आजचा विषय शेपू

आजचा विषय शेपू

काहीशी चवीला वेगळ्या असणा-या शेपूच्या भाजीला इंग्रजीत दिल व्हेजिटेबल, तर हिंदीत सावा आणि पंजाबीत सोया असं म्हणतात. या भाजीचा वापर भारताप्रमाणेच रशिया, युक्रेन, पोलंड यांसारख्या देशांतही केला जातो. दिसायला हिरवीगार असल्याने कोथिंबिरीच्या गटात मोडते. मात्र हिची चव कोथिंबिरीप्रमाणे नसते तर हिला एक विशिष्ट उग्र चव असते. शेपूच्या उग्र गंधामुळे बरेच लोक शेपूचे सेवन टाळतात. चवीला चांगली नसली तरी हिच्यात भरपूर औषधी गुण आहेत. इतर देशात या भाजीचा वापर सलाड, सूप यांसारख्या विशिष्ट पदार्थात केला जातो तर आपल्याकडे प्रामुख्याने भाजी आणि पराठा करून खाल्ली जाते. पोटाचे विकार, डोकेदुखी, किडनीचे विकार यासारख्या रोगांवर अतिशय उपयोगी आहे. शेपूच्या भाजीमध्ये लो कॅलरीज आणि उच्च प्रतीची पोषणमूल्य असतात. शेपूची पानं भाजलेल्या भागावर लावली तर लवकर आराम पडतो. या भाजीच्या सेवनाने कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. म्हणून ही भाजी आहारात असावी. या भाजीच्या सेवनाने पचनशक्ती वाढवण्यास मदत होते. शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. बी कॉम्प्लेक्स अािण व्हिटॅमिनचं प्रमाण अधिक असल्याने या भाजीच्या सेवनाने निद्रानाशाचा त्रास होत नाही. शरीरातील हार्मोन्स संतुलन राखण्यास मदत होते. मासिक पाळीचा त्रास असलेल्यांनी या भाजीचं आवर्जून सेवन करावं. यात असलेले फ्लेवनॉइड्स आणि पोषक मूल्यांमुळे मासिक पाळीच्या वेळी होणारा त्रास कमी होतो. शरीरातील रक्तातल्या व्हाईट कॉलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे हृदय संरक्षक म्हणून काम करते. यात कॅल्शिअम अधिक प्रमाणात मिळतं. त्यामुळे गुडघेदुखी कमी होते. तसंच हाडांची झीज टाळण्यासाठी हाडं मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो. शेपूच्या बिया म्हणजे बाळशेपा. लहान बाळाना देतात ते ग्राईप वॉटर यापासूनच करतात. या बिया आणि भाजी देखील, वातासाठी उत्तम. या बिया अरब लोकात, मसाल्यात वापरतात. आपल्या नेहमीच्या डोश्याच्या पिठात, शेपू बारीक चिरुन घातला तर तो दिसतोही चांगला आणि लागतोही चांगला.
काही शेपूचे पदार्थ
शेपूची भाजी
साहित्य. १ मोठी जुडी शेपू, २-३ हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हळद, ५-६ मेथीदाणे, ८-९ लसणीच्या पाकळ्या, ठेचून
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे, २ टेस्पून भिजवलेली तूर डाळ, १/२ ते ३/४ कप थालीपीठाची भाजणी, २ टिस्पून गूळ (ऐच्छिक), चवीपुरते मीठ
कृती. शेपू निवडून घ्यावा. खोल भांड्यात पाणी घ्यावे व स्वच्छ करावा. नंतर चिरून घ्यावा. कुकरच्या डब्यात शेपू व मिरच्या मोडून घालाव्यात. कुकरमध्ये २-३ शिट्ट्या करून भाजी शिजवावी. भाजीच्या डब्यावर झाकण ठेवून त्यावर भिजवलेले शेंगदाणे ठेवून तेही शिजवून घ्यावे. कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण घालावी. लालसर होईस्तोवर परतावे. मेथीदाणे घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतावे. नंतर मोहोरी आणि हळद घालून फोडणी करावी. फोडणीत भिजवलेली तूरडाळ घालून मंद आचेवर वाफ काढावी. डाळ अर्धवट शिजली कि शिजवलेले शेंगदाणे घालावेत. मिनिटभर परतावेत.यात शिजवलेली शेपूची भाजी घालून नीट मिक्स करून घ्यावे. मंद आचेवर झाकण ठेवून मिनिटभर शिजवावे. नंतर थालीपीठाची भाजणी पेरून मिक्स करावे. चवीनुसार मीठ आणि गुळ घालावा. झाकण ठेवून २ वाफा येउ द्याव्यात. भाजी गरमच भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.
टीप. भाजणीऐवजी ज्वारीचे पीठ किंवा भाजलेले बेसनही वापरू शकतो. भाजणीमुळे चव छान येते.
शेपूची परतून भाजी
साहित्य. एक जुड्डी शेपूची पालेभाजी , ८-१० लसूण पाकळ्या,चवीनुसार मीठ व हिरव्या मिरच्या ,फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद व हिंग.
कृती. प्रथम शेपूचे कोवळे लांब देठ न खुडता तसेच ठेवून भाजी निवडून व एका चाळणीत घालून स्वच्छ धुवून घ्या व निथळत ठेवा. लसूण पाकळ्या सोलून बारीक तुकडे करून घ्या, हिरव्या मिरच्यांचेही हवे तेव्हढे बारीक /मोठे तुकडे करून घ्या. आता गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर हळद व हिंग घाला,मग लसणाचे बारीक केलेले तुकडे व हिरव्या मिरचयांचे तुकडे घाला,लसूण गडद लाल-काळसर रंगावर असा झाल्यावर चाळणीत धुवून निथळत ठेवलेला शेपू घालून चवीनुसार मीठ घालून चांगले परतून घ्या,एक पाण्याचा हबका मारून पुन्हा एकदा परतून घेऊन कढईवर एक स्टीलचे ताटात पानी घालून झाकण म्हणून ठेवा. खालून गॅसची उष्णता व वरच्या झाकण म्हणून ठेवलेल्या ताटातीळ पाण्याची वाफ होईल त्या वाफेवर दोन्ही कडून शेपूची भाजी १० मिनिटे शिजू द्या. आता गॅस बंद करा.
सर्व्ह करतेवेळी भाजीवर लसणाची गरम फोडणी घालून ज्वारीच्या भाकरीबरोबर व सोबत एक चमच हिरव्या मिरच्यांचा खर्डा घालून सर्व्ह करा.
शेपूचे खमंग भजी
साहित्य. दीड वाटी बारीक चिरलेली शेपू, १ वाटी बेसन, २ चमचे तांदुळाचे पीठ, १ कांदा बारीक चिरलेला, प्रत्येकी १ चमचा आले,लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर, मीठ चवीनुसार, ४ चमचे तीळ, तळण्यासाठी तेल, इ.
कृती. एका मोठ्या बाऊलमध्ये चिरलेली शेपू, बेसन, तांदुळाचे पीठ, कांदा, आले-लसून पेस्ट, हळद, मीठ, मिरची पावडर आणि ३ चमचे तीळ एकत्र करून पाणी घालून मळावे.
लहान गोळे करून वड्यांचा आकार देऊन वरून तीळ लावावे आणि खमंग तळून किंवा शॅलो फ्राय करून घ्यावे. खजूर चटणीबरोबर गरम गरमच सर्व्ह करावे.
शेपूचे डाळवडे
साहित्य. दोन वाट्या हरभरा डाळ , दोन टेबलस्पून उडीद डाळ , एक कांदा (बारीक चिरुन) , एक जुडी शेपू निवडून,धुवून व बारीक चिरुन ,चवीनुसार मिरच्या आणि मीठ , वडे तळण्यासाठी जरुरी प्रमाणे तेल.
कृती. सुरूवातीला हरभरा डाळ आणि उडदाची डाळ सहा ते आठ तास पाण्यात भिजत घालावी. दोन्ही डाळी भिजल्यावर चाळणीत उपसून घेऊन पाणी निथळून घेऊन त्यात मिरच्यांचे तुकडे,मीठ व चिमूटभर हळद घालावी व हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून कमीत कमी पाणी घालून किंचित भरड वाटून घ्यावे. वाटलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला शेपू व कांदा घालून नीट मिसळून घ्यावे.
वरील मिश्रणाचे प्लॅस्टिकच्या कागदावर वडे ठापून किंवा लहान भजी करून तळावी.
टोमॅटो सॉस किंवा नारळाच्या चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावेत.
शेपूचा पराठा.
साहित्य. एक जुड्डी शेपू, चवीनुसार १-२ हिररव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, दोन वाट्या कणिक, दोन टेबलस्पून ओट्स, चवीनुसार मीठ, एक चमचा ओवा,आवश्यकतेनुसार पाणी.
कृती . शेपू निवडून, धुवून, बारीक चिरून घेणे त्यात लसुण, मिरचीचा ठेचा, मीठ आणि दोन टेबलस्पून ओट्स घाला.
मावेल तशी कणिक (गव्हाचे पीठ) घेऊन पोळ्यांसाठी मळतो तशी कणिक मळून ठेवा व १५ मिनिटांनी पराठे लाटून तेल/ तूप लावून भाजा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author