अध्यात्म की बाजार…

अध्यात्म की बाजार…

गेल्या काही दिवसात अध्यात्म याच्याशी संबंधीत आपल्या देशात जी काही प्रकरणे उगड झाली आहेत त्यामुळे अध्यात्म या विषयावर एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. आजही आपल्या देशात स्वतःला अध्यात्मिक गुरू म्ह्णवून घेणार्‍यां भोंदूंची कमी नाही. सर्वच अध्यात्मिक गुरू भोंदू असतात असं नाही म्ह्णता येणार आणि खर्‍या अध्यात्मिक गुरूंची समाजाला गरज ही आहेच. फक्त गुरू मंत्र देण्याच्या नावाखाली शिक्षांचा गोतावळा तयार करून आपल्या देशात चहाच्या टपर्‍यासारखी जी मठे उभारली गेलेली आहेत तेथे दिल्या गेलेल्या मंत्रात किती ताकद असेल ते त्या देवालाच ठावूक ! याच मठांच्या जागेवर अनेक गुन्हे घडल्याचेही कित्येकदा निदर्शनास येत असते. पुर्वी या बाबा, बुवा आणि भोंदू अध्यात्मिक गुरूंच्या नांदी फक्त अशिक्षीत लोकच लागत असत पण आता स्वतःला उच्च शिक्षीत म्ह्णवून घेणारे ही या बाबा – बुवांच्या पायावर पडलेले दिसतात. गरीब श्रीमंतीच स्वप्न पाहत आणि श्रीमंत मोक्षाच स्वप्न पाहत या बाबा-बुवांच्या नादी लागतो. गुरूला साक्षात त्रीदेवांपेक्षा मोठ मानणारी आपली संस्कृती त्यामुळे ही संस्कृती मानणारे आपलं सर्वस्व ही गुरूच्या चरणी अपर्ण करायला मागे पुढे पाहत नाहीत. प्रसंगी आपल्या अध्यात्मिक गुरूंसाठी आपले प्राणही देण्याची शिक्षांची तयारी असते. मागच्या काही वर्षात आपल्या देशात खर्‍या अध्यात्मिक गुरूंचे दर्शन सर्वसामान्यांना नशिबानेच होते पण त्याउलट भोंदू बाबांची अनेक प्रकरणे एका मागून एक उगडी होत आहेत. सध्याच्या अध्यात्मिक गुरूंकडे असलेल्या संपत्तीचे आकडे पाहिल्यावर देशातीलच नव्हे तर जगभरातील उद्योगपतींनाही घाम आल्यावाचून राहत नसेल. एकीकडे आपला देश मंगळावर जाण्याची तयारी करतोय आणि याच आपल्या देशातील राजकीय मंडळी जर बाबा- बुवांच्या पायावर लोटांगण घालतात अस चित्र भविष्यात दिसल तर ते आपल्या देशाचच दुदैव म्ह्णावं लागेल दुसर काय ?

आपल्या देशातील बहूसंख्य लोक अध्यात्मिक गुरूंच्या मागे लागतात ते मोक्ष प्राप्तीसाठी मुळात मोक्ष ही संकल्पना गृहीत धरावी की नाही याबद्दल ठाम मत व्यक्त करावं की नाही इतकी माहिती उपलब्ध नाही. ढोबळ्मानाने या बाबतीत असेही म्ह्णता येईल की अस्तित्वाच नसलेली गोष्ट मिळविण्यासाठी सार्‍यांचा अट्टहास सुरू आहे. आपल्या देशातील एखाद्या कुटूंबातील कुटूंब प्रमुखाने गुरू केला की तो आपल्या कुटूंबातील सर्वांनाच त्या गुरूच्या चरणी लोटंगण घालायला भाग पाडतो. पुर्वी फक्त ईश्वर हाच आपला एकमेव संरक्षण कर्ता आहे अशी सर्वसाधारणतः लोकांची समजूत होती पण हल्ली सर्व संकटातून, दुःखातून मुक्ती मिळवून मोक्षाच्या मार्गावर मार्गस्थ होणाचा एक मेव मार्ग म्हणजे गुरूमंत्र आणि तो देणारा अध्यात्मिक गुरू असा गैरसमज समाजात जाणिव पूर्वक पसरविला गेला आहे. आपल्या देशातील वाढ॑ती लोकसंख्या ,मुळभूत गरजांचा अभाव, वाढती बेकारी आणि वाढत्या सामाजिक समस्या यामुळे त्रस्त झालेल्या आजारी पडलेल्या प्रत्येकाला एक मानसिक आधार हवा असतो नेमका तो आधार हे अध्यात्मिक गुरू योग्य वेळी देतात आणि लोकांच्या गळ्यातील ताईत होतात. समाजात संस्कृती, संस्कार आणि नैतिकता टिकून राहावी म्ह्णून समाजाला ईश्वर या संकल्पनेची आणि अध्यात्मिक गुरूंची आवश्यकता आहेच पण ती फक्त खर्‍या अध्यात्मिक गुरूंची भोंदूंची नाही. आता या भोंदू बाबा, बुवा आणि अध्यात्मिक गुरूंचे पितळ उगडे पाडण्यासाठी खर्‍या अध्यात्मिक गुरूंनीच पुढाकार घ्यायला हवा. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर प्रचंड बाजार मांडलेला दिसतो ज्यात लाखो लोक आपला स्वार्थ साधताना दिसतात. आपल्या देशातील शिक्षणपध्दतीत एक त्रूटी आहे ती म्ह्णजे आध्यात्म या विषयाचा शाळेय शिक्षणात समावेश केला गेला नाही ते होण गरजेचे आहे. आपल्या देशातील स्वतःला स प्रसिध्द म्ह्णवून घेणार्‍यांचे आपल्या संस्कृती बाबतचे ज्ञान नव्हे अज्ञान किव येण्यासारखे असल्याचे बर्‍याचदा दिसते. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर जमा झालेला बराचचा पैसा लोकहिताच्याच कामी आला असता तर देशाची बर्‍यापैकी प्रगती झाली असती. सर्वच अध्यात्मिक गारूंचे आर्थिक व्यव्हार अधिक पारदर्शी करण्याबाबत सरकारणे विचार करायला हवा. अध्यात्म हे लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखविण्यास कारणीभूत ठरायला हवे पण आज अध्यात्माचा बाजार मांडून ते लोकांना लुबाडण्याचा अड्डा होत आहे...हे कोठे तरी थांबायला नको का ?

लेखक – निलेश बामणे
गोरेगांव ( पूर्व ) मुंबई
मो. 9029338268



आपल्या देशातील बहूसंख्य लोक अध्यात्मिक गुरूंच्या मागे लागतात ते मोक्ष प्राप्तीसाठी मुळात मोक्ष ही संकल्पना गृहीत धरावी की नाही याबद्दल ठाम मत व्यक्त करावं की नाही इतकी माहिती उपलब्ध नाही. ढोबळ्मानाने या बाबतीत असेही म्ह्णता येईल की अस्तित्वाच नसलेली गोष्ट मिळविण्यासाठी सार्‍यांचा अट्टहास सुरू आहे. आपल्या देशातील एखाद्या कुटूंबातील कुटूंब प्रमुखाने गुरू केला की तो आपल्या कुटूंबातील सर्वांनाच त्या गुरूच्या चरणी लोटंगण घालायला भाग पाडतो. पुर्वी फक्त ईश्वर हाच आपला एकमेव संरक्षण कर्ता आहे अशी सर्वसाधारणतः लोकांची समजूत होती पण हल्ली सर्व संकटातून, दुःखातून मुक्ती मिळवून मोक्षाच्या मार्गावर मार्गस्थ होणाचा एक मेव मार्ग म्हणजे गुरूमंत्र आणि तो देणारा अध्यात्मिक गुरू असा गैरसमज समाजात जाणिव पूर्वक पसरविला गेला आहे. आपल्या देशातील वाढ॑ती लोकसंख्या ,मुळभूत गरजांचा अभाव, वाढती बेकारी आणि वाढत्या सामाजिक समस्या यामुळे त्रस्त झालेल्या आजारी पडलेल्या प्रत्येकाला एक मानसिक आधार हवा असतो नेमका तो आधार हे अध्यात्मिक गुरू योग्य वेळी देतात आणि लोकांच्या गळ्यातील ताईत होतात. समाजात संस्कृती, संस्कार आणि नैतिकता टिकून राहावी म्ह्णून समाजाला ईश्वर या संकल्पनेची आणि अध्यात्मिक गुरूंची आवश्यकता आहेच पण ती फक्त खर्‍या अध्यात्मिक गुरूंची भोंदूंची नाही. आता या भोंदू बाबा, बुवा आणि अध्यात्मिक गुरूंचे पितळ उगडे पाडण्यासाठी खर्‍या अध्यात्मिक गुरूंनीच पुढाकार घ्यायला हवा. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर प्रचंड बाजार मांडलेला दिसतो ज्यात लाखो लोक आपला स्वार्थ साधताना दिसतात. आपल्या देशातील शिक्षणपध्दतीत एक त्रूटी आहे ती म्ह्णजे आध्यात्म या विषयाचा शाळेय शिक्षणात समावेश केला गेला नाही ते होण गरजेचे आहे. आपल्या देशातील स्वतःला स प्रसिध्द म्ह्णवून घेणार्‍यांचे आपल्या संस्कृती बाबतचे ज्ञान नव्हे अज्ञान किव येण्यासारखे असल्याचे बर्‍याचदा दिसते. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर जमा झालेला बराचचा पैसा लोकहिताच्याच कामी आला असता तर देशाची बर्‍यापैकी प्रगती झाली असती. सर्वच अध्यात्मिक गारूंचे आर्थिक व्यव्हार अधिक पारदर्शी करण्याबाबत सरकारणे विचार करायला हवा. अध्यात्म हे लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखविण्यास कारणीभूत ठरायला हवे पण आज अध्यात्माचा बाजार मांडून ते लोकांना लुबाडण्याचा अड्डा होत आहे…हे कोठे तरी थांबायला नको का ?

लेखक – निलेश बामणे
गोरेगांव ( पूर्व ) मुंबई
मो. 9029338268

Author