Articles by प्रकाश पोहरे
नव्या कुरणांची निर्मिती


Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसाखर. मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. मधूमेहाचे रोगी सोडले तर उर्वरीत मनुष्यजातीतील एकाचाही एकही दिवस बिनासाखरेचा जात असेल, असे वाटत नाही. मानवाचे संपूर्ण जीवन व्यापणार्या या साखरेला महाराष्ट्रात तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील सर्वाधिक पुढारलेले राज्य म्हणून मिरविणार्या या राज्याचे राजकारण साखरेभोवती फिरत असते, असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. राज्याच्या पश्चिम भागाने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर प्रचंड विकास साधून घेतला आहे आणि देशातील एक संपन्न भाग म्हणून नावारूपाला आला आहे. पश्चिम महाराष्ट्राने सहकारी साखर कारखानदारीच्या बळावर घेतलेली प्रगतीची झेप बघून मराठवाडा व विदर्भ या तुलनेत अविकसित भागातही, सहकारी साखर कारखाने उभे राहिलेत.
वृद्धाश्रमाऐवजी ज्ञानमंदिरे उभारा!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसमाजजीवनात किंवा वैयक्तिक पातळीवरसुध्दा या नियमाचा प्रत्यय आपण घेतच असतो. आता हेच बघा, भौतिक क्षेत्रात म्हणजेच विज्ञानात मानवाने प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत. गेल्या शे-दीडशे वर्षात आपण विज्ञानात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतल्यास शे-दीडशे वर्षापूर्वीचे जग आणि आताचे जग यामध्ये तुलनाच होऊ शकत नाही. परंतु त्याचवेळी हा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, विकासाचे घोडे वैज्ञानिक प्रगतीच्या दिशेने चौखूर उधळत असताना विरोध विकास बलाने नेमके कोणत्या दिशेने कार्य केले असावे? या प्रश्नाचे उत्तर फारसे कठीण नाही.
नवी अस्पृश्यता
Category:
आरोग्य लेखसंग्रह वैचारिक लेखनसांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.