ओरिसातील चीलिका लेक
Category:
लेखसंग्रहओडिसा वा ओरिसा राज्यातील ११०० स्क्वे. किमी परिसर असलेले अती भव्य सरोवर चीलिका वा चिल्का हे पूर्व किनाऱ्यावरील तीन जिल्ह्यात पसरलेले असून जगातील स्थलांतरित पक्षांचे दोन नंबरचे स्थान.थंडीच्या मोसमात १६० विविध तर्हेचे हजारो पक्षांचे थवेचे थवे चीलिकात उतरतात.कॅप्सीकन सी,बेकल लेक,उरल सी,(रशिया),मंगोलिया,लडाख,उत्तर हिमालय, अशा हजारो मैल दूर अंतरावरील हे पाहुणे,लेकमध्ये तीन महिने मुक्काम करतात.