(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • राणीसाहेंबाचे गुपित

    यशवंत आरामखुर्चीत रेलले होते. चंदू लॅपटॅापवर काहींतरी पहात होता. आत्याबाई चहाचा ट्रे घेऊन आल्या आणि दरवाजाची बेल वाजली. आत्याबाईंनी दार उघडले. बाहेर एक बुरखाधारी स्त्री उभी होती. “मला डिटेक्टीव्ह यशवंतना भेटायचं आहे.” ती स्वच्छ मराठीत म्हणाली. आत्याबाई म्हणाल्या, “या, आंत येऊन बसा. साहेब येतील आता. तुम्ही चहा घेणार कां?” ती स्त्री सोफ्यावर ऐटीत बसली.

  • एक परीस स्पर्श (भाग – २४)

    याबाबतीत मात्र विजय पूर्वीही बदनाम होता आणि आज ही कितीही सुंदर आणि गोड आवाज असणाऱ्या तरुणीने त्याला फोन केला तरी तो तिच्याशी अधिकचा एक शब्दही बोलत नाही.  पण एखादी समोरा – समोर भेटली आणि तिची बोलण्याची इच्छा असेल तर तो थांबतही नाही.

  • मी आणि ती’ – २

    घरी….आज काय आहे… माहीत आहे ना… काय आहे? गटारी… अरे विसरलेच.. आज तर भेटू. तू घरी आहे…आपल्याकडे स्टॉक आहे. मी म्हणालो…

  • रुद्रा – कादंबरी – भाग १९

    राघवन ते पाकीट उघडले. त्यात एक आठ गिबिचे कार्ड होते. त्याने ते समोरच्या लॅपटॉपमध्ये इन्सर्ट केले. आणि डोळे फाडून स्क्रीनकडे पहात राहिला. त्यात रुद्रा संतुकरावांच्या खुर्चीमागे उभाराहून त्यांचे तोंड दाबत होता आणि ते हातपाय झाडात होते, मरे पर्यंत!
    या रुद्राला फासावर जाण्याची इतकी कसली घाई झाली आहे? देशभरातीत सगळ्या न्यूज चॅनल्सवर एकच ब्रेकिंग न्यूज होती.’संतुकराव सहदेव यांच्या खुन्यास अटक!’

  • लोकल

    पहिला वर्ग असू द्या नाही तर दुसरा वर्ग, इतक्या गर्दीतून तास-दोन तास मेंढरांसारख डब्यात कोंडून तुम्ही प्रवास करता तरी कसा ? आपल्याला तर गुदमरल्यासाखं होतं. परगांवाहून आलेला पाहुणा सांगत राहतो. ‘आम्हाला याची सवय आहे’ मुंबईकर अभिमानाने सांगत राहतो. रोजची दगदग हसत-हसत झेलत राहतो. लोकल पकडण्याचं आणि उतरण्याचं भयंकर दिव्य रोजचं करीत राहतो.

  • ।। मानसपूजा ।।

    शुभंकर शिवशंकरच्या शुभाशीर्वादासाठी शब्दांच्या माध्यमातून साकारलेली ही मानसपूजा सादर करताना खूप आनंद होत आहे !

  • हुक्का पार्लर

    नाम्या शेट बाहेरून लॉक लावलेल्या खोलीच्या दरवाजाला असलेल्या ग्रील पलीकडे बोंबलणाऱ्या स्वतःच्या वीस वर्षाच्या मुलाकडे असहायपणे बघत होता. त्याच्याकडे बघता बघता त्याला हुंदका अनावर झाला.

  • कर भला

    शिवाजी रोडने मंडईकडून शनिपार मार्गे ऑफिसवर पोहोचेपर्यंत वाटेत कधी कुणी गरजू वृद्ध स्त्री-पुरुष दिसले तर, त्यांना दोन-पाच रुपये देऊन पुढे जातो. हे पैसे देऊन मी फार मोठे कार्य करतोय असं नाही, तर मला तसं केल्याने एक आत्मिक समाधान लाभतं..

  • का ? हा प्रश्न (मी आणि ती)

    का ? हा प्रश्न आपण कुणालाच विचारू नये.असे माझे स्पष्ट मत आहे. तसा मी तिलाही कधीच विचारला नाही. कारण तिच्या ‘ अफाट बुद्धिमतेची’ मला आधीच कल्पना आली होती. खरे तर ती माठ होती माठ . मुख्य म्हणजे तिलाही त्याची कल्पना होती.

  • तुझसा’ नहीं देखा

    चैतन्य महाप्रभु’ चित्रपटात तिच्यासोबत आशा पारेख होती. ‘गुंज उठी शहनाई’ चित्रपटात आधी आशा पारेखच काम करणार होती, ऐनवेळी ते काम अमिताला मिळालं. चित्रपट तुफान लोकप्रिय ठरला. चित्रपट नायकप्रधान असल्याने प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. फक्त राजेंद्र कुमार!!