(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • स्पेशल एक्स-रे (बेरियम स्वॅलो / एनेमा)

    अन्न, अथवा पाणी गिळताना अडचण येत असल्यास, अन्न वर येत असल्यास, सारखी उचकी लागत असल्यास किंवा आवाजामध्ये झालेला एकदम बदल म्हणजे बेरियम स्वॅलो करण्यास आमंत्रण.

  • हरितकी/हरडा

    हा २०-३०मीटर उंच वृक्ष आहे.ह्याची त्वचा गडद तपकिरी रंगाची व खडबडीत असून हिरड्याचे लाकूड अत्यंत कठिण व घट्ट असते.ह्याची पाने ७-२० सेंमी लांब व ५-१० सेंमी रूंद व टोकदार असून पत्र शिरांच्या ६-८जोड्या असतात.फुले २.५-५ सेंमी लांब असून फळ २.५-५ सेंमी लांब व अण्डाकार असते आत कठिण मगज असतो व पृष्ठभागावर पाच पन्हाळी सारख्या उभ्या रेषा असतात.फळ कच्चे असता हिरवे व पिकल्यावर धुरकट पिवळे असते.प्रत्येक फळात एक कठिण बी असते.

    हरितकीचे उपयुक्तांग आहे फळ.ह्याची चव लवण अर्थात खारट सोडुन पाच हि चवी असलेली असते व प्रमुख चव तुरट असते.हरडा उष्ण गुणाचा असतो व हल्का,कोरडा असून त्रिदोषनाशक असतो.

    चला आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग पाहुयात:

    १)जखम झाली असता ती हरड्याच्या काढ्याने धुवून साफ करतात.

    २)बाळ हरडे चावून खाल्ल्याने भुक वाढते.

    ३)कफज अर्शामध्ये हरितकी हि गुळ व ताका सोबत देतात.

    ४)हरड्याचे चुर्ण मनुका व खडीसाखर सह देतात ह्याने अम्लपित्तामध्ये फायदा होतो.

    ५)हरडा दुषित कफ व मेद यांचा नाश करून बुद्धि व इंद्रियांचा जडपणा घालवून मेध्य कार्य करतो.

    ६)हरडा डोळ्यांच्या आरोग्यास देखील हितकर आहे.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • हाडे, सांधे व पाठीचे एक्स – रे

    हाडांच्या डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला तर्‍हेतर्‍हेचे एक्स-रे काढायला सांगितले जाते. यामध्ये फ्रॅक्चर असल्यास त्या-त्या भागांचे एक्स-रे येतात. परंतु पडल्यावर रुग्ण परस्पर चांगल्या एक्स-रे क्लिनिकमध्ये त्वरित जाऊनही हे एक्स-रे काढू शकतो. डॉक्टरांच्या चिठ्ठीसाठी अडून न राहता क्ष-किरण तज्ञाला दाखवून योग्य एक्स-रे होऊ शकतात. परंतु दुसरी दुखणी उदा.- सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासाठी शक्यतो हाडांच्या डॉक्टरकडून आधी तपासून घ्यावे व मगच एक्स-रे काढावे.

  • हार्ट अटॅक रिस्क डिटेक्टर

    आपल्याला डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा आपण स्थूल असाल, सतत तणावाखाली असाल तर फक्त ५ मिनिटात कोणतीही नळी आपल्या रक्तवाहिनीत न घालता किंवा स्ट्रेस टेस्ट न करता फक्त झोपून आपणाला हार्टअटॅक येण्याची काय रिस्क आहे हे सांगणे फक्त ५००-६०० रुपयांत शक्य झाले आहे. या मशिनला कोलिन व्हि.पी. (प्रोफायलर) म्हणतात. यामध्ये आपली कॉम्प्युटराइज्ड नाडी परिक्षा होते ।

  • मॅमोग्राफी

    मॅमोग्राफीमध्ये दोन्ही स्तनांचा दोन अॅंगल्समध्ये फोटो घेतला जातो. हा अतिशय स्पष्ट व अतिसूक्ष्म एक्स-रेच असतो व या मशिनची ट्यूब स्पेशल असल्याने क्ष-किरणांची मारक शक्ती कमीत कमी केलेली असते. त्यामुळे दरवर्षी मॅमोग्राफी केली तरीही काहीही धोका नाही.

  • आधुनिक एक्स-रे आणि प्रतिमाशास्त्र

    काही वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या “मेडिकल इमेजिंग” या मराठी पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाला. या विषयावरील ते पहिलेच मराठी पुस्तक होते. मात्र छापील पुस्तकाच्या मर्यादांपासुन दुर होउन जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा यासाठी या पुस्तकाला लेखमालेच्या स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी इंटरनेटचा मोठा उपयोग होईल हे पटल्यामुळे ही लेखमाला सुरु करत आहे. “मराठीसृष्टी”सारख्या लोकप्रिय पोर्टलवरुन या लेखमालेतील लेख इंटरनेटशी जोडलेल्या हजारो मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यास उपयोग होणार आहे.