

'सामर्थ्य आहे चळवळीचे' ही समर्थांची उक्ती सर्वज्ञात आहे. निश्चितच चळवळीत सामर्थ्य असते. अशाच एका चळवळीच्या सामर्थ्यातून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे नऊ दिवस घालायचे आणि फोटो काढून पाठवायचे. एक मजेचा भाग म्हणून छान वाटतं. पण ही काही परंपरा / धार्मिक रीत आहे का? अजिबात नाही. फेसबुक आणि सोशल मीडियाच्या काळाआधी म. टा. / लोकसत्तेच्या पुरवणी मधून नवरात्रीचे नऊ रंग छापून येऊ लागले. त्याबरोबर वेगवेगळ्या ऑफिसेस मधले ग्रुपफोटो छापायला लागले. प्रसिद्धी मिळाल्याने अजूनच हे प्रस्थ पसरत गेले.
मन सहाजिकच भूतकाळात गेले. आई आजी कडे होत्या का एवढ्या साड्या आणि त्या ठेवायला मोठे वॉर्डरोब. घरात एक दोन कपाटं, त्यातले १-२ कप्पे मिळायचे. त्यात ५-६ नेहेमीचे कपडे,२-४ ठेवणीतले. त्यात नऊ रंगाचे कपडे मिळणं केवळ अशक्य. नवरात्रीतला भोंडला, सोसायटी/गल्लीतला रोजच्या कपड्यातला गरबा, अष्टमीला देवीचे दर्शन ह्या कशालाच पैसे लागत नसतं पण आनंद, भक्तीभाव, उत्साह हमखास असे.


पूर्वीच्या काळी ताब्यात असलेल्या गडकोटावरून एखाद्या राज्याची, राजाची श्रीमंती ठरत असे. जितके जास्त किल्ले, दुर्ग वर्चस्वाखाली तितका तो राजा प्रभावी समजला जायचा. एखादा किल्ला ताब्यात असला की, आजुबाजूच्या मोठ्या परिसरावर सहज नियंत्रण ठेवता यायचे. सैन्य, त्यांच्यासाठी लागणारी रसद आणि अर्थातच सुरक्षितता आदी कारणांमुळे गडदुर्गांना खूप महत्त्व असायचे. काळ बदलला. गडदुर्ग केवळ पर्यटनापुरते उरले. अर्थात गडदुर्गाचे महत्त्व संपुष्टात आले असे नाही, ते आजही कायम आहे. फक्त त्यांचे स्वरूप बदलले एवढेच. केवळ स्वरूपच नव्हे तर उपयोगितादेखील बदलली.


प्रकाशन दिनांक :- 30/11/2003
एखाद्या गोष्टीचे यथार्थ, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे असेल तर केवळ त्या गोष्टीच्या बाह्यरंग, रूप, आकारावरून कधीच करता यायचे नाही. तसा प्रयत्न केला तर हाती येणारा निष्कर्ष हमखास चुकू शकतो. एखादे साधे बीज असेल तर ते सकस आहे, चांगल्या प्रतीचे आहे, त्याचा वाण उत्तम आहे, हे केवळ ते बी हातात घेऊन सांगता येणार नाही.

जॉर्ज बर्नार्ड शॉ ह्यांचं हे वाक्य आठवण्याचं कारण म्हणजे भारतात होणारे बलात्कार. कोलकात्यात जो बलात्कार झाला त्यातील आरोपीने कबूल केले आहे की बलात्कार करण्याआधी त्याने पॉर्न क्लिप पाहिली होती. अशा क्लिप अगदी शाळकरी वयातील मुलेही फक्त एक क्लिक करून पाहू शकतात. सिनेमांना जसं सेन्सॉर बोर्ड असतं तसं पॉर्नला नसतं. अशा फिल्म्सवर भारत सरकारचं नियंत्रण नाही. कारण ह्यातील बहुतांश क्लिप विदेशात तयार होतात आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जातात. ह्या फिल्म प्रौढ व्यक्तींपुरत्या मर्यादित नाही. त्या कोणीही पाहू शकते. अशा फिल्म पाहिल्याने शरीरात बदल होतात आणि तात्काळ लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होते. थोडक्यात, अशा क्लिप्स म्हणजे बलात्काऱ्यांची शाळा आहे.
लैंगिक शिक्षणाचा अभाव:

कृष्ण चरित्रामधील एक प्रसंग आहे. इंद्र गोकुळावर कोपला. गोकुळावर त्याने विजांचा कडकडाट केला आणि मुसळधार पाऊस पाडून सगळ्या गावकऱ्यांना संकटात आणलं. घरे, शेती, गाई-गुरे बुडू लागली. गावकरी हतबल झाले. सगळे कृष्णाकडे गेले. कृष्ण अशावेळी घाबरायला हवा होता. पण कृष्णच तो…तो तर बासरी वाजवत बसला होता. त्याच्या आसपास गावकरी जमा झाले तेव्हा कृष्णाने बासरी खाली केली आणि ते काही बोलण्याआधीच कोसळणाऱ्या मुसळधार पावसावर मी उपाय सांगतो असे आश्वासन दिले. मी युक्ती करतो असा धीर दिला.

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.
आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.


प्रकाशन दिनांक :- 12/10/2003
'तर्कदुष्ट विनोद' या वाकप्रचाराची नेमकी व्याख्या कदाचित करता येणार नाही, परंतु तर्कदुष्ट विनोद ही संकल्पना स्पष्ट करणारी असंख्य उदाहरणे देता येतील. सर्वात मोठे उदाहरण तर इथल्या लोकशाही व्यवस्थेनेच उपलब्ध करून दिले आहे. साधा चपराशी कुणाला व्हायचे असेल तर त्याच्याजवळ सातवी किंवा दहावी उत्तीर्णची शैक्षणिक पात्रता असावी लागते; परंतु आमदार, खासदार, मंत्री एवढेच नव्हे तर अगदी पंतप्रधान होण्यासाठी ही कुठल्याही शैक्षणिक पात्रतेची गरज नाही.


भारतीय पुराणातील भस्मासुराची आणि युरोपियन लोकसाहित्यातील मिडास राजाची कथा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. भस्मासुराची प्रवृत्ती आणि आताच्या अतिरेक्यांची प्रवृत्ती यामधील साम्य लक्षात घेतल्यास भस्मासुराला आद्य क्रांतिकारकाच्या धर्तीवर आद्य अतिरेकी म्हणून संबोधण्यास हरकत नाही. तर अशा या भस्मासुराने भगवान शंकराला वर मागितला होता की, तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू भस्मसात होऊन जाईल. भोळा सांब म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकराने परिणामांचा विचार न करता तथास्तू म्हणून टाकलं. आता आपलं कोण काय वाकडे करु शकतो, या विचाराने उन्मत झालेल्या भस्मासुराने सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. आणि शेवटी तो साक्षात भगवान शंकराच्याही मागे लागला.
दैनिक देशोन्नती मध्ये पूर्वप्रकाशित हा लेख ४ ऑगस्ट २००२ रोजी मराठीसृष्टीवर अपलोड करण्यात आला.


प्रकाशन दिनांक :- 21/09/2003
राघोबा दादांनी नारायणराव पेशव्यास 'धरावे' असा लिखित आदेश गारद्यांना दिला. तो आदेश गारद्यांच्या हाती पडण्यापूर्वी आनंदीबाईनी 'ध' चा 'मा' केला आणि शनिवारवाड्याच्या भिंतींनी अनुभवला क्रौर्याचा भीषण थरार! नारायणरावांच्या प्राणांतिक किंकाळ्यांनी अवघी पेशवाई हादरली.
Copyright © 2025 | Marathisrushti