आजचा विषय चारोळी.

आजचा विषय चारोळी.

चारोळी हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. अनेक गोडाच्या पदार्थांमध्ये, लाडवांमध्ये चारोळी वापरली जाते. मात्र केवळ गोडाच्या पदार्थांपुरता चारोळी मर्यादीत नाही. अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठीदेखील चारोळीचा नियमित आहारात समावेश करता येऊ शकतो. त्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत.
महाराष्ट्रात कोकणातील उष्ण आणि दमट हवामानापासून विदर्भातील हिवाळ्यात कडक थंडीतही चारोळीची झाडे चांगली वाढतात आणि भरपूर उत्पादन देतात. आदिवासी भागात या चारोळीच्या झाडाला चार असे म्हणतात.
चारोळीची लागवड भारतात स्वतंत्रपणे केली जात नाही. त्यामुळे चारोळी लागवडीखालील क्षेत्र आणि चारोळीचे उत्पादन यांविषयी माहिती उपलब्ध नाही. भारतात कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरीसा, इत्यादी राज्यांतील जंगलामध्ये आणि डोंगराळ भागात चारोळीची झाडे आढळतात. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील नांदेड भागातील किनवटच्या जंगलात, विदर्भातील बुलढाणा, अकोट, रामटेक आणि भंडारा मगात तर कोकणातील रत्नागीरी, राजापूर, मालवण आणि ठाणे जिल्ह्यात चारोळीची झाडे दिसून येतात. चारीळीच्या झाडाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते. उष्ण आणि दमट हवामानातही चारोळीची झाडे चांगली वाढतात. कमी पावसाचा तसेच अतीपावसाचा प्रदेशात चारोळीची झाडे वाढलेली दिसून येतात.
चोरोळीच्या झाडा पासून लागवडीनंतर ७ ते ८ वर्षानंतर उत्पादन मिळण्यास सरुवात होते. साधारणपणे दहा वर्षानंतर चारोळीच्या झाडापासून भरपून उत्पादन मिळण्यास सुरूवात होते. चोरोळीच्या प्रत्येक झाडापासून १० किलो फळे मिळतात. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांमध्ये चारोळीच्या झाडांना मोहोर येतो आणि एप्रील-मे महिन्यात फळे पक्व होऊन चारोळी मिळण्यास सुरूवात होते. चोरोळीच्या फळांचा रंग काळा झाल्यानंतर फळे पक्व झाली असे समजून फळांची काढणी करावी. काढणीनंतर फळे पाण्यात सुमारे ३ ते ४ दिवस भिजत ठेवावीत. नंतर फळांचा काळा गर हाताने चोळून काढून टाकावा आणि बी वेगळे कराव. हे कठिण कवच असलेले बी सावलीत वाळवितात.
वाळलेली कठीण फळे जात्यावर अगदी हलकेच भरडतात. त्यामुळे कठीण कवच फूटून आतील बी वेगळे होते. यालाच चारोळी म्हणतात. चारोळीच्या चांगल्या वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सुमारे दोन किलो चारोळी मिळते. जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे चारोळीचे उत्पादन वाढत जाते. चारोळीमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. चारोळीत प्रोटीन्स आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. सोबतच यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2 आणि नियासिन घटक आढळतात. यासोबतच चारोळीत लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात आढळत असल्याने त्याचा आरोग्याला फायदा होतो. शारीरिक कमजोरी दूर करण्यास चारोळी मदत करते. शारीरिक वाढीसाठीदेखील त्याचा फायदा होतो. रात्री दूधात चारोळी मिसळून प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो. पुरूषांमध्ये शुक्राणूंची कमतरता भरून काढण्यासाठीही चारोळी फायदेशीर आहे. तोंड येण्याचा त्रास वारंवार जाणवत असल्यास त्यापासून सुटका मिळवण्यासाठी ३-४ दाणे चघळा. डोकेदुखी, डोकेदुखीतून येणारी चक्कर टाळण्यासाठी चारोळीचे दाणे फायदेशीर होतात. चारोळी तुम्ही थेट खाऊ शकता. याकरिता दूध किंवा पाण्याची गरज नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

Author