नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
पाच-दहा मिनिटांतच एक उंचीपुरी, गौरवर्णी, तरतरीत मुलगी आत आली. वेळेवर पोचतो की नाही यामुळे येणारा एक प्रकारचा अस्वस्थ भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. ती घाईने क्लार्ककडे आली आणि तिने विचारलं, “का हो, कुणी केदार देशपांडे आले आहेत का?”
किशोर साव हा आमचा खूप जुना दोस्त. त्याच्या ‘दी गेम’ या पहिल्या नाटकापासून आमची मैत्री. काही वर्षांपूर्वी त्याचा ‘ब्लफमास्टर’ नावाचा धम्माल मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्याशी दिघेची भेट घालून द्यायची असं ठरविले.

ओ हेन्रीच्या ह्या कथेची नायिका राजकन्या जोसेफा निर्भय, चतुर शिकारी आहे. गीव्हन्स तिच्यावर छाप पाडण्यासाठी खोटं बोलतोय, हे तिला लगेच लक्षांत आलं. त्याला वाटत असतं की तो सिंह आपला पाळीव प्राणी होता, असं सांगून तो तिला फसवतोय.

त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कथा , कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या आणि मला स्वतःची अशी ओळख दिली. त्यावेळी महाराष्ट्रभर जाणाऱ्या माहेर , मेनका या लोकप्रिय मासिकांमधून आणि रविवारची जत्रा या लोकप्रिय साप्ताहिकामधून त्यांनी मला प्रचंड प्रसिद्धी दिली ,जी रत्नागिरीसारख्या ठिकाणी असणाऱ्या मला दुर्मिळ होती. यथावकाश अन्य पुस्तकं प्रसिद्ध झाली. मानसन्मान , पुरस्कार लाभले. पण त्या पहिल्या पुस्तकाच्या आठवणी काही औरच!
मी मुंबईला कॉलेज शिक्षणासाठी आलो. चांगला अभ्यास करून डॉक्टर झालो. म्हणजे एम्.बी.बी.एस्! त्याकाळात डॉक्टर म्हणजे एम्.बी.बी.एस् आणि फारच तर एफ्.आर.सी.एस्. (लंडन). पण फार श्रीमंत बापाची पोरच लंडन, फिंडन् करायची. पण एम.बी.बी.एस. म्हणजे फार मोठा डॉक्टर, त्यावेळी. आता एम.बी.बी.एस.ला डॉक्टरपण विचारत नाहीत. आता लागतो एम्.एस.एम.डी! वगैरे! काही दिवसांनी त्यालाही कोणी विचारणार नाही. मग लागतील एम.डी. म्हणजे मॅड, नाही बरं का- मास्टर ऑफ ऑल डिसिप्लीन!” माझं हे असं होतं बघा. तर काय सांगत होतो- हां, मी डॉक्टर झालो आणि याच परिसरात मी माझी प्रॅक्टिस चालू केली. आमच्या बंगल्या समोरून डावीकडे गेलात ना, तर विवेकानंद चौक लागतो. तिथे ‘निलायम’ ट्विन थिएटर (जुळे सिनेमागृह) आहे. तिथे पूर्वी एक फार जुने नाट्यगृह होते. तिथे फार चांगले चांगले कार्यक्रम, नाटके, संगीत सभा, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे व्हायचे. पण एका बिल्डर डोम कावळ्याने ते पाडून तिथे हे जुळे थिएटर बांधले आहे. तिथे आता थर्डक्लास पिक्चर दाखवतात.
स्वातंत्र्यापूर्वी, वीर सावरकरांनी ‘काळया पाण्या’ची शिक्षा भोगली! ती ही अंदमान सारख्या त्याकाळातील निर्जन अशा बेटावर.. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली.. नेहरू, गांधी, वल्लभभाई पटेल अशा अनेकांनी भारत देश स्वतंत्र व्हावा, म्हणून कारावास भोगला..

एकदम सायकली? आणखीन काही नको का?” शेटजींचं उपहासात्मक बोलणं ‘सुखा’च्या लक्षात आलं. तो म्हणाला, “रागवू नका शेठजी, आम्ही राहतो ते जव्हारच्या पुढे खूप आडगाव आहे. आदिवासी पाडे तिथे आहेत. नीट शिक्षण नाही. दवाखाने नाहीत. शाळेला पोरान्ला पाच-सहा मैल चालत जावं लागतं. दुकानं नाहीत.
रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें.

त्या तिघांच्या जीवनातील रोजची सकाळ आजही नेहमी प्रमाणे उजाडली होती. मौशु नेहमी प्रमाणे शाळेत जाण्याची तयारी करत होती. बाबा बरोबर मजेत शाळेत गेली. संगीताने नेहमी प्रमाणे १० वाजता घर सोडले.
गेल्या दोन दिवसान पासून सूर्य दर्शन नाही. बाहेर पावसाची रिप रिप सुरु आहे. हवेत सुखद गारवा आहे. अशी बाहेर पाऊसाची झड लागली कि मी अंतर्मुख होतो. आत्ताही एकटाच हाती कॉफीचा मग घेवून, खिडकीबाहेरचा पाऊस आणि गार वाऱ्यात ओले झालेले त्याचे तुषार चेहऱ्यावर झेलताना होणारा अल्ल्हाद एन्जोय करतोय. काळ्या – निळ्या ढगांनी भरून आलेलं आभाळ, त्या पावसाच्या रेशमी सरी, कॉफी आणि हेडफोन मधून एकू येणार ‘ रिमझिम के तराने लेके आई बरसात ‘ हे गाण!(रफी + गीतादत्त ), या क्षणा साठी मी स्वर्गसुख सुद्धा लाथाडीन!. पावसा पेक्षा पावसावरची गाणीच ज्यास्त असतील. पण या गाण्यात मी गुतलोय. मला ते खूप आवडत. कारण मलाही कोणाची तरी ‘ पहिली मुलाकात ‘ याद येत.
Copyright © 2025 | Marathisrushti