No Picture
साहित्य - ललित

हितसंबंध आणि कर्तव्य

Category:

 

वर्षापूर्वीची गोष्ट. आर्थिक व्यवहारात फसल्याने माझ्या एका मित्राला कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागला. `खरे तर कोर्टाची पायरी नको रे बाबा’ हे सगळ्याच सामान्य माणसांचे सूत्र. तर हे महाशय कोर्टात गेले. न वटलेल्या चेकची ती केस. अर्थातच फौजदारी. प्रतिपक्षही काही कमी नव्हता. त्यांनी माझ्या मित्रावर फसवणुकीचीच फिर्याद ठोकली. `एक तर कोर्टाची पायरी चढू नये; अन्यथा सर्व काय ते सहन करावे.’ हे सांगण्यासाठी सोपे आहे; पण प्रत्यक्षात अशा प्रसंगाने काय होते, याचा अनुभव मी या माझ्या मित्राबरोबर घेतला.

No Picture
साहित्य - ललित

द्राक्षे आणि आंबे!

Category:

 

गेल्या आठवड्यातली गोष्ट. मी एका नातलगाकडे गेलो होतो. खूप दिवसांनी ही भेट होत होती. त्यामुळे गप्पांचे-चर्चेचे विषयही खूप होते. स्वाभाविकपणे वेळही खूप गेला. आता समारोपाचे, निरोपाचे बोलणे करावे म्हणून मी `निघतो आता’ अशी प्रस्तावना केली अन् तिथेच नव्या विषयाला प्रारंभ झाला. त्या घरात दोघे नवरा-बायको अन् त्यांचा 20 वर्षांचा मुलगा- नुकताच नोकरी करू लागलेला. आत्मविश्वास आणि अपेक्षाही वाढलेल्या. त्याला मोटरबाईक घ्यायची होती अन् त्यावर मी मुलाला समजावून सांगावे किंवा समजून घ्यावे, अशी त्या दोघांची इच्छा होती. त्या दोघांची परिस्थिती बेताचीच; पण एकुलत्या एका मुलाचा हट्ट कसा नाकारायचा, हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. हट्ट स्वीकारायचा, तर मोठे आर्थिक ओझे घ्यावे का, हा प्रश्न होता. मोटरबाईक घ्यायला त्यांचा विरोध नव्हता; पण मुलाला नव्या युगाशी सुसंगत सीबीझेड किंवा करिष्मा हवी होती. खरेतर कोणत्याही कनिष्ठ मध्यवर्गीय घरामध्ये येणारा हा प्रश्न होता.

No Picture
साहित्य - ललित

वहिनीचा तयार मसाला

Category:

 

त्या वेळी एसएससीला होतो मी. 1966-67 चा तो कालावधी. अलीकडच्या काळात 10वी 12वी नंतर काय, याची माहिती देणाऱया अनेक संस्था, व्यक्ती आहेत. त्या वेळी ते प्रमाण फारसं नव्हतं. माझ्या घरात तर एसएससी होणारा मीच पहिला ठरणार होतो. पुढे काय, हा प्रश्न इतरांना सतावत असला तरी मला त्याचा त्रास नव्हता. कारण नववी इयत्तेत असल्यापासून काही तरी उद्योग मी करीत आलेलो होतो. त्यामुळं आता काही नवं, भव्य-दिव्य करण्याचं मनात होतं. त्या वेळी मी कोपरगावला राहत होतो. त्याच वर्षी पालिकेनं भाजी मंडईच्या बाजूनं काही गाळे काढले होते. इथं काही तरी करायला हवं.

No Picture
साहित्य - ललित

आमची इडली

Category:

 

सुमती मावशी अन् माझा संपर्क सहवास अवघ्या दहा वर्षांचा; पण त्या दहा वर्षांत मला त्यांनी खूप काही दिलं. खरं म्हणजे माझ्या मनात येईल ते अन् येईल तसं मांडण्याची जागा म्हणजे सुमती मावशी. त्यांना मी मावशी म्हणत असलो, तरी त्या माझ्या मावशी नव्हत्या. व्यवहारिक अर्थानं सांगायचं, तर त्यांचं नि माझं नातं असं काहीच नव्हतं. माझ्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मीनाच्या लग्नात आमची ओळख झाली. त्या मीनाच्या मावशी. त्यावेळी माझं वय असेल तिशीच्या आत आणि त्या होत्या पन्नाशीच्या आसपास. खडकीच्या एका शाळेत हिंदी शिकवायच्या. घरात ती दोघंच. पती आणि त्या. त्यांना मूलबाळ झालंच नाही असं नव्हे; पण टिकलं नाही. व्यक्तिमत्त्व थेट पुणेरी वळणाचं. लग्नसमारंभ आटोपल्यावर `या हं, एकदा आमच्याकडे,’ असं आमंत्रण त्यांनी दिलं.

No Picture
साहित्य - ललित

कृतज्ञता

Category:

 

शब्दांना जेव्हा अर्थाचं सक्रिय पाठबळ लाभतं, त्यावेळी ते शब्दही ख अर्थानं जिवंत होतात. एखादाच नव्हे, तर व्यापक जनसमुदायाच्या जीवनात क्रांती निर्माण करण्याची ताकदही त्यांच्यात निर्माण होते. `कृतज्ञता’ हा असाच एक शब्द. प्राणिमात्रांच्या भावनेशी संबंधित. जेव्हा ही भावना प्रत्यक्षात येते, त्यावेळी या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. अन्यथा, कृतज्ञतेला कृतिशीलतेची जोड नसेल, तर शब्दाचा अर्थच नव्हे, तर शब्दही बदलून जातो. कृतघ्नता हा शब्द डोळ्यांपुढे येऊ लागतो. हे सगळं आज आठवण्याचं कारणही तसंच आहे. कृतज्ञता या शब्दाला सक्रिय अर्थ देण्याचा हा एक प्रयत्न आहे. सन 1971चा डिसेंबरचा तो काळ होता.

No Picture
लेखसंग्रह

कुणा मुखी पडते लोणी…!

Category:

 

भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आपल्या घटनेतच तसे लिहिले आहे. प्रजासत्ताक म्हणजे सत्तेची सूत्र प्रजेच्या हाती असलेले. सोबतच आपल्या घटनेने प्रत्येक नागरिकाला समान वागणूक, समान दर्जा आणि समान अधिकार देण्याचे आश्वासन दिलेले आहे. घटनेच्या या मार्गदर्शक तत्त्वानुसार किंवा घटनेशी बांधीलकी राखूनच देशाचा कारभार चालत असतो, किमान तसे सांगितले तरी जाते.

No Picture
लेखसंग्रह

अनाकलनीय अर्थशास्त्र

Category:

 

परवा एका परिचिताच्या घरी गेलो होतो. घर कसलं एक छोटासा बंगलाच होता तो; एका सुखवस्तू घरात आढळणार्‍या सर्वच वस्तू, जसे रंगीत दूरचित्रवाणी संच, दूरध्वनी, शीतकपाट (फ्रीज), स्वयंचलित दुचाकी सगळं काही त्यांच्याकडे होतं. क्षेमकुशल वगैरे औपचारिक बोलणी झाली. तसं सगळं काही व्यवस्थित दिसत होतं, परंतु ते परिचित गृहस्थ आणि त्यांचे कुटुंबिय फारसे प्रसन्न वाटत नव्हते. मी त्याचे कारण विचारले तेव्हा समजले की ते गृहस्थ कर्जाच्या विळख्यात सापडले असून कर्जाचे हप्ते कसे फेडावे, या चिंतेने सगळं कुटुंबच चिंताठास्त आहे.

No Picture
लेखसंग्रह

आणखी एक इशारा!

Category:

 

नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे. जाचक रुढी-परंपरांच्या माध्यमातून हिंदू धर्म केवळ मुठभरांच्या हातातले बाहुले बनला असून, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांना विकासाचा वावच या मुठभरांनी मिळू दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

— प्रकाश पोहरे

लेखसंग्रह

अति तिथं माती

Category:

 

भारतीय पुराणातील भस्मासुराची आणि युरोपियन लोकसाहित्यातील मिडास राजाची कथा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. भस्मासुराची प्रवृत्ती आणि आताच्या अतिरेक्यांची प्रवृत्ती यामधील साम्य लक्षात घेतल्यास भस्मासुराला आद्य क्रांतिकारकाच्या धर्तीवर आद्य अतिरेकी म्हणून संबोधण्यास हरकत नाही. तर अशा या भस्मासुराने भगवान शंकराला वर मागितला होता की, तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू भस्मसात होऊन जाईल. भोळा सांब म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकराने परिणामांचा विचार न करता तथास्तू म्हणून टाकलं. आता आपलं कोण काय वाकडे करु शकतो, या विचाराने उन्मत झालेल्या भस्मासुराने सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. आणि शेवटी तो साक्षात भगवान शंकराच्याही मागे लागला.

दैनिक देशोन्नती मध्ये पूर्वप्रकाशित हा लेख ४ ऑगस्ट २००२ रोजी मराठीसृष्टीवर अपलोड करण्यात आला.