वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रंग चिकित्सा’ किंवा ‘रंगोपचार’ हा उपचार इतका आश्वासक आहे की संबंधिताला अनुभव हा येतोच येतो. रंगज्ञान हे प्रत्येक जीवात्म्याला असतेच. रंगज्ञानाची प्रक्रिया पाहिली तर आपल्या डोळ्यांच्या रचनेत, रेटिनाच्या आतल्या बाजूस असंख्य कोन्स आणि रॉडस असतात. दंडगोल आणि शंकूच्या आकारामधील या घटकांना विशिष्ट रंगाचे ज्ञान असते. उदाहरणार्थ लाल रंग हा ठराविक कोन्स वा रॉडस ना असतो. प्रत्येक रंग दिसणे या क्रियेसाठी ते ते स्वतंत्र कोन वा रॉडस असतात.

मी डबिंग स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होतो. सकाळचे सात वाजले होते आणि अंधेरीमधील एका स्टुडिओ बाहेर मी उभा होतो. स्टुडिओला बाहेरून कुलूप होते आणि तेवढ्यात स्टुडिओ बाहेर गर्दी जमा व्हायला लागली. कारण माझ्या बाजूला दस्तुरखुद्द अमिताभही स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होते.
अमिताभ नेहमीच सकाळी सात किंवा आठ वाजता डबिंग करतात. त्यांचा हा नियम गेले अनेक वर्षे ते पाळत आहेत. आजही ते सकाळी वेळेवर आले, पण स्टुडिओ बंद होता. सकाळची वेळ असल्यामुळे सोबत बॉडी गार्ड नव्हते. फक्त त्यांचा ड्रायव्हर थोड्या अंतरावर उभा होता आणि आम्ही दोघे स्टुडिओच्या कुलूपाकडे पाहण्यापेक्षा वेगळं काही करू शकत नव्हतो.

डॉ. डॅनिएल मॅन्सफिल्ड यांचं हे सर्व संशोधन, भूमिती-त्रिकोणमिती या गणिती शाखांचा उपयोग ग्रीकांच्या कित्येक शतकं अगोदर बॅबिलोनिआत केला जात असल्याचं स्पष्ट करतं. पाटीवरची ही आकृती, उपयोजित गणिताकडून शुद्ध गणिताकडे होणारी वाटचाल दाखवते.

पृथ्वीचा पृष्ठभाग सतत बदलत असतो. अस्तित्वात असलेले खंड नाहीसे होत असतात, तसंच नवे खंड निर्माण होत असतात. प्राचीन काळी असाच एक गोंडवना नावाचा महाखंंड अस्तित्वात होता. या महाखंडात आजचे, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिआ हे भूप्रदेश सामावले होते.
वाघ हा हिंस्र प्राणी जंगलातच राहतो. काही देवदेवतांचं वाघ हे वाहन आहे. वाघ फार पूर्वीपासून माणसाळवलेला प्राणी आहे याचा हा पुरावा आहे. सर्कशीतल्या वाघांकडून अनेक विस्मयकारक कामं करून घेतली जातात, याचा आपण अनुभव घेतलेला आहेच. जंगलात भरकटलेलं वाघाचं पिल्लू पाळलं तर त्याचं हिंस्रपण कमी होतं.

मराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळं बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे संस्थानात हजारो मराठी कुटुंबं स्थयिक झाली आहेत. घरात त्याचं मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला 14 जानेवारी 2010 रोजी 250 वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला दारूण अपयश आलं तर त्या घटनेचं पानिपत झालं असा वाक्प्रचारही रूढ झाला आहे.

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला.
‘नोव्हेंबर’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘क्रीडाशौकीन, निरोगी, विश्वासू, देखण्या व शिस्तप्रिय’ मानल्या जातात. चालू ‘नोव्हेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र राज्यातील विशाखापटटम ( वैझ्याग ) हे पुरातन काळापासूनचे महत्वाचे बंदर. ब्रिटीश राज्यकर्त्यानी मोठी गोदी बांधून समुद्र व्यापार मार्गाचे महत्वाचे ठिकाण तयार केले. आज भारतीय नौदलात त्याचे अनन्य साधारण महत्व असून सबमरीन्सचा महत्वाचा बेस येथे आहे. विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीच वरील सबमरीन म्युझियम पाहून डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक भारतीय नागरीकाने त्याला भेट देऊन मानाचा मुजरा दिलाच पाहिजे अशी ही विशेष जागा आहे. आशिया खंडातील अशा तऱ्हेचे हे एकमेव म्युझियम आहे.

समाजात, आडनावामुळे तो विशिष्ट कुटुंबगट ओळखला जातो. आडनावामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीच्या आनुवंशिक स्वभाववैशिष्ठ्यांची आणि गुणावगुणांचीही ओळख पटते. विवाह जुळवितांना या माहितीचा फार अुपयोग होतो.
Copyright © 2025 | Marathisrushti