(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • लोकमान्यांचे जन्मस्थळ रत्नागिरी

    रत्नागिरी हे कोकणातील महत्त्वाचे शहर आहे. येथील किल्ला प्रसिध्द असून, तो विजापूरच्या आदिलशहाने बांधलेला आहे.

    देशाच्या पश्विम किनार्‍यावर वसलेले या शहरातील बंदर प्रसिध्द आहे. येथील थिबा पॅलेस, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेले पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थळ प्रेक्षणीय आहे.

  • फिजी

    फिजीचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Fiji; फिजीयन: Matanitu ko Viti; फिजी हिंदी: फ़िजी गणराज्य) हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे ३३२ बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी ११० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेवू व व्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावरच वसली आहे व ७५ टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.

  • एलुरु

    एलुरु हे आंध्र प्रदेशातल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. विजयवाडा आणि विशाखापट्टणम यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५ वर ते वसले आहे.

  • शहीद शिरीषकुमारांचे नंदुरबार

    महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला.

  • मलावी

    मलावीचे प्रजासत्ताक हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील एक चिंचोळा भूपरिवेष्ठित देश आहे. १९६४ सालापर्यंत ब्रिटिश वसाहत असलेला हा देश न्यासालँड ह्या नावाने ओळखला जात असे. मलावीच्या उत्तर व पूर्वेला टांझानिया, पश्चिमेला झांबिया तर इतर दिशांना मोझांबिक हे देश आहेत. मलावीच्या पूर्वेस न्यासा हे आफ्रिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. लिलाँग्वे ही मलावीची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्लँटायर हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

  • सातारा-नामवंत व्यक्तीमत्वे

    झाशीची राणी लक्ष्मीबाई (धावदाशी येथे जन्म), पेशवाईतील तत्त्वनिष्ठ न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे(माहुली) या दोघांचा जन्म सातारा जिल्ह्यातच झाला होता. त्याचप्रमाणे थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, विष्णुशास्त्री पंडित, ‘सुधारक’कार आगरकर व भारतातील पहिल्या शिक्षिका सावित्रिबाई फुले,नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म साता-यातील रहिमतपूर इथला.

  • ग्रेनेडा

    ग्रेनेडा हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. ग्रेनेडा ह्याच नावाचे मोठे बेट तसेच ग्रेनेडीन्स द्वीपसमूहातील दक्षिणेकडील सहा बेटे ग्रेनेडाच्या अधिपत्याखाली आहेत तर उत्तरेकडील बेटांवर सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची सत्ता आहे.

  • अॅबॉमीतील राजवाडे

    बेनिन येथील अॅबॉमी राजघराण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाला विशेष महत्व आहे.

    १६२५ते१९०० या काळात १२ राजांनी येथे वास्तव्य केले.

    ४४हेक्टर परिसरात पसरलेल्या या परिसराची नोंद जागतिक वारसा यादीत आहे.

  • पुण्याजवळची उद्योगनगरी – चाकण

    पुणे जिल्ह्यातील प्रसिध्द शहर. चाकणजवळच वेगाने विकास होणारी MIDC ची औद्योगिक वसाहत आहे.

  • नांदेड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

    नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर व मुखेड येथे औद्योगिक वसाहती आहेत.शिवाय जिल्ह्यात ६ साखर कारखाने आहेत.