No Picture
साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल – २

Category:

 

त्यादिवशी माझंही तसंच झालं. समोरचं एसटीचं धूड बघितल्यावर बावचळून मी बाईक साईडला घेतली . एसटीवाला निर्धास्तपणे गेला आणि मी साईडपट्ट्यांजवळ असलेल्या खडीच्या ढिगाऱ्यावर कोसळलो . गाडी माझ्या अंगावर पडली होती आणि मला ती बाजूला करता येत नव्हती . पण माझ्या सुदैवाने , शेजारच्या झाडाजवळ जेवायला बसलेला एक तरुण धावत आला आणि त्यानं गाडी बाजूला केली. मला उठवलं आणि शेजारच्या त्या झाडाच्या सावलीत नेलं.

No Picture
साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल – १

Category:

 

त्यानं डोक्यावरची टोपी काढली . जमिनीवर आपटली . त्या टोपीवर तो थयथया नाचला . टोपीवर जोरात थुंकला आणि पायानं ती टोपी उडवली . टोपी नेमकी कंपाउंड जवळच्या कचराकुंडीत जाऊन पडली . मग त्यानं घाम पुसला . हात स्वच्छ पुसले आणि वरच्या खिशात ठेवलेली पानं हळुवारपणे माझ्या हाती दिली … मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं . आणि धक्काच बसला .

No Picture
साहित्य - ललित

द अदर साईड ऑफ सोल !

Category:

 

अशी न लिहिली गेलेली आत्मचरित्रं , खूपच वेगळी असतात . अनवट वाटेनं जाणारी असतात . प्रचंड धक्कादायक असतात . खूप गुपितं लपवून ठेवणारी असतात . समाजात गदारोळ करणारी असतात . अनेकांचे बुरखे टराटरा फाडणारी असतात . नातेसंबंध ओरबाडून टाकणारी असतात . अशी आत्मचरित्रं सप्तरंगी नसतातच तर कृष्णधवल रंग त्यात मजबूत असतो . आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ,अशा आत्मचरित्रांचे नायक हे सर्वसामान्य असतात . त्यामुळे त्यांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातील त्यांचा आत्मा हा केव्हाच उडून गेलेला असतो . अशा न लिहिलेल्या आत्मचरित्रातील काही पाने माझ्या हाती लागली .

No Picture
लेखसंग्रह

वलयांकितांच्या सहवासात – संगीत सम्राज्ञी बेगम परवीन सुलताना

Category:

 

त्यांच्या गाण्यातील नितळ पारदर्शकता त्यांच्या स्वभावातही आहे. लोकांना विश्वास देण्याचं, त्यांच्याशी स्नेहबंध निर्माण करण्याचं त्यांचं कसब अलौकिक आहे. खरा स्नेह हा माझ्या रविकाकाचा आणि परवीनजींचा व दिलशाद खांसाहेबांचा. त्या बळावर माझी व दीदींची भेट झाली. काही भेटींतच त्या माझ्यावर मुलासारखं प्रेम करू लागल्या. पाडवा असो, गणपती असो, दसरा किंवा दिवाळी असो वा नववर्ष दिवस असो, मी एक वेळ आळशीपणा करेन, पण सकाळी बरोबर आठ वाजता मोबाईलवर दीदींचा शुभेच्छा संदेश असतो.

No Picture
लेखसंग्रह

वलयांकितांच्या सहवासात – पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन

Category:

 

‘ऋतुरंग’च्या अरुण शेवते यांनी मला सांगितलं की २००३ च्या दिवाळी अंकासाठी तुम्ही उस्तादजींच्या जडणघडणीविषयी त्यांची मुलाखत घ्या व तिचं शब्दांकन करता येईल का ते बघा. माझं ते पहिलं शब्दांकन असणार होतं. मी रवीकाकाला सांगितलं, निर्मला बाछानी म्हणून झाकीरकाकाच्या सचिव आहेत, त्यांना सांगितलं आणि झाकीरकाका मुलाखतीला तयार झाला. शब्दांकनकार होण्यासाठी मला पहिला आशीर्वाद मिळाला तो उस्ताद झाकीर हुसेन यांचा.

No Picture
साहित्य - ललित

आणि पारिजातक हसला !

Category:

 

त्याचं स्मितहास्य तुम्हालाही जाणवेल. पण त्या वेड्या पारिजातकाला हे माहीत नाही की , लॉक डाऊन मुळे त्याचं हे रूप त्याला पुन्हा प्राप्त झालंय. लॉक डाऊन संपल्यावर … बाप रे ! नकोच तो विचार …

No Picture
साहित्य - ललित

आजी तुझी आठवण येते…

Category:

 

एके दिवशी दुपारचा चहा झाल्यावर आजींनं सगळ्यांना एकत्र बोलावलं .बेडखालची बॅग बाहेर काढली आणि उघडली . म्हणाली , ” तुम्हाला वेळ कसा घालवायचा हाच मोठा प्रश्न आहे ना , मग मी आता या बॅगेतला सगळा भूतकाळ तुमच्यासमोर ठेवते . वेळ कसा जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही . ” आणि मग इतके दिवस दडवून ठेवलेला मौल्यवान खजिना बाहेर काढावा , त्याला अलगद हाताळावा , तसं आजी एकेक वस्तू बाहेर काढू लागली .

No Picture
कथा

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १४

Category:

 

पण ही कथा फक्त निशा आणि रोहनची नाहीये…. असे आपल्या परिचयातले अनेक निशा आणि रोहन अचानक गेलेले असतात. पण व्यक्तीशः आपण…..आपण….असं कुणाच्याच बाबतीत परत होवू नये म्हणून काय करतो? या कथेच्या निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत….

No Picture
कथा

वृक्षारोपण

Category:

 

… एवढच नाहितर आॅक्सिजनचा मास्क ही सहज उपलब्ध होत होता पैशाने. आणि जर तुम्हाला जगायच असेल तर इतर वस्तूंच माहित नाही पण हा आॅक्सिजनचा मास्क विकत घ्यावाच लागायचा.

No Picture
साहित्य - ललित

संगीत राधामानस च्या निमित्ताने…

Category:

 

कलाकृतीचे भाग्य हेच म्हणायला हवे की एकाच लेखकाचे एक नाटक एकाच स्पर्धेत दोन वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या तारखांना सादर करणार आहेत . प्रत्येक संस्थेचे नेपथ्य वेगळे , संगीत वेगळे , दिग्दर्शन वेगळे असणार आहे . तीच ती पारंपरिक संगीत नाटके , तेच ते कथानक , तेच ते संगीत या पेक्षा वेगळी वाट शोधणाऱ्यांसाठी हा एक दिशादर्शक प्रवास आहे .