सध्या आंब्याच्या सोबतच फणसही मुबलक उपलब्ध आहे. कापा आणि बरका अशा दोन प्रकारात फणस उपलब्ध असतो. अनेकदा फणस खाल्ल्यानंतर त्याच्या बिया म्हणजेच आठळ्या अनेकजण फेकून देतात. पण फणसाइतकेच आठळ्यांमध्येही पोषणद्रव्यं मुबलक असतात. त्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर असल्याने वाफवून किंवा भाजून आठळ्यांचीही चव चाखा.
फणसाच्या आठळ्यांमध्ये स्टार्च उत्तमप्रकारचे आढळते. यामधून शरीराला उर्जा मिळते. वाटीभर वाफवलेल्या आठळ्या खाणंही पोटभरीचे आहे. आठळ्यांमध्ये चांगल्या दर्जाचे डाएटरी फायबर्स असते. तसेच आठळ्यात कॅलरीज अल्प प्रमाणात असतात. त्यामुळे वेट लॉसच्या मिशनवर असणार्यां साठी हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. रक्तातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी राखण्यास, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत होते. आठळ्यांमधून मॅग्नीज, मॅग्नेशियम यासारखे मिनरल्स मिळतात. या दोन्ही प्रकारच्या मिनरल्समुळे हाडांना बळकटी मिळते. मॅग्नेशियममुळे नर्व्ह सिस्टीमचे कार्य सुधारते. तर मॅग्नीज रक्ताचे क्लोटींग़ सुधारण्यास, कनेक्टीव्ह टिश्युंचे कार्य सुधारायला मदत करते. आठळ्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायटोन्युट्रीएंट्स आढळतात. यामुळे एजिंग़, रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. तसेच यामध्ये अॅान्टी ऑक्सिडेटीव्ह गुणधर्मदेखील आढळतात.
आठळ्या कशा खाव्यात ?
फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्यामधील बीया म्हणजेच आठळ्या पाण्यात भिजवून स्वच्छ धुवा.
त्यावरील चिकट स्तर काढा. आणि पाण्यात चिमुटभर मीठ घालून आठळ्या वाफवा.
वाफवलेल्या आठळ्यांवरील चॉकलेटी रंगाचे आवरण काढा.
अशाप्रकारे वाफवलेल्या आठळ्यांची भाजी करता येऊ शकते किंवा कोलंबी, जवळा अशा मांसाहारी पदार्थांचीही लज्जत वाढवण्यासाठी आठळ्यांचा वापर करता येऊ शकतो.
वाफवलेल्या आठळ्यांना तुम्ही कांदा, लसुण आणि हिरव्या मिरच्यांच्या तडक्यावर परतवू शकता.
फणसाच्या आठळ्यांचे लाडू
साहित्य. वाटीभर फणसाच्या आठळया, अर्धी वाटी साजूक तूप, वाटीभर साखर, एक छोटा चमचा वेलदोडयाची पूड, चिमूटभर जायफळाची पूड,एक छोटा चमचा मीठ.
कृती. प्रथम फणसाच्या आठळया बत्याने फोडून घ्या व मिठाच्या पाण्यात घालून उकडून घ्या आणि थंड झाल्यावर सोलून घ्या व मिक्सरवर फिरवून घ्या. नंतर गॅसवर एका नॉनस्टिक कढईत साजूक तुपावर खमंग होईतोंवर व सोनेरी रंग येईतोवर परतून घ्या. आता गॅसवर एका भांड्यात वाटीभर साखरेचा दोन तारी पाक करून घ्या,त्या पाकात वेलदोडयाची पूड व जायफळाची चिमूटभर पूड घालून ढवळून घेऊन मग आठल्याचे तुपावर भाजून घेतलेले व मिक्सरमधून फिरवून तयार केलेले आठळ्यांचे पीठ घाला व झाऱ्याने ढवळून घ्या व गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. अर्ध्या तासाने मिश्रण थंड व घट्ट झाल्यावर लाडू वळा.
* फणसाच्या आठळ्या व चवळी मसाला*
साहित्य. २०० ग्रॅम, आठळ्या, २०० ग्रॅम चवळी, १ कांदा, १ टोमॅटो, १ टी. स्पून प्रत्येकी धने जिरे पावडर, १/२ टे. स्पून. काश्मिरी मिरची पावडर, १ टी. स्पून गरम मसाला, पाणी (कोथिंबीर पाहिजे असल्यास) फोडणीसाठी मोहर, हिंग, कढीपत्ता, चवीपुरती साखर. कृती : आठळ्यांचे तुकडे करून साल काढून उकडून घ्याव्या. चवळी रात्रभर भिजवून उकडून घ्यावी. कांदा, टोमॅटो बारीक कापून घ्यावे. लसूण पेस्ट करावी. चिंचेचा कोळ काढावा. प्रथम पॅन घेऊन गरम झाल्यावर तेल घालावे. त्यात फोडणीचे साहित्य घालून त्यावर लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, धनेजिरे पावडर घालून चांगले परतावे. त्यावर मीठ, चिंचकोळ, काश्मिरी मिरची पावडर, गरम मसाला, साखर घालून ढवळून घ्यावे. त्यावर आठळ्या व चवळी घालावी. थोडे पाणी घालावे. झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्यावी. पाच मिनिटे मंद गॅसवर ठेवून गॅस बंद करावा. फुलके, भाकरी, नान तसेच दोन पावांच्या मधे भरूनही खाऊ शकतो.
फणसाच्या आठळ्या, काजू, शहाळ्याची भाजी
साहित्य. २ वाट्या फणसाच्या आठळ्या, अर्धा कप ओले काजू किंवा पाण्यात भिजवलेले काजू, अर्धा कप कोवळे खोबरे पातळ काप करून, १ बारीक चिरलेला कांदा, २ छोटे स्पून गोड घट्ट दही, १ चमचा साय, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, ७-८ कढीपत्ता, २ चमचे तूप, जिरे, हळद
वाटण. २ ते ३ टेबलस्पून मलईचं खोबरं, १ छोटा कांदा उकडून, २-३ लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, १ चमचा लाल तिखट, पाव कप टोमॅटो हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्या.
कृती. आठळ्या मीठ घालून उकडून घ्या. त्याची सालं काढून टाकून पातळ काप करा. कोवळ्या नारळाचंही काप करून ठेवा. २ तास काजू पाण्यात भिजवून ठेवा. कढईत २ चमचे साजूक तूप घाला. त्यात जिरं, कढीपत्ता घाला. कांदा परतून घ्या. हळद घाला. आता वाटलेलं वाटण घालून तूप सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात शहाळे काप, आठळ्याचे काप व काजू घाला. थोडं परता. त्यात दही व साय घाला. थोडे परतून त्यात १ वाटी गरम पाणी घाला. मीठ, साखर घाला. २-३ उकळ्या आल्यावर गॅस बंद करा. वरून कोथिंबीर, खोबरं, काजू घालून सजवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
आजचा विषय फणसाच्या आठळ्या.