७ डिसेंबर १९४४ रोजी शिकागोमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी हवाई परिषद झाली होती. त्यानंतर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवशी आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवस साजरा करण्याची घोषणा केली. हवाई सेवांमध्ये सुधारणा, संरक्षण, मार्गांची निश्चिती, परिवहन आदी व्यवस्थेत आणखी सुधारणा करणे, हा या दिवसाचा उद्देश होता. त्यामुळे जगभरातील विमानतळांवरील कर्मचारी, व्यवस्थापन आणि हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) साठीदेखील हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी आणखी एक महत्त्वाची घटना घडली होती. क्वांटस एअरलाइन्सच्या विमानातील वैमानिक आणि क्रू सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ४४९ प्रवाशांचे प्राण वाचवले होते.
आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवसाच्या निमित्ताने जगातील सर्वात उंच चार एटीसी टॉवर्स आशियात (थायलंड, मलेशिया, जपान, चीन) असून तीन अमेरिकेत आहेत.
रॉयल डच ही सर्वात पहिली एअरलाइन असून १९१९ मध्ये तिची सुरुवात झाली होती. १७ मे १९२० रोजी या एअरलाइनच्या पहिल्या विमानाने अॅम्स्टर्डमहून लंडनच्या दिशेने प्रयाण केले होते. त्यानंतर क्वांटस (१९२०) एअरलाइन सुरू झाली.
बोइंग ७४७-४०० एसच्या कॉकपिट विंडो फ्रेमचा खर्च एका लक्झरी कारच्या खर्चाएवढा आहे. त्याची वायरिंग २८० किमी लांबीची असते.
अलास्का एअरलाइनने सर्वप्रथम १९९९ मध्ये ऑनलाइन चेक इन सेवा सुरू केली.
विमानाचा वैमानिक आणि सहवैमानिकाला वेगवेगळे भोजन दिले जाते. विषबाधा झाल्यास यापैकी एक जण तरी विमान सांभाळू शकेल, हे यामागील कारण.
चीनमधील काम्दो-बांग्दा येथील धावपट्टी जगात सर्वात लांब (५.५ किमी) असून ती तिबेट क्षेत्रात येते. त्यानंतर रशिया व फ्रान्सचा क्रमांक लागतो.
- १ जानेवारी १९१४ रोजी अमेरिकेत पहिल्या व्यावसायिक प्रवासी विमानाचे उड्डाण फ्लोरिडा बेपासून टेंपा येथील सेंट पीटर्सबर्गकडे झाले होते.
२०१५ मध्ये जगातील सहाव्या सर्वात व्यग्र विमानतळाचा मान लंडनमधील हिथ्रो विमानतळाला मिळाला. त्यापूर्वी टोकियो, शिकागो, दुबई, बीजिंग आणि अटलांटाचा क्रमांक लागला.
लंडनहून पॅरिसकडे जाणाऱ्या विमानात १९१९ मध्ये सर्वप्रथम नाष्ट्यासाठी रोख घेतली गेली.
एअर पोर्ट हा शब्द पूर्वी १७८० मध्ये जहाज व्हेंटिलेशनसाठी तयार केलेल्या जागेसाठी किंवा छिद्रासाठी वापरला जात असे. १९०२ मध्ये हा शब्द सर्वप्रथम विमानांसंदर्भात वापरला गेला.
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
December 7, 2021
संधिवात म्हणजे काय. तर हा एक प्रकारचा आजार आहे जो लहान पाच वर्षे वयाच्या वयापासून ते ६०-७०वयातील कोणत्याही माणसाला होऊ शकतो. जसे मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार आहेत तसा संधिवात हा एक प्रकारचा आजार आहे.
October 12, 2021
फाऊंड्रीमध्ये धातुंचे ओतकाम करताना ज्याप्रमाणे प्रथम पॅटर्न तयार करुन नंतर साचा करतात व त्यातून हजारो नग बनवतात. त्याप्रमाणे जे छापायचे त्याच्या प्रतिमेसाठी माध्यम तयार करुन त्याला छपाई यंत्रावर लावून हजारो प्रती छापता येतात.इतिहासजमा झालेल्या रिलीफ छपाई पद्धतीतील लेटर प्रेसवर चित्रे आणि छायाचित्रांसाठी ब्लॉक्स आणि मजकूरासाठी खिळे वापरत.
May 23, 2023
जगभरातील भारतातील पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताला नैसर्गिक सौंदर्याची भूमी म्हटले जाते.
January 25, 2022
मुंबई महानगरपालिकेने ओला कचरा आणि कोरडा कचरा अशा दोन भागात रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे असा फतवा काही वर्षापूर्वीच काढला आणि जे कोणी असे करणार नाहीत त्यांना दंड करु असेही तेव्हा म्हटले होते. पण लोक आपण काढलेल्या फतव्याचे पालन करतात की नाही यावर देखरेखीची काही सोय केली नाही.
May 31, 2023
पुण्याजवळील मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत हे धरण फुटल्यामुळे पुण्यात आलेल्या पुरात सुमारे १,००,००० लोक विस्थापित झाले. नदीकाठचे तीन मजली वाडे पूर्णपणे बुडाले होते. आजही अशा इमारती पूररेषेच्या आठवणी सांभाळून आहेत. भांबावलेल्या अनेकांनी गणरायाचे पूजन करून पुन्हा प्रपंच उभारले.
July 12, 2021
इंग्लंडमध्ये १९९० साली ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्याने यजमानांबरोबरच्या कसोटी सामन्यात पहिले शतक झळकावले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक फटकावण्याचा मानही सचिनच्याच नावावर आहे. १९९९ साली सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव करत त्याला भेटीसाठी बोलावले होते.
November 15, 2021
एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत.
December 3, 2021
साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो.
December 27, 2018
वस्तू आणि सेवा कराची ‘ऐतिहासिक’ अंमलबजावणी सुरू झाली, त्यानिमित्त मध्यरात्री संसदेचे अधिवेशन बोलावले गेले आणि १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताचा जो ‘नियतीशी करार’ झाला त्याप्रमाणे समारंभ करून २०१७ सालच्या १ जुलैला वस्तू आणि सेवा कर – गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स- ही नवीन कर प्रणाली आणली गेली.
July 1, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti