महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
विलुप्पुरम हे तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. राज्यातील हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून, या शहराचा कारभार महापालिकेमार्फत चालतो.
हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस असून,हिंगोलीच्या उत्तरेस अकोला जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा, दक्षिण-पूर्वेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा परभणी जिल्ह्याचा एक भाग होता.
गुटी हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. प्राचीन काळी हे शहर सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा एक भाग होते.
सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून १ कि.मी. अंतरावर कुरटे बेटावर असून,छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे व हाताचे ठसे येथे पाहावयास मिळतात.येथे राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदिर बांधले आहे.
जळगाव जामोद हे बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटे शहर असून, तालुका मुख्यालय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर असलेले हे शहर सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले आहे.
इच्छापुरम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेवर हे शहर वसले असून, या शहराच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.
होन्डुरासचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. होन्डुरासच्या उत्तर व पूर्वेस कॅरिबियन समुद्र, नैऋत्येस प्रशांत महासागर, दक्षिणेस निकाराग्वा तर पूर्वेस ग्वातेमाला व एल साल्व्हाडोर हे देश आहेत. तेगुसिगल्पा ही होन्डुरासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातला पण त्यांनी शैक्षणिक कार्याची सुरुवात केली ती सातारा जिल्ह्यातनं. महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांतून व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रत्यक्ष सहवासातून कर्मवीरांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली.विचारांती त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडले व १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली.
रायगड जिल्ह्यात आगरी, समाज तसेच कातकरी, ठाकर, वारली या आदिवासी जमातींचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्याला भरपूर लांबीचा सागर किनारा लाभला असल्याने मासेमारी करणार्या कोळी जमातींची वस्तीही देखील मोठ्या प्रमाणावर आहे.
क्वालाट हा बहारीनमधील प्राचीन किल्ला आहे. १६ हेक्टरमध्ये पसरलेल्या या किल्ल्यावर पोर्तुगीज वास्तुशैलीची छाप आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti