(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • हिला कुठेतरी पाहिले आहे…

    मी लांबूनच तिला बघत होतो…बघत बघत जवळ येऊ लागलो… ती म्हणाली ..पहेचाना .. मी असेच उत्तर दिले….. कैसी हो..आप….

  • ए फुलों की रानी

    लव्ह इन सिमला’ चित्रपटापासून तिची कारकिर्द सुरु झाली. सुमारे ३५ चित्रपटात काम केल्यानंतर तिनं चित्रसंन्यास घेतला.

  • हाकामारी ! (गूढकथा)

    “मायला, लाईट गेली जणू! या खेड्यात एकदा का लाईट गेली की, माहेराला गेलेल्या बायकु सारकी लवकर येत नाही! ” तो स्वतःशीच पुटपुटला. हेडलाईटच्या उजेडात समोरून वेडा वेताळ हातवारे करत उभा होता. गावात हा वेडा कसा आला कोणास ठाऊक? पण त्याच्या वेडाचा गावकऱ्यांना काही त्रास नव्हता, आणि भूतदयेपोटी कोणी त्याला हुसकावून लावले नव्हते. म्हणून तो येथेच स्थिरावला. याचे वास्तव्य कायम मसणवट्या जवळच्या पिंपळाखाली, म्हणून लोक याला ‘वेताळ’ म्हणून हाक मारत.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ४८ )

    विजयला राजकारण कितीही आवडत असले तरी प्रत्यक्ष राजकारणात जाण्यात त्याला रस नाही… सक्रिय राजकारणात जाण्याची संधी त्याला अनेकदा चालून आली होती. त्यावर त्याचे स्पष्ट मत असते मला गल्लीतील राजकारणात रस नाही…  म्हणजे त्याला छोटा विचार करायला आवडत नाही असा आहे.

  • वर्‍हाडातली गाणी – ६

    नदीच्या काठी राळा पेरला

    बाई राळा पेरला

    एके दिवशी काऊ आला

    बाई काऊ आला

    एकच कणीस तोडून नेल

    बाई तोडून नेल

    सईच्या अंगणात टाकून दिल

    बाई टाकून दिल

    सईन उचलून घरात नेल

    बाई घरात नेल

    कांडून कुंडून राळा केला

    बाई राळा केला

    राळा घेऊन बाजारात गेली

    बाई बाजारात गेली

    चार पैशाची घागर आणली

    बाई घागर आणली

    घागर घेऊन पाण्याला गेली

    बाई पाण्याला गेली

    मधल्या बोटाला विंचू चावला

    बाई विंचू चावला

  • खारीचा वाटा

    मी व्यवसायात उतरण्यात किंवा बेकरी सुरू करण्यात त्याचा अप्रत्यक्ष “सिंहाचा वाटा” असला तरी गेल्या दहा वर्षात या कंपनीची जी भरभराट झाली आहे त्यात मात्र माझ्या मित्राचा “प्रत्यक्षपणे” आणि अगदी “शब्दशः”.. .. “खारीचा वाटा“ आहे .. हाहा ss .. !! ….पौराणिक काळापासून चालत आलेला “खारीचा वाटा“ हा शब्दप्रयोग सगळ्यांनी पूर्वी अनेकदा ऐकलाय .. पण आमच्या सुरेशचा ; आजच्या आधुनिक युगातला हा “खारीचा वाटा“ नक्कीच वेगळा आणि तितकाच समर्पक आहे ना मंडळी ??

  • चूक

    विजय कोणत्यातरी कामात व्यस्थ होता इतक्यात त्याचा फोन खणखणला, पलिकडून त्याच्या एका ओळखीच्या गृहस्थाने जो स्वतःला त्याचा मित्र म्ह्णवून घ्यायचा पण विजयने ज्याला आपला मित्र कधीच मानला नव्हता, खंर म्ह्णजे ! विजयची जी मैत्रीची व्याख्या होती त्या व्याख्येत तो दूरपर्यंत कोठेही बसत नव्हता.

  • प्रेमरंगी रंगताना

    त्यानं दिलेल्या उपम्याची चव अजून जिभेवर रेंगाळत होती . तिला वाटलं , अजून थोडा उपमा हवा होता पोट भरण्यासाठी नाही , केवळ चवीसाठी .

    तिनं इकडे तिकडे पाहिलं .
    ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती .
    बहुतेक सगळ्यांच्या हातात त्यानं दिलेल्या उपम्याच्या डिश दिसत होत्या .
    आणि सगळे चवीनं खात होते .

    ” उपमा विकणारा गेला का पुढच्या डब्यात ? ”
    तिनं कुणाला तरी विचारलं . ज्याला विचारलं त्यानं पुढच्या डब्याकडे बोट दाखवलं . आणि तो खाण्यात मग्न झाला . ती गर्दीतून वाट काढत पुढच्या निघाली . पण तिला फार पुढं जावं लागलं नाही . दाराजवळच्या छोट्याशा जागेत तो उभा होता . पायाजवळ स्टीलच्या मोठ्या डब्यांच्या दोन पिशव्या ठेवल्या होत्या .
    ” संपला का उपमा ? “

  • जरा विचार करा

    पण ही खरंच हसण्यासारखी गोष्ट आहे का? इतक्या लहान मुलाने हा अविचार का केला असावा याचा विचार करण्याची आवश्यकता आहे असे नाही वाटत? कोणत्या परिस्थितीमुळे हा मुलगा गुन्हेगारी विचाराकडे वळला?

  • प्रल्हाद!

    ‘ त्यात काय अवघड आहे?’ हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली.

    गोष्ट जुनीच आहे. आमच्या परळीच्या (तेव्हा परळी ‘आमची’ नाही, तर माझी होती!) एका बँकेत मी ‘पासबुक रायटर’ म्हणून टेम्पररी (आमच्या शाम्या त्याला -टेम्परवारी म्हणायचा) लागलो होतो. बँकेचा क्लर्कच्या परीक्षा झाल्या होत्या, नवीन उमेदवार पोस्ट होईपर्यंत मला काम करता येणार होते. असेन तेव्हा वीस बावीस वर्षाचा. गाव छोटस होत, येथेच मी लहानाचा मोठा झालो होतो, शाळा कॉलेज इथलंच.