कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत.
February 27, 2024
२९ डिसेंबर १९६५ मध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळम कवी गोविंद शंकर कुरूप यांच्या ओडोक्वुघल (बासरी) या काव्यकृतीला मिळाला. भारताचा कोणताही नागरिक भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. १९७४ साली वि. स. खांडेकर, १९८७ साली वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि २००३ साली विंदा करंदीकर व २०१४ साली ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे या मराठी लेखकांचा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
May 22, 2022
बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृती प्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
February 29, 2024
ऑगस्ट महिन्यातला पहिला बुधवार. ह्या दिवशी कॅनडामध्ये एक आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा दिवस साजरा केला जातो. त्या दिवसाचं नाव आहे “National Regatta Day” म्हणजेच राष्ट्रीय नौकाशर्यत दिन.
August 5, 2020
बॉनसाय हा कुणासाठी केवळ एक छंद होऊ शकतो तर कुणासाठी स्वतंत्र व्यवसायही होऊ शकतो याचा प्रसार चीनमधून जपान व नंतर जगभरात झाला.
October 19, 2015
गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
February 13, 2024
२१ डिसेंबर १९६५ रोजी दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला. वसंत सबनीस यांचे 'विच्छा माझी पुरी करा' हे नाटक म्हणजे सबनीसांच्याच छपरी पलंगाचा वगाचीच रंगावृत्ती आहे. याचे संगीतकार होते तुकाराम शिंदे. ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकाने दादा कोंडके यांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. दादा कोंडके यांनी या लोकनाट्याचा कुठंही प्रयोग लावला तरी तो हाऊसफुल व्हायचा. त्या काळात दादा कोंडके यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या नाट्यनिर्मात्यांच्या नाटकांचा तिकीटांचा दर थोडा चढा असायचा. मात्र दादांनी आपल्या या लोकनाट्यासाठी अगदी ‘जनता दर’ लावला होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक प्रयोग लगेचच हाऊसफुल व्हायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांच्या लोकनाट्याची ‘प्रॉडक्शन कॉस्ट’ खूप कमी होती. रंगमंचाच्या पाठच्या बाजूला एक पडदा असलं की दादांचं काम होऊन जायचं.
गायिका आशा भोसले यांनी एकदा ‘विच्छा…’चा प्रयोग पाहिला. फक्त एक माणूस प्रेक्षकांना तब्बल साडे चार तास हसवतो, नुसतंच हसवत नाही तर प्रेक्षक खुर्चीवरून खाली पडायचाच तो काय बाकी असतो. अशाप्रकारचं दृश्य आशाताईंनी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं. हा अनुभव आशाताईंनी प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या कानावर घातला आणि त्यांनाही हे लोकनाट्य पाहण्याचा आग्रह केला. त्यानुसार काही दिवसांनी आशाताई भालजींसह पुन्हा हे नाटक पाहायला आल्या. ते एवढं रंगलं की आशाताईंनी खूश होऊन दादांच्या युनिटमधील सगळ्यांच्या हातामध्ये सोन्याचं ब्रेसलेट घातलं. त्या नंतर गायिका आशा भोसले यांनी त्या काळी ‘विच्छा माझी पुरी करा' ’चा मुंबईतला एकही प्रयोग पाहायचा सोडला नव्हता. याच सुमारास भालजी ‘तांबडी माती’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. दादा किती कमालीचे कलाकार आहेत, हे एव्हाना भालजींना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी या चित्रपटामधील एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी दादांची निवड केली. दादांनी याच चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
दादा कोंडके, राम नगरकर यांनी हे नाटक गाजवले होते. राजकीय परिस्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करत, हळूच चिमटे काढत प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे 'विच्छा माझी पुरी करा' हे सदाबहार वगनाट्य सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यांच्यानंतर अभिनेते विजय कदम गेली काही वर्षे सातत्याने 'विच्छा माझी पुरी करा'चे प्रयोग करत होते. 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्यातील महत्त्वाचे नाटक आहे.
आजपर्यंत अनेकांनी या नाटकाचे प्रयोग केले गेले. या वगनाट्याची कथा, त्यातील राजकीय भाष्य आज ही ताजे वाटते. एकेकाळी तमाशा,वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु "विच्छा माझी पुरी करा" या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या "विच्छा माझी पुरी करा"या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाच सर्वात मोठं बलस्थान आहे. एक दोन नव्हे, तब्बल ५२ वर्षे या वगनाट्याने मराठी प्रेक्षकांना झपाटून टाकलं.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 21, 2017
आपला नेहमीचा ओळखीचा म्हणजे ज्यात पाहून आपण भांग पाडतो किंवा वेणी घालतो तो आरसा म्हणजे साधा सपाट आरसा. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि सपाट असतो.
June 24, 2011
८ जून १९४८ रोजी एअर इंडियाने भारत इंग्लंड हवाई सेवा सुरू केली. एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने मुंबई-लंडन द्वारा कैरो व जिनीव्हा अशा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. त्यावेळी एअर इंडिया जवळ कॉन्स्टेलेशन ७४९ ह्या जातीची तीन विमाने होती.
June 8, 2021
१९९९ आणि २०१४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले तेव्हा काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले. २००४ आणि २००९ मध्ये आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले. राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले. काँग्रेसची जागा घेण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत साकार झाले.
June 10, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti