(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

  • उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकजीवन

    जिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • जर्मनी

    जर्मनी हा जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली.

  • व्हॅटिकन सिटी

    व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर-देश आहे. व्हॅटिकन सिटी शहर इटलीमधील रोम शहरामध्ये वसले आहे व पोपचे अधिकृत निवासस्थान आहे.

  • पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर सासवड

    सासवड हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते आचार्य अत्रे यांचे जन्मगाव आहे.

  • एर्नाकुलम

    एर्नाकुलम हे केरळ राज्यातल्या कोची शहराचे जुळे शहर आहे. एर्नाकुलमला ‘केरळची आर्थिक राजधानी’ असे म्हणतात.

  • अॅबॉमीतील राजवाडे

    बेनिन येथील अॅबॉमी राजघराण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाला विशेष महत्व आहे.

    १६२५ते१९०० या काळात १२ राजांनी येथे वास्तव्य केले.

    ४४हेक्टर परिसरात पसरलेल्या या परिसराची नोंद जागतिक वारसा यादीत आहे.

  • अष्टदशभुज गणेश, रामटेक

    भगवान रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक शहरात पुरातन अष्टदशभुज गणेश मंदिर आहे. हे मंदिर ११-१२ व्या शतकातील असल्याची नोंद असून १८ हात असलेली ही एकमेव मूर्ती आहे.

  • वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय मनोरा

    मनोरा हे शहर वाशिम जिल्ह्यातल्या मंगलपीर उपविभागातील तालुका मुख्यालय असलेले एक शहर आहे. अकोला. शहरापासून ते ८९ किलोमीटरवर वसलेले आहे.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

    थिबा पॅलेस –  हे रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. या ९७ वर्षांच्या जुन्या राजवाड्याचे ब्रह्मदेशाच्या इतिहासाशी नाते आहे. ब्रह्मदेशात ७ वर्षे सत्ता गाजविलेल्या राजा थिबा याची राजवट इ.स. १८५५ मध्ये ब्रिटिशांनी उलथवली.

  • सांगली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तिमत्वे

    वि.स.खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.