूषण यांचेकडून अवघ्या साठ हजार रुपयांत खरेदी केला व त्याला नाव दिले, ‘डिंपल’!!

विजय ! म्हणजे तुझा लग्नसंस्थेवर विश्वासच नाही ? यामिनीने विचारलेल्या या प्रश्नात जोर होता. त्यावर विजय म्हणाला, ‘ लग्न संस्थेवर माझा विश्वास नाही असं मी म्हणालो तर तू म्हणशील अरे लग्नसंस्था नसती तर तुझा जन्मच झाला नसता हा आता तू जो विचार करतोयस तो वेचार करायला ! पण मी स्पष्टच सांगतो ! कुत्री मांजरे कुठे लग्न करतात तरी त्यांचा वंश वाढतो ना ? आमचा वंश वाढवा म्हणून आम्ही लग्न करतो ! अरे पण वाढलेला वंश पाहायला असतो कोण ? तसही म्हणतात की प्रत्येकाचा वंश दहा पिढ्या झाल्या की संपतो. तुला सांगतो कालच मला माझ्यापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान असणारा मित्र भेटला होता समाजाच्या नजरेत अंत्यत साधा भोळा भोळसट पण त्याने जे जे उकिरडे फुकले आहेत त्याबद्दल ऐकून मला पेलाभर पाण्यात डुबून मरावस वाटत होत. प्रत्येक आईवडिलांच्या नजरेत आपली मुलं धुतल्या तांदळाची असतात पण ती तशी असतातच असं नाही, आजचे आई- वडील आपल्या मुलांची लग्ने ठरवत नसतात तर फक्त नगाला नग जुळवू पहात असतात. त्यातही अज्ञानामुळे चुकीचे नग जुळवितात.
Copyright © 2025 | Marathisrushti