नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
पहाट….कसली मध्यरात्रच ती… तीन सव्वा तीन वाजले होते, ब्रेक चां कर्ण कर्कश आवाज करून बस एका ढाब्यावर थांबली, महत्प्रयासाने सुमारे तासा भरा पूर्वी लागलेली झोप मोडल्या मुळे चरफडत ‘ मानसी ‘ उठली आणि डोळे किलकिले करून तिने खिडकी बाहेर पाहिले, कुठला तरी ‘ दिलखुश इन’ नावाचा पंजाबी ढाबा ‘ दिसत होता. “


…. नंतर त्याचा व्हिडीओ बनवला. अर्थात गळ्यात फास वगैरे अडकवून. तो व्हिडीओ व्हायरल होईल याची त्याला खात्री होतीच. मग त्याने न्यूज चॅनल ऑन केलं. अपेक्षेप्रमाणे त्याच्या आत्महत्येची न्यूज सुरू झाली होती. मग नेहमीचे यशस्वी कलाकार मेकअप करून बाईट्स द्यायला सज्ज झाले. त्याच्या आत्महत्येचं राजकारण सुरू झालं.
मुमताजसाठी शहाजहानने ताजमहाल बांधला, हे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं होतं. आमच्या पिढीनं हिंदी चित्रपटातील मुमताजसाठी, आपापल्या हृदयालाच ‘ताजमहाल’ केलेलं होतं…

वर्गात प्रतिभा अतिशय हुशार असण्याबरोबरच वकृत्व आणि अभिनय याचीही तिला योग्य जाण होती. शाळेत होणाऱ्या वत्कृत्व आणि नाटयस्पर्धेत ती नेहमीच भाग घेत असे त्यात तिला बक्षीसही मिळत असे आपल्या यशाचे श्रेय प्रतिभा नेहमीच आपल्या आईला देत असे . ते देताना ती म्हणे ” माझ्या आईने मला नेहमीच मी मुलगी असूनही एखादया मुलाप्रमाणे स्वतंत्र दिलं !

कानी मोबाईल, गालात हसतेय, ताई आमची खुषीत दिसतेय
दारापुढे स्कूटर थांबली, ताई धावत बाहेर गेली
मिस्टरांची स्वारी आली, ताईसाहेबांची कळी खुलली
आई-बाबा स्वागता आले, आजी-आजोबा खुष झाले
मी पण पुढे सरसावले, भावोजींच्या कानी लागले
जावई आले नवे जावई आले, घर-दार खुष झाले
-- सुधा नांदेडकर
जेव्हा ‘मुख-पुस्तकावरी'(याला हल्ली मराठीत फेसबुक म्हणण्याचा प्रघात आहे.) ‘लाईक’ न देऊन आमुची लायकी दाखवायला वाचकांनी सुरवात केली, तेव्हा आम्ही हबकलो. भिडे खातर येणारे बदाम सुद्धा बंद होऊ लागले! मग मात्र वाचकांना -तुला पाहतो रे -म्हणण्याची पाळी आली. मुळात ‘वाचक’ म्हणजे कोण?आणि काय? तसेच त्यांचे प्रकार कोणते? हे पहाणे आमच्या साठी अगत्याचे होऊन बसले.

संध्याकाळी प्रतिभा तिच्याकडील चावीने दरवाजा उघडून स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते इतक्यात दारावरची बेल वाजते … प्रतिभा स्वयंपाकघरातून धावत येऊन दरवाजा उघडते तर दारात यामिनी उभी असते… आता आल्या आल्या यामिनी सोफ्यावर अंग टाकते आणि

पोलिसदल कायद्याने रीतसर स्थापन होण्या पूर्वी म्हणजे १८६१ पूर्वी संस्थानिक आणि राजे रजवाड्यांच्या काळात त्यांनी नेमलेले कोतवाल पोलिसाचे काम बजावत असत. कोतवालांचे इमान हे निव्वळ त्यांच्या स्वामींशी . न्यायी राजांचे काही मोजके अपवाद सोडले तर बाकी सगळ्यांचा लहरी कारभार. त्यांच्या लहरी सांभाळणे हेच त्या कोतवालांचे आणि त्यांच्या दलाचे मुख्य काम .

मी आधी सही करणार ., ती म्हणाली .. नाही मी आधी सही करणार मी म्हणालो.. दोघेही हसत म्हणालो.
Copyright © 2025 | Marathisrushti